राजापूर / तुषार पाचलकर :राजापूर तालुक्यातील कोळवणखडी गावात भाजपाच्या संघटनात्मक विस्ताराला बळ मिळाले असून, तीन ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो ग्रामस्थांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा तालुका पंचायत समितीचे उपसभापती अभिजित गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात नव्याने पक्षात दाखल झालेल्या ग्रामस्थांचे स्वागत करण्यात आले. भाजपा तालुकाध्यक्ष ॲड. एकनाथ मोंडे व मोहन घुमे यांनी याबाबत माहिती दिली.
राजापूर तालुक्यात भाजपाकडून संघटनात्मक बांधणीवर विशेष भर देण्यात येत असून, विविध गावांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम सुरू आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते गावागावांत संपर्क वाढवत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकासकामांवर विश्वास व्यक्त करत अनेकजण भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
रविवारी कोळवणखडी येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी मोरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सरिता मोरे, संचिता बने आणि विकास मोरे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्यासोबत काशिनाथ मोरे, नामदेव मोरे, शशिकांत मोरे, रूपेश मोरे, मंगेश मोरे, रूतिका रूपेश मोरे, रमेश मोरे, रेश्मा मोरे, निता मोरे, वैशाली मोरे, घनश्याम मोरे, वैजयंती मोरे, गजानन मोरे, रविंद्र मोरे, रमेश बने, शैलेश मोरे, योगेश रहाटे, माजी सरपंच आशा मोरे, माजी उपसरपंच सुहास मोरे, अरुण मोरे, गणपत मोरे, सुनिता कदम, इंद्रायणी चव्हाण, मालती रहाटे, सुमती रहाटे, विठ्ठल रहाटे, प्रकाश मोरे यांच्यासह गावातील अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ भाजपामध्ये सहभागी झाले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर सुतार, तालुकाध्यक्ष ॲड. एकनाथ मोंडे, मोहन घुमे, तालुका सरचिटणीस समीर खानविलकर, ज्येष्ठ नेते काशिनाथ पाटील, रायपाटणचे माजी सरपंच संदीप कोलते, राजा नलावडे, भोला गांगण, अमर वारेसे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या सर्व ग्रामस्थांचे अभिजित गुरव यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या. पक्षात सहभागी झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा योग्य सन्मान केला जाईल तसेच कोळवणखडी गावातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.





