ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: २५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या श्रीशा-श्रीजाच्या प्रथम वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची किनार
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Sunday, Oct 4, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » २५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या श्रीशा-श्रीजाच्या प्रथम वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची किनार
राजापूर

२५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या श्रीशा-श्रीजाच्या प्रथम वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची किनार

Gramin Varta
Last updated: September 28, 2026 2:25 pm
Gramin Varta
983 Views
Share

१२ अंगणवाड्यांतील चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप

राजापूर / तुषार पाचलकर: सामाजिक बांधिलकी जपत आपल्या आनंदाचे क्षण समाजातील गरजू आणि वंचित घटकांसोबत साजरे करण्याची परंपरा जपणारे पाचल येथील उद्योजक बाबा सुतार यांच्या कुटुंबात २९ सप्टेंबर सायंकाळी ७ वाजता आनंदाचा विशेष क्षण साजरा होणार आहे. विवाहानंतर तब्बल २५ वर्षांनी बाबा सुतार व त्यांच्या पत्नी सौ. नेहा सुतार यांना लाभलेल्या कन्यारत्न श्रीशा आणि श्रीजा या जुळ्या मुलींचा प्रथम वाढदिवस पाचल तळवडे येथील प्रभावती हॉल सभागृहात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून सुतार कुटुंबीयांनी आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता पाचल परिसरातील विद्यार्थ्यांसोबत वाटण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रीशा आणि श्रीजा यांच्या प्रथम वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत पाचल हद्दीतील जवळपास १२ अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या चिमुकल्या कन्यांचा पहिला वाढदिवस सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरणार आहे. आपल्या मुलांच्या आनंदाच्या प्रसंगी परिसरातील विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेण्याचा हा उपक्रम पालक म्हणून बाबा सुतार आणि सौ. नेहा सुतार यांच्या सामाजिक जाणिवेचे दर्शन घडविणारा आहे.

पाचल व परिसरात बाबा सुतार हे सामाजिक कार्यासाठी परिचित नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहून समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून विविध सामाजिक प्रश्नांमध्ये सहभाग घेतला असून गरजू नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्याबरोबरच लहान-थोरांच्या हाकेला प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम त्यांनी केले आहे. उद्योजक म्हणूनही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून ते विश्वकर्मा सॉमिल, पाचलचे मालक आहेत.

पाचल ग्रामपंचायतीचे माजी सदस्य असलेले बाबा सुतार हे राष्ट्रीय काँग्रेसच्या पाचल विभागातील युवा नेते म्हणूनही कार्यरत आहेत. पाचल पंचक्रोशीतील सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या पिंपळेश्वर मित्रमंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. राजकीय मतभेदांपेक्षा सामाजिक संबंधांना महत्त्व देत पाचल पंचक्रोशीतील विविध पक्षांच्या नेत्यांशी व कार्यकर्त्यांशी त्यांनी सलोख्याचे संबंध जपले आहेत.

बाबा सुतार यांच्या सामाजिक कार्याची झलक त्यांच्या ५०व्या वाढदिवसाच्या निमित्तानेही पाहायला मिळाली होती. १ नोव्हेंबर रोजी झालेल्या या वाढदिवसाच्या सोहळ्यात त्यांनी पाचल परिसरातील प्राथमिक शाळा तसेच अंगणवाड्यांमधील ४०० हून अधिक विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत आपल्या आनंदाचा क्षण त्यांच्यासोबत साजरा केला होता. आता श्रीशा आणि श्रीजा यांच्या प्रथम वाढदिवसानिमित्तही विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटपाचा उपक्रम आयोजित करून त्यांनी हीच सामाजिक परंपरा पुढे सुरू ठेवली आहे.

२५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुतार दाम्पत्याच्या आयुष्यात आलेल्या श्रीशा आणि श्रीजा यांच्या प्रथम वाढदिवसाचा आनंद सामाजिक उपक्रमातून परिसरातील चिमुकल्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न पाचल पंचक्रोशीत निश्चितच वेगळा ठरणार आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमातून ‘आपला आनंद इतरांसोबत वाटण्यातच खरा आनंद’ हा संदेश अधोरेखित होणार आहे.

Total Visitors :

5435529
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

एनसीएमसी कार्ड वाटपाचा रत्नागिरीत पुरता बोजवारा; तांत्रिक गोंधळ अन् संथ कारभारामुळे ज्येष्ठ नागरिकांचे अतोनात हाल, प्रवाशांमध्ये संताप

Gramin Varta
2 Min Read

महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये ८.५७ लाख कोटींची विक्रमी गुंतवणूक; २.९१ लाख रोजगारांची संधी

Gramin Varta
2 Min Read

लांजा बाजारपेठेत पहाटेच्या सुमारास संशयितरीत्या फिरणाऱ्या सराईत गुन्हेगारावर कारवाई

Gramin Varta
1 Min Read

राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये ३ ते १३ ऑक्टोबरदरम्यान मराठी साहित्य संमेलन- मराठी भाषा मंत्री उदय सामंत

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

राजापूर

साखरीनाटे डोंगर जेटीचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

2 Min Read
राजापूर

Future Changes Shape: Express Yourself with Galaxy Z Flip

7 Min Read
राजापूर

राजापूर: जामदा धरण पुनर्वसनात १ हजार बोगस घरांचा संशय; SIT चौकशीची मनसेची मागणी

2 Min Read
राजापूर

ग्राइंडरचे ब्लेड तुटून महाकोकणचे यूट्यूबर जगन्नाथ गुरव गंभीर जखमी

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?