ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रानगव्यानंतर आता देवरूखच्या मध्यवर्ती भागात बिबट्याची एन्ट्री; हायस्कूलसमोर दर्शनाने खळबळ
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रानगव्यानंतर आता देवरूखच्या मध्यवर्ती भागात बिबट्याची एन्ट्री; हायस्कूलसमोर दर्शनाने खळबळ
संगमेश्वर

रानगव्यानंतर आता देवरूखच्या मध्यवर्ती भागात बिबट्याची एन्ट्री; हायस्कूलसमोर दर्शनाने खळबळ

Gramin Varta
Last updated: September 27, 2026 8:20 am
Gramin Varta
544 Views
Share

देवरूख : शांत आणि निसर्गरम्य अशी ओळख असलेल्या देवरूख शहरात वन्यप्राण्यांचा वावर वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी शहर परिसरात रानगवा आढळून आल्यानंतर आता शुक्रवारी रात्री देवरूख हायस्कूलसमोरील मुख्य रस्त्यावर बिबट्या दिसल्याची घटना समोर आली आहे. शहराच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास देवरूख हायस्कूलसमोरून जाणाऱ्या काही नागरिकांना रस्त्यावर बिबट्या दिसून आला. काही काळ बिबट्याचा या परिसरात वावर असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हायस्कूल तसेच महाविद्यालय परिसरामुळे या भागात दिवसभर नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे अशा ठिकाणी बिबट्या आढळून आल्याने पालकांसह स्थानिक नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

देवरूख शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून रानगव्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यातच आता शहरातील मुख्य रस्त्यालगत बिबट्याचे दर्शन झाल्याने वन्यप्राण्यांचा शहराकडे वाढता वावर हा चर्चेचा विषय बनला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या परिसरातून पायी जाणाऱ्या नागरिकांनी तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

दरम्यान, बिबट्याच्या वावराची वनविभागाने तातडीने दखल घेऊन परिसरात गस्त वाढवावी, बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शाळा परिसरात विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असल्याने त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वनविभाग आणि प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. 

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी मोठा निर्णय; निकृष्ट ‘टेंपर्ड ग्लास’च्या विक्रीला चाप

Gramin Varta
2 Min Read

एफडीएचा मुंबईत धडाका; काळबादेवीतील १०० वर्षे जुन्या ‘क्यानी अँड कंपनी’सह नामांकित आस्थापनांचे परवाने निलंबित

Gramin Varta
3 Min Read

NMMS परीक्षेत १०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या यशाचे उद्दिष्ट; लांज्यात उद्या शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा

Gramin Varta
2 Min Read

गणपतीपुळे येथे अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव उत्साहात; सुमारे ६० हजार भाविकांनी घेतले स्वयंभू श्रींचे दर्शन

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

नायरी गावात मोबाईल नेटवर्कचा पुरता बोजवारा; सेवा पूर्ववत न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा

2 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर : बुरंबाड-सरंद येथे भरधाव मोटारसायकल घसरून तरुणाचा मृत्यू

1 Min Read
संगमेश्वर

साखरपा बसस्थानकात महिलेच्या पर्समधून २.६५ लाखांचे दागिने लंपास

1 Min Read

कोंडगाव ग्रामपंचायतीत ‘हर घर जल’ योजनेत ४० लाखांचा कथित घोटाळा; कागदपत्रे गायब झाल्याने खळबळ

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?