ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: महाराष्ट्राची कन्या स्वीडनच्या संसदेत; कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतणी नीला विखे पाटील खासदारपदी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » महाराष्ट्राची कन्या स्वीडनच्या संसदेत; कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतणी नीला विखे पाटील खासदारपदी
महाराष्ट्र

महाराष्ट्राची कन्या स्वीडनच्या संसदेत; कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतणी नीला विखे पाटील खासदारपदी

Gramin Varta
Last updated: September 22, 2026 8:25 am
Gramin Varta
44 Views
Share

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रातील मातब्बर घराणे असलेल्या विखे पाटील कुटुंबातील चौथ्या पिढीने आंतरराष्ट्रीय राजकारणात ऐतिहासिक भरारी घेतली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पुतणी नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड झाली आहे. स्वीडनच्या ३४९ सदस्यीय संसदेत म्हणजेच ‘रिक्सडॅग’मध्ये त्यांनी स्टॉकहोम शहर मतदारसंघातून विजय संपादन केला असून, महाराष्ट्राच्या या कन्येने जागतिक पटलावर मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. काका राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावरील आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून लाडक्या पुतणीचे अभिनंदन करत संपूर्ण परिवारासाठी ही अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब असल्याचे म्हटले आहे.

४१ वर्षीय नीला विखे पाटील या आशियातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवणारे सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पणती तर माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आहेत. प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. अशोक विखे पाटील यांच्या त्या कन्या आहेत. नीला यांचा जन्म स्वीडनमध्येच झाला असला तरी त्यांचे बालपण अहिल्यानगरमध्ये गेले. स्वीडनच्या गोथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेस येथून त्यांनी अर्थशास्त्र, कायदा आणि पुढे एमबीएचे उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. सुरुवातीपासूनच सामाजिक व सार्वजनिक कार्यात सक्रिय राहिलेल्या नीला यांनी स्वीडनच्या ‘ग्रीन पार्टी’कडून निवडणूक लढवत हा विजय साकारला. यापूर्वी त्यांनी स्वीडनचे माजी पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांच्या कार्यकाळात राजकीय सल्लागार म्हणूनही महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळली होती.

स्वीडनच्या राष्ट्रीय निवडणुकीत डाव्या विचारसरणीच्या विरोधी पक्षांनी एकत्रितपणे ३४९ पैकी १७६ जागा जिंकत बहुमत मिळवले आहे, तर सत्ताधारी पुराणमतवादी सरकारला १७३ जागा मिळाल्या आहेत. या अत्यंत अटीतटीच्या राजकीय घडामोडींमध्ये नीला विखे पाटील यांची झालेली निवड आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्वाची मानली जात आहे. माझे बंधू डॉ. अशोक विखे पाटील यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेली अफाट मेहनतच आज नीलाच्या यशाचे मूळ कारण असून, ती स्वीडनच्या संसदेत लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या अपेक्षा प्रभावीपणे पूर्ण करेल, असा ठाम विश्वास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Total Visitors :

5427497
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राजापुरात बंद घर फोडून ६७ हजारांचा ऐवज लंपास

Gramin Varta
1 Min Read

मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार; कोकण आणि कृष्णाखोऱ्याचे पाणी आणणार, छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Gramin Varta
3 Min Read

‘लाडकी बहीण’साठी सामाजिक न्याय विभागाकडून आणखी ३३९ कोटींचा निधी वितरित; राखीव निधी वळवल्याने विरोधकांचा आक्षेप

Gramin Varta
2 Min Read

खेडशी परिसरात ट्रॅव्हल्सची मोकाट वासराला धडक; नागरिक, पोलिस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तत्परतेने मुक्या जीवाला जीवदान

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

सातबारा नावावर नसला तरी महिलांना मिळणार ‘शेतकरी’ प्रमाणपत्र; कृषिमंत्री यांची घोषणा

2 Min Read
महाराष्ट्र

लाडक्या बाप्पाच्या विसर्जनासाठी महाराष्ट्रासह देश-विदेशात जय्यत तयारी

4 Min Read
महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा टोलवसुलीविरोधात जनआक्रोश समितीची उच्च न्यायालयात धाव; जनहित याचिका करणार दाखल 

2 Min Read
महाराष्ट्र

बीआयएसने सोन्याच्या हॉलमार्किंग शुल्कात ७५ रुपयांपर्यंत केली वाढ, नवीन दर लागू

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?