ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय जहाजावर हल्ला, १३ खलाशी बचावले, एक बेपत्ता; भारताकडून निषेध
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय जहाजावर हल्ला, १३ खलाशी बचावले, एक बेपत्ता; भारताकडून निषेध
देश-विदेश

ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय जहाजावर हल्ला, १३ खलाशी बचावले, एक बेपत्ता; भारताकडून निषेध

Gramin Varta
Last updated: September 15, 2026 9:44 am
Gramin Varta
19 Views
Share

दिल्ली: पुन्हा एकदा समुद्रात भारतीय व्यापारी जहाजाला लक्ष्य करण्यात आले. ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय जहाज एमटी एल गाया वर हल्ला झाला. हल्ल्याच्या वेळी या जहाजावर १४ कर्मचारी होते.

हे सर्व कर्मचारी भारतीय नागरिक होते. त्यापैकी १३ जणांना वाचवण्यात यश आले असून, एक जण अद्याप बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरू आहे.दरम्यान, भारताने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी ओमानच्या किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत पश्चिम आशियातील तणाव तातडीने कमी करण्याचे आवाहन केले. जहाजावर १४ भारतीय नागरिक होते, त्यापैकी १३ जणांना आतापर्यंत वाचवण्यात आले असून, बेपत्ता नागरिकाचा शोध सुरू असल्याचे मंत्रालयाने सांगितले.परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) एका निवेदनात म्हटले आहे की, ओमानमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, बचावकार्यामध्ये त्यांच्यासोबत सक्रियपणे समन्वय साधत आहे. भारतीय नागरिकांना केलेल्या मदतीबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने ओमानच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, “तणाव तातडीने कमी करण्यासाठी आणि या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारण्याच्या आमच्या आवाहनाचा आम्ही पुनरुच्चार करतो.” मंत्रालयाने पुढे म्हटले की, “या भागातील व्यापारी जहाजे, खलाशी, नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे अस्वीकार्य आहे. या भागातील आंतरराष्ट्रीय जलमार्गांवर मुक्त आणि सुरक्षित नौकानयन तसेच व्यापाराचा प्रवाह शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्याचे आम्ही आवाहन करतो.”

नवी दिल्ली येथे ब्रिक्स शिखर परिषद सुरू असतानाच हा हल्ला झाला आहे. या परिषदेत जहाजांवरील हल्ले आणि भारतीय खलाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षित सागरी मार्गांच्या महत्त्वावर भर दिला होता. सरकारच्या म्हणण्यानुसार, अमेरिका-इराण युद्ध सुरू झाल्यापासून या भागात मृत्युमुखी पडलेल्या १६ खलाशांमध्ये १० भारतीय खलाशांचा समावेश आहे.

शनिवारी नवी दिल्ली येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आणि प्रादेशिक संकटांमुळे वाढत्या धोक्यांचा सामना करणाऱ्या खलाशांच्या सुरक्षेसाठी ‘खलाशी आपत्कालीन सहाय्यता जाळे’ स्थापन करण्याचे आवाहन केले. जागतिक व्यापाराच्या प्रवाहात खलाशांची महत्त्वाची भूमिका आहे आणि त्यामुळे त्यांची सुरक्षा ही सर्वांसाठी प्राधान्याची बाब असली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराण आणि ओमान हे होर्मुझच्या सामुद्रधुनीसाठी नवीन प्रवेश आणि निर्गमन मार्ग निश्चित करण्यावर सहमत झाले आहेत. वृत्तानुसार, इराणी अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली.

Total Visitors :

5427550
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मुंबई-गोवा महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; महाडजवळ दीड कोटींची गोवा बनावटीची व्हिस्की जप्त, ट्रकसह चालकाला बेड्या

Gramin Varta
2 Min Read

राखीव निवडणूक चिन्ह कोणाला द्यायचे, हे ठरवणे निवडणूक आयोगाची जबाबदारी, शिंदे गटाचा युक्तिवाद

Gramin Varta
2 Min Read

संगमेश्वर परिसरात गौरी-गणपतीचे भक्तिमय वातावरणात विसर्जन; चाकरमान्यांच्या उपस्थितीने कोकण फुलले

Gramin Varta
2 Min Read

खेड: भेलसई पुलावर मोटारसायकल कठड्यावर आदळली; एकाचा मृत्यू, दोघे जखमी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

देश-विदेश

स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी मोठा निर्णय; निकृष्ट ‘टेंपर्ड ग्लास’च्या विक्रीला चाप

2 Min Read
देश-विदेश

CTET परीक्षेच्या तारखेत बदल; १२ आणि १३ डिसेंबरला परीक्षा, प्रवेशपत्र दोन दिवस आधी मिळणार

3 Min Read
देश-विदेश

“शिवसेनेसारखा वाद लांबवू नका!” तृणमूलच्या नाव-चिन्हावर सुप्रीम कोर्ट कडक; निवडणूक आयोगाला सोमवारपर्यंत ‘टाइमलाइन’ देण्याचे आदेश

3 Min Read
देश-विदेश

अनुदानित घरगुती एलपीजीसाठी १ ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण बंधनकारक

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?