ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राजापूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पाचलच्या सरस्वती विद्यामंदिरचे अजिंक्यपद
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राजापूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पाचलच्या सरस्वती विद्यामंदिरचे अजिंक्यपद
राजापूर

राजापूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पाचलच्या सरस्वती विद्यामंदिरचे अजिंक्यपद

Gramin Varta
Last updated: September 23, 2026 1:56 pm
Gramin Varta
109 Views
Share

राजापूर / तुषार पाचलकर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मान्यतेने आयोजित राजापूर तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलांच्या कबड्डी गटात सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, पाचलच्या संघाने दमदार कामगिरी करत तालुकास्तरीय अजिंक्यपद पटकावले. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी, पंचायत समिती राजापूर तसेच राजापूर तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ अंतर्गत झालेल्या या स्पर्धेत पाचलच्या १९ वर्षांखालील मुलांच्या कबड्डी संघाने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धेतील चुरशीच्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी आक्रमक चढाया, भक्कम बचाव आणि सांघिक समन्वयाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. अंतिम सामन्यातही संघाने प्रभावी खेळ करत दणदणीत विजय मिळवला आणि तालुकास्तरीय अजिंक्यपदावर आपले नाव कोरले.

या उल्लेखनीय यशामुळे सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, पाचलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. खेळाडूंच्या या यशाबद्दल पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेश सावंत, कार्याध्यक्ष अशोक सक्रे, सचिव रामचंद्र वरेकर, सहसचिव किशोर नारकर, खजिनदार राजन लब्दे तसेच सर्व संचालक मंडळाने खेळाडूंचे अभिनंदन केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका आशा गुरखे, पर्यवेक्षिका प्रमिला गांधी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विजेत्या संघाचे कौतुक केले.

या संघाला क्रीडा शिक्षक नितीन सांडम यांचे मार्गदर्शन लाभले. तालुकास्तरीय स्पर्धेतील या यशानंतर आता जिल्हास्तरीय स्पर्धेतही पाचलच्या संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत असून, खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी विविध स्तरांतून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरीत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा भव्य मूक मोर्चा

saurabhsalvi262@gmail.com
2 Min Read

लांजा: वाकेड घाटात ‘बर्निंग कार’चा थरार! स्कॉर्पिओच्या धडकेनंतर ऑरा कारने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली

Gramin Varta
1 Min Read

प्राथमिक आरोग्य केंद्र वाटदच्या सीसीटीव्ही यंत्रणेवर प्रश्नचिन्ह; माहिती देण्यास विलंब झाल्याचा आरोप

Gramin Varta
3 Min Read

देवरूख पंचायत समितीचे लिपिक रोहित राजापूरकर यांचे निधन

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

राजापूर

राजापूर: जामदा धरण पुनर्वसनात १ हजार बोगस घरांचा संशय; SIT चौकशीची मनसेची मागणी

2 Min Read
राजापूर

राजापूर पालिकेतर्फे 21 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत योग प्रशिक्षण शिबिर

1 Min Read
राजापूर

राजापूर : तळगाव येथे गोवा बनावट दारूचा कारखाना उध्वस्त; कोट्यवधींचा बनावट मद्यसाठा जप्त; दोन आरोपींना पाच दिवसांची कोठडी

2 Min Read
राजापूर

अनुस्कुरा घाटात ब्रेक फेल झाल्याने टेम्पो पलटी; २० प्रवाशांचा थोडक्यात बचाव

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?