ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राजापूर : मूर-तांबळवाडीचा सामाजिक क्रांतीचा एल्गार; अमानुष विधवा प्रथेला कायमची मूठमाती, स्त्री सन्मानासाठी ग्रामस्थांचा ऐतिहासिक ठराव
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राजापूर : मूर-तांबळवाडीचा सामाजिक क्रांतीचा एल्गार; अमानुष विधवा प्रथेला कायमची मूठमाती, स्त्री सन्मानासाठी ग्रामस्थांचा ऐतिहासिक ठराव
राजापूर

राजापूर : मूर-तांबळवाडीचा सामाजिक क्रांतीचा एल्गार; अमानुष विधवा प्रथेला कायमची मूठमाती, स्त्री सन्मानासाठी ग्रामस्थांचा ऐतिहासिक ठराव

Gramin Varta
Last updated: October 1, 2026 8:10 am
Gramin Varta
462 Views
Share

राजापूर: शतकानुशतके रूढ असलेल्या अनिष्ट रूढी-परंपरांना छेद देत राजापूर तालुक्यातील मूर-तांबळवाडी येथील ग्रामस्थांनी सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने अत्यंत धाडसी व पुरोगामी पाऊल उचलले आहे. पतीच्या निधनानंतर महिलांचे कुंकू पुसणे आणि अंगावरील सौभाग्याचे अलंकार उतरवण्याची जाचक विधवा प्रथा वाडीत यापुढे पूर्णपणे बंद करण्याचा ऐतिहासिक व क्रांतिकारी निर्णय ग्रामस्थांनी सर्वानुमते घेतला आहे. या पुरोगामी निर्णयामुळे स्त्री सन्मान आणि सामाजिक समतेचा नवा आदर्श निर्माण झाला असून, पंचक्रोशीतून या भूमिकेचे जोरदार स्वागत होत आहे.

पतीच्या निधनाचे अतीव दुःख पचवत असतानाच, संबंधित महिलेवर सौभाग्याची प्रतीके बळजबरीने काढून घेण्याची अमानुष प्रक्रिया लादली जाते. या अनिष्ठ परंपरेमुळे शोकाकूल महिलेला प्रचंड मानसिक वेदना आणि अपमानास्पद वागणुकीतून जावे लागते. बदलत्या काळानुसार स्त्रियांना अनावश्यक यातना देणाऱ्या अशा जुनाट प्रथा हद्दपार होण्याची नितांत गरज ओळखून, मूर-तांबळवाडी ग्रामस्थांनी ही कुप्रथा मुळापासून संपवण्याचा एकमुखी ठराव बैठकीत मंजूर केला. मुंबई मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बारगोडे, प्रकाश यद्रुक, सचिव विलास पवार, तसेच विजय बने, राजेश बने, विजय पवार, रघुनाथ गुंडये यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

काळानुरूप समाजाने पुढे जात अशा कालबाह्य प्रथांवर सामूहिक बहिष्कार घालणे काळाची गरज बनली आहे. ज्या अनिष्ट रूढींमुळे महिलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचते आणि त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते, त्या नष्ट करण्यासाठी संपूर्ण समाजाने एकदिलाने पुढे आले पाहिजे, अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली. प्रत्येक गावाने आणि ग्रामपंचायतीने अशा परिवर्तनशील पावलांचा आदर्श घेऊन स्त्री सन्मान व सक्षमीकरणाला खऱ्या अर्थाने बळ दिले पाहिजे, असा एकमुखी सूर बैठकीत उमटला. मूर-तांबळवाडीने घेतलेल्या या मानवी मूल्यांची जपणूक करणाऱ्या निर्णयाने संपूर्ण तालुक्यात सामाजिक सुधारणेची नवी दिशा दाखवून दिली आहे.

Total Visitors :

5435605
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

४० वर्षांनी पुन्हा जमली मित्रांची मैफल; कृषी विद्यालय लांजा १९८४-८६ बॅचचे स्नेहसंमेलन उत्साहात

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी: बोटीवर स्वयंपाक करताना गॅसचा भडका; गंभीर भाजलेल्या खलाशाचा उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

खेड: कळंबणी बुद्रुक येथे बंद घराची खिडकी फोडून घरफोडी; टीव्हीसह स्वयंपाकाची भांडी पळवली

Gramin Varta
1 Min Read

१९ जिल्ह्यांत पाऊस लांबल्याने राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर; पंचनाम्यांपूर्वीच बळीराजा हवालदिल

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

राजापूर

अनुस्कुरा घाटात ब्रेक फेल झाल्याने टेम्पो पलटी; २० प्रवाशांचा थोडक्यात बचाव

1 Min Read
राजापूर

जामदा प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग; प्रकल्पग्रस्तांना मोबदला वाटप सुरू

2 Min Read
राजापूर

डीजे, फटाक्यांना फाटा देत पारंपरिक नृत्यांच्या गजरात ‘जैतापूरच्या राजा’ला भावपूर्ण निरोप; महिलांचे लेझीम अन् १० फुटी कोंबडा नृत्य ठरले मुख्य आकर्षण

3 Min Read
राजापूर

बलशाली लोकशाहीसाठी तरुणाईची नवमतदार नोंदणी गरजेची : संजय पवार

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?