ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: गणपतीपुळे येथे अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव उत्साहात; सुमारे ६० हजार भाविकांनी घेतले स्वयंभू श्रींचे दर्शन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » गणपतीपुळे येथे अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव उत्साहात; सुमारे ६० हजार भाविकांनी घेतले स्वयंभू श्रींचे दर्शन
रत्नागिरी

गणपतीपुळे येथे अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव उत्साहात; सुमारे ६० हजार भाविकांनी घेतले स्वयंभू श्रींचे दर्शन

Gramin Varta
Last updated: September 29, 2026 7:55 pm
Gramin Varta
77 Views
Share

गणपतीपुळे/ वैभव पवार : रत्नागिरी तालुक्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव अतिशय भक्तीभावात, शिस्तबद्ध आणि शांततेत संपन्न झाला. या पवित्र पर्वणीनिमित्त घाटमाथ्यावरून आलेल्या सुमारे ५० ते ६० हजार भाविकांनी स्वयंभू श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतल्याची माहिती गणपतीपुळे देवस्थान समितीकडून देण्यात आली. पहाटेपासूनच सुरू झालेला ‘मंगलमूर्ती मोरया’चा गजर आणि अलोट गर्दीमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.

अंगारकी चतुर्थीनिमित्त मंदिराचे दरवाजे पहाटे साडेतीन वाजता उघडण्यात आले. मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजाअर्चा, मंत्रपुष्पांजली आणि महाआरती संपन्न झाल्यानंतर सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात आला. भाविकांना सुलभ व जलद दर्शन घेता यावे यासाठी देवस्थान समितीने चोख बॅरिकेडिंग आणि स्वतंत्र दर्शन रांगांची उभारणी केली होती. रांगेत उभ्या असलेल्या भाविकांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक मूलभूत सुविधांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांसोबतच श्री अनिरुद्ध बापू उपासना ट्रस्टच्या स्वयंसेवकांनी अत्यंत मोलाचे सहकार्य केले.

सुरक्षेच्या दृष्टीने जयगड पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत १५ पोलीस अधिकारी आणि १३८ पोलीस अंमलदारांचा मोठा बंदोबस्त मंदिर आणि परिसरात तैनात होता. यामध्ये वाहतूक पोलिसांचाही विशेष सहभाग राहिला. समुद्रकिनाऱ्यावर कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी होमगार्ड, जीवरक्षक आणि देवस्थानच्या सुरक्षारक्षकांकडून सातत्याने किनारी भागात गस्त घातली जात होती. संभाव्य आपत्कालीन स्थिती लक्षात घेता रत्नागिरी नगर परिषदेची अग्निशामक बंब गाडी, देवस्थानची रुग्णवाहिका आणि मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक औषधोपचारासह घटनास्थळी सज्ज होते.

घाटमाथ्यावरील भाविकांची गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने रत्नागिरी आगारातून जादा बसेसची सोय केली होती, ज्यामुळे प्रवाशांची मोठी सोय झाली. यात्रेनिमित्त घाटमाथ्यावरून दाखल झालेल्या विविध व्यावसायिकांमुळे मंदिर परिसरात मोठी बाजारपेठ फुलली होती, तर कोल्हापूर व सांगली येथील गणेश मंडळांच्या वतीने सकाळच्या सत्रात खिचडी आणि सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी साडेचार वाजता ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोषात स्वयंभू श्रींची पारंपरिक पालखी मिरवणूक थाटात निघाली. या मिरवणुकीत स्थानिक ग्रामस्थ, पुजारी, पोलीस आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देवस्थान समिती, ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या काटेकोर समन्वयामुळे हा भव्य यात्रोत्सव अत्यंत शांततेत आणि यशस्वीपणे पार पडला.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

हर्चे गावातील ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर व्यक्त केला विश्वास

Gramin Varta
2 Min Read

‘दुःखी कसं राहायचं?’ केतनच्या मृत्यूनंतर सियाचा ChatGPTला सवाल; चार्जशीटमधील उल्लेखाने खळबळ

Gramin Varta
3 Min Read

सोनवी नदीत अनधिकृत खोदाई आणि वांद्रीत बेकायदा उत्खनन; महामार्गाच्या ठेकेदार कंपनीचा तब्बल १८ कोटींचा दंड थकीत

Gramin Varta
2 Min Read

राखीव निवडणूक चिन्ह कोणाला द्यायचे, हे ठरवणे निवडणूक आयोगाची जबाबदारी, शिंदे गटाचा युक्तिवाद

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत ५ ऑक्टोबरला काँग्रेसचा मूक मोर्चा; ‘व्होट चोरी’च्या आरोपावरून रणशिंग फुंकले

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : कोकणनगर येथे रेशन धान्याचे सुरळीत वितरण; ९८ टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले धान्य

1 Min Read
रत्नागिरी

खेड आणि पूर्णगड येथून दोन २१ वर्षीय तरुणींचे गूढ अपहरण; गुन्हा दाखल

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?