ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राजापूर : ओणी येथे बंद घर फोडून दागिने लंपास
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राजापूर : ओणी येथे बंद घर फोडून दागिने लंपास
राजापूर

राजापूर : ओणी येथे बंद घर फोडून दागिने लंपास

Gramin Varta
Last updated: October 23, 2026 10:12 am
Gramin Varta
239 Views
Share
Masked thief caught on security cameras

राजापूर : तालुक्यातील ओणी-कोंडीवळे येथील गोतावडेवाडी परिसरात बंद घराच्या मागील दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घरफोडीत तब्बल १ लाख ८ हजार ७६५ रुपयांचे दागिने चोरीला गेले असून, या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शामसुंदर गजानन शेट्ये (वय ३४, रा. ओणी-कोंडीवळे, गोतावडेवाडी, ता. राजापूर) यांच्या राहत्या घरी २० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.४५ ते रात्री ९.४५ वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. घरात कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराच्या मागील दरवाजाची कडी तोडली आणि दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.

या चोरीमध्ये ८७ हजार ७६५ रुपये किमतीचे १२.८५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि २१ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने, असा एकूण १ लाख ८ हजार ७६५ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या प्रकरणी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २.२५ वाजता राजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा क्रमांक २७०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. घरफोडी करणाऱ्या अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून, या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.

Total Visitors :

5469303
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दापोली : दाभिळ येथे वृद्धाच्या आजारपणाचा गैरफायदा घेत घरातून १२ बोअरची बंदूक लंपास

Gramin Varta
1 Min Read

इंडी आघाडीच्या बैठकीत एसआयआर, ईव्हीएम आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यावर सहमती

Gramin Varta
6 Min Read

राज्यात मार्चअखेर कृषिपंपांना शंभर टक्के दिवसा वीजपुरवठा;महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांची माहिती

Gramin Varta
3 Min Read

वालावलकर रुग्णालयात एंडोस्कोपीद्वारे १९ वर्षीय तरुणीच्या पोटातून टोकदार पिन यशस्वीरीत्या बाहेर काढली

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

राजापूर

विद्यार्थ्यांनी स्मार्ट मोबाईलप्रमाणे अष्टपैलू व स्मार्ट बनावे; पाचल येथे राजेंद्र बहाळकर यांचे प्रतिपादन

2 Min Read
राजापूर

राजापूर : आडिवऱ्यात नवरात्रोत्सवानिमित्त राज्यस्तरीय सोलो व ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा

1 Min Read
राजापूर

राजापूर : भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला समोरासमोर धडक; स्कुटीस्वार तरुण गंभीर जखमी

2 Min Read
राजापूर

रत्नागिरीत ‘ऑल आऊट ऑपरेशन’दरम्यान ब्राऊन शुगरसह राजापूरचा तरुण गजाआड; १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?