पाचल (अंकुश पोटले): राजापूर तालुक्यातील पाचल पंचक्रोशी अंतर्गत येणाऱ्या तळवडे गावातील ५१ ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. भाजप जिल्हा सरचिटणीस तथा उपसभापती अभिजित गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी भाजप मंडल अध्यक्ष एकनाथ मोंडे, मोहन घुमे, काशिनाथ पाटील, समीर खानविलकर, ओबीसी अध्यक्ष संदीप तेरवणकर तसेच अमर वारेशे आदी मान्यवर उपस्थित होते. तळवडे परिसरातील इतक्या मोठ्या संख्येने झालेल्या या प्रवेशामुळे पाचल पंचक्रोशीत भाजपाचे संघटन अधिक भक्कम झाले असून पक्षाची राजकीय ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे मानले जात आहे.
या सोहळ्यात तळवडे येथील रवींद्र हरी किंजळस्कर, प्रमोद रवींद्र पराडकर, पार्थ सागर किंजळस्कर, तेजस रवींद्र किंजळस्कर, मुकेश सुरेश पराडकर, सिद्धेश विजय पराडकर, संतोष हरी किंजळस्कर, राजेश दशरथ पराडकर, दिपेश गणपत किंजळस्कर, रोहन दिनेश पराडकर, अक्षय अनिल पराडकर, श्रीजा रितेश चव्हाण, लक्ष्मी अनंत चिले, संकल्पना प्रमोद चव्हाण, सावित्री सिताराम चव्हाण, विजया विजय पराडकर, प्रकाश रवींद्र पराडकर, सिताराम तुकाराम चव्हाण, आवेश वासुदेव गुरव, साक्षी काशिराम चव्हाण, सागर सदाशिव किंजळस्कर, दत्ताराम बाळकृष्ण किंजळस्कर, महेश हरी किंजळस्कर, प्रमोद तुकाराम चव्हाण, अजय अनंत किंजळस्कर, राकेश विठोबा गुरव, अनंत बापू चिले, लाभेश दिनेश गुरव, विजय सिताराम पराडकर, अंकित अनंत किंजळस्कर, प्रथमेश श्रीराम पराडकर, संदीप वामन पराडकर, गणेश काशिराम चव्हाण, सुयश महेंद्र सावर्डे, स्परिता गणेश धुबे, रिलिका रितेश चव्हाण, कांचन कृष्णाकांत बुडकर, श्रावणी गणेश धुबे, अंजली कृष्णाकांत कुडकर, अमर वासुदेव किंजळस्कर, अरुण कृष्णा गुरव, आत्माराम बाळकृष्ण गुरव, कल्पेश अल्पेश संजय राणे, युवराज रवींद्र किंजळस्कर, विराज रवींद्र किंजळस्कर, श्रीकांत प्रमोद चव्हाण, रिमेश काशिराम चव्हाण, अमोल अनंत चिले, गणेश चंद्रकांत धुबे, निलेश रघुनाथ धुबे आणि सिद्ध किंजळस्कर यांनी भाजपचा झेंडा हाती घेत पक्षात अधिकृत प्रवेश केला. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी या सर्व नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






