ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: गोवळ-विल्ये दरम्यान अर्जुना नदीवरील मोठ्या पुलासाठी २५ कोटींचा निधी मंजूर; खासदार नारायण राणे यांच्या पाठपुराव्याला यश
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » गोवळ-विल्ये दरम्यान अर्जुना नदीवरील मोठ्या पुलासाठी २५ कोटींचा निधी मंजूर; खासदार नारायण राणे यांच्या पाठपुराव्याला यश
राजापूर

गोवळ-विल्ये दरम्यान अर्जुना नदीवरील मोठ्या पुलासाठी २५ कोटींचा निधी मंजूर; खासदार नारायण राणे यांच्या पाठपुराव्याला यश

Gramin Varta
Last updated: October 19, 2026 9:54 am
Gramin Varta
40 Views
Share

राजापूर: तालुक्यातील गोवळ आणि विल्ये या दोन गावांना जोडणाऱ्या अर्जुना नदीवरील बहुप्रतिक्षित मोठ्या पुलाच्या उभारणीसाठी अखेर केंद्रीय मार्ग निधी (सीआरएफ) २०२४-२५ अंतर्गत तब्बल २५ कोटी रुपयांच्या भरीव निधीला मंजुरी मिळाली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी केंद्र व राज्य स्तरावर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या महत्त्वाकांक्षी कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गोवळ आणि विल्ये परिसरातील ग्रामस्थ अर्जुना नदीवर पक्का व मोठा पूल उभारण्यात यावा यासाठी सातत्याने प्रशासनाकडे मागणी करत होते.

पावसाळ्यात नदीला येणाऱ्या पुरामुळे दोन्ही गावांमधील संपर्क तुटून ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. मंजूर करण्यात आलेल्या २५ कोटी रुपयांच्या या निधीतून केवळ भव्य पुलाची उभारणीच होणार नसून, पुलाला जोडणारे मजबूत जोडरस्ते आणि अन्य पूरक कामेही पूर्ण केली जाणार आहेत. या पुलाच्या निर्मितीमुळे परिसरातील दळणवळण अधिक गतिमान आणि सुरक्षित होणार असून स्थानिक वाहतूक, व्यापार तसेच दैनंदिन व्यवहारांना मोठा हातभार लागणार आहे. प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यामुळे आता पुढील तांत्रिक प्रक्रिया, निविदा आणि इतर कार्यालयीन सोपस्कार पूर्ण होऊन लवकरच प्रत्यक्ष कामाचा नारळ फुटणार आहे. गेली अनेक वर्षे रखडलेल्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला खा. नारायण राणे यांच्या पुढाकारामुळे गती मिळाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत खा. राणे यांचे मनापासून आभार मानले आहेत.

Total Visitors :

5468475
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्ननगरीत प्रथमच ‘वरदाम्’ युवती संमेलन उत्साहात संपन्न

Gramin Varta
3 Min Read

ब्रेकिंग: अंजनारी पुलाजवळ भीषण अपघात; लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या कंटेनरची हातखंबा टॅपच्या पोलीस वाहनाला जोरदार धडक

Gramin Varta
2 Min Read

संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वाशी तर्फे संगमेश्वर गावात लोकसहभागातून एकाच दिवशी १५ विजय बंधारे पूर्ण

Gramin Varta
1 Min Read

दोन तोळे सोन्याच्या हावेपायी माणुसकी वेशीवर टांगली! सासरच्यांच्या पैशांच्या हव्यासाने सिझेरियन रोखले; ९ महिन्यांच्या स्वातीसह उदरातील निष्पापाचा तडफडून अंत

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

राजापूर

राजापूर : कोंडये ब्रिजवरील गंभीर गुन्ह्यात तीन वर्षांपासून फरार असलेल्या सोलापूरच्या आरोपीला तांत्रिक तपासाच्या आधारे बेड्या

2 Min Read
राजापूर

शालेय जिल्हास्तरीय रग्बी स्पर्धेत राजापूरच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी; मुलींच्या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड

2 Min Read
राजापूर

राजापूर : ओणी येथे बंद घर फोडून दागिने लंपास

1 Min Read
राजापूर

राजापूर: नाणार खाडी दुर्घटनेने भाटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर; तीन चिमुरड्यांचा दफनविधी, चौथ्या मुलीचा शोध सुरूच

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?