ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरीत ‘ऑल आऊट ऑपरेशन’दरम्यान ब्राऊन शुगरसह राजापूरचा तरुण गजाआड; १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरीत ‘ऑल आऊट ऑपरेशन’दरम्यान ब्राऊन शुगरसह राजापूरचा तरुण गजाआड; १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त
राजापूर

रत्नागिरीत ‘ऑल आऊट ऑपरेशन’दरम्यान ब्राऊन शुगरसह राजापूरचा तरुण गजाआड; १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Gramin Varta
Last updated: November 10, 2026 10:38 am
Gramin Varta
67 Views
Share

रत्नागिरी: शहरातील जेलरोड नाका परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या धडक कारवाईत बेकायदेशीर विक्रीसाठी ब्राऊन हेरॉईन (टर्की) हा अंमली पदार्थ बाळगणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाला रंगेहात पकडण्यात आले आहे. नुफेरअली खालीद तांडेल (वय २१, रा. गाझी मोहल्ला, वरचा वाडा, साखरी नाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी या कारवाईत अंमली पदार्थासह दुचाकी व मोबाईल असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्ह्यात पोलिसांच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विशेष ‘ऑल आऊट ऑपरेशन’दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जेलरोड नाका परिसरात नाकाबंदी आणि तपासणी करत होते. यावेळी रस्त्याच्या कडेला संशयास्पदरीत्या थांबलेल्या नुफेरअली तांडेल याची झडती घेतली असता त्याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने ठेवलेला उग्र वासाचा ब्राऊन हेरॉईन सदृश अंमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी केलेल्या तपासणीत प्लास्टिक पिशवीसह ६ ग्रॅम आणि निव्वळ ४ ग्रॅम वजनाचा हा साठा मिळून आला. आरोपीने या अंमली पदार्थाच्या प्रत्येकी ५०० रुपये किमतीच्या एकूण १२० लहान पुढ्या कागदात बांधून तयार ठेवल्या होत्या. या पदार्थाची बाजारातील अंदाजे किंमत ६० हजार रुपये इतकी आहे.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी ६० हजार रुपयांचा अंमली पदार्थ, पुढ्या बांधण्यासाठी वापरण्यात आलेले कागदाचे तुकडे आणि रिकाम्या पिशव्या, ५ हजार रुपये किमतीचा वापरता रिअलमी नार्झो ८० लाईट मोबाईल हँडसेट तसेच गुन्ह्यात वापरलेली १ लाख रुपये किमतीची सुझुकी ॲक्सेस पांढऱ्या रंगाची दुचाकी (क्रमांक एमएच ०८ बीवाय २८०५) असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश राजेंद्र सावंत (बकल नं. ३०६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६४/२०२६ अन्वये एनडीपीएस ॲक्ट १९८५ च्या कलम ८(क) आणि २१(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा अंमली पदार्थ कुठून आणला आणि तो शहरात कोणाला विकला जाणार होता, या रॅकेटचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.

Total Visitors :

5469333
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दिवेआगार समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Gramin Varta
2 Min Read

स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी मोठा निर्णय; निकृष्ट ‘टेंपर्ड ग्लास’च्या विक्रीला चाप

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीत २७ सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा होणार

Gramin Varta
2 Min Read

इंडी आघाडीचा संसद ते निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

राजापूर

पाचलमध्ये अपर तहसील कार्यालय व्हावे यासाठी कृती समितीचा लढा कायम; अंतिम निर्णयाकडे राजापूरवासीयांचे लक्ष

4 Min Read
राजापूर

राजापूर : मानसिक त्रासातून स्वतःला पेटवून घेतलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

2 Min Read
राजापूर

राजापूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पाचलच्या सरस्वती विद्यामंदिरचे अजिंक्यपद

2 Min Read
राजापूर

२५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या श्रीशा-श्रीजाच्या प्रथम वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची किनार

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?