ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये ३ ते १३ ऑक्टोबरदरम्यान मराठी साहित्य संमेलन- मराठी भाषा मंत्री उदय सामंत
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये ३ ते १३ ऑक्टोबरदरम्यान मराठी साहित्य संमेलन- मराठी भाषा मंत्री उदय सामंत
महाराष्ट्र

राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये ३ ते १३ ऑक्टोबरदरम्यान मराठी साहित्य संमेलन- मराठी भाषा मंत्री उदय सामंत

Gramin Varta
Last updated: September 24, 2026 7:49 am
Gramin Varta
16 Views
Share

मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ या उपक्रमाचे आयोजन राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये ३ ते १३ ऑक्टोबरदरम्यान करण्यात येणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली.

१०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित तसेच अभिमत विद्यापीठांमध्ये एकदिवसीय विद्यार्थी मराठी साहित्य संमेलने आयोजित करावीत, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.या संमेलनांमध्ये युवा विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग राहील, यासाठी विद्यापीठांनी विशेष नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

१०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीसंदर्भात राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंसमवेत ऑनलाइन बैठक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनातून घेण्यात आली. यावेळी मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित होते. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव अमोल मुत्याल, मराठी भाषा विभागाचे अधिकारी,विद्यापीठाचे कुलगुरू  (ऑनलाइन) उपस्थित होते.

१०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे येथे २८ जानेवारी २०२७ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत होणार आहे. या संमेलनाचे औचित्य साधून राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये विद्यार्थी मराठी साहित्य संमेलने आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून मराठी भाषेचा प्रसार आणि साहित्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये अधिक रुची निर्माण होण्यास मदत होईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

सर्व विद्यापीठांनी ही संमेलने एकाच दिवशी न घेता वेगवेगळ्या तारखांना आयोजित करावीत, जेणेकरून विविध ठिकाणी होणाऱ्या साहित्यविषयक उपक्रमांना व्यापक स्वरूप प्राप्त होईल, अशा सूचनाही मंत्री पाटील यांनी दिल्या.

मुंबई विद्यापीठ येथे ३ ऑक्टोबरपासून या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, ४ ऑक्टोबर, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर ५ ऑक्टोबर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,  ६ ऑक्टोबर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड ७ ऑक्टोबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर  ८ ऑक्टोबर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे ९ ऑक्टोबर, मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर  येथे १० ऑक्टोबर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे ११ ऑक्टोबर, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक येथे १२ ऑक्टोबर, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे १३ ऑक्टोबर, संत बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे १४ ऑक्टोबर आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे १५ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई आणि संबंधित महाविद्यालयांमध्येही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दुष्काळाचं संकट विचित्र; योजना, विकास प्रकल्पांचा निधी दुष्काळासाठी वापरावा – उद्धव ठाकरे

Gramin Varta
4 Min Read

दिल्लीत सामूहिक अत्याचारानंतर मुलीची हत्या

Gramin Varta
2 Min Read

संरक्षण क्षेत्रात स्वदेशीचा नवा अध्याय; हवाई दलाच्या ताफ्यात ‘तेजस’सह ‘HTT-40’ दाखल, नागरी उड्डाणासाठी ‘ध्रुव NG’ सज्ज

Gramin Varta
2 Min Read

एसटी प्रवासात आदलाबदल झालेली लाखोंच्या दागिन्यांची बॅग राजापूर पोलिसांच्या तत्परतेमुळे काही तासांत हस्तगत

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या तोंडावर ‘रेंट अ गरबा पार्टनर’च्या फसव्या जाहिराती; मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

2 Min Read
महाराष्ट्र

लाडक्या बहिणींसाठी दिलासा; ऑगस्ट महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता २४ सप्टेंबरनंतर बँक खात्यात जमा होण्याची शक्यता

2 Min Read
महाराष्ट्र

टाटा मोटर्सने टाटा सिएरा ‘डार्क एडिशन’ केले लाँच

2 Min Read
महाराष्ट्र

महाराष्ट्राची कन्या स्वीडनच्या संसदेत; कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतणी नीला विखे पाटील खासदारपदी

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?