ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: MPSC आंदोलनाला मोठे यश; तुकाराम मुंढे उच्चस्तरीय चौकशी समितीत; अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » MPSC आंदोलनाला मोठे यश; तुकाराम मुंढे उच्चस्तरीय चौकशी समितीत; अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर
महाराष्ट्र

MPSC आंदोलनाला मोठे यश; तुकाराम मुंढे उच्चस्तरीय चौकशी समितीत; अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर

Gramin Varta
Last updated: October 12, 2026 8:02 am
Gramin Varta
161 Views
Share

पुणे: स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणावरून पुण्यात हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पेटलेल्या एमपीएससी आंदोलनाला अखेर मोठे यश आले असून, राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. निष्पक्ष चौकशी पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा मोठा निर्णय शासनाने घेतला आहे, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या आग्रही मागणीनुसार धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासह उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रविवारी रात्री उशिरा पुण्यात दाखल होऊन आंदोलक विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत अधिकृत मसुदा जाहीर केला. शासनाच्या या ठोस पावलानंतर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन तूर्त तत्त्वतः स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे.

आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात सुरू असलेल्या या आंदोलनाला संपूर्ण राज्यातून वाढता पाठिंबा मिळत असल्याने शासनाने तातडीने तोडगा काढण्यासाठी पावले उचलली. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार रोहित पवार यांच्यात शासकीय पातळीवर प्रदीर्घ खलबते झाल्यानंतर मुख्य सचिवांच्या स्वाक्षरीचा अंतिम मसुदा आमदार रोहित पवार आणि आमदार विश्वजीत कदम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या निर्णयानुसार, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय चौकशी समिती दोन महिन्यांच्या मुदतीसाठी नेमण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे या समितीचे सचिव म्हणून कामकाज पाहणार असून, समितीमध्ये माजी न्यायमूर्ती पी. डी. नाईक, पोलीस महानिरीक्षक लखमी गौतम आणि सेवानिवृत्त सनदी अधिकारी गणेश पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती आजवर पेपरफुटीचा संशय आलेल्या सर्व परीक्षांची सखोल चौकशी करणार असून, आयोगाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रशासकीय शिफारशी सादर करणार आहे.

या चौकशी समितीव्यतिरिक्त आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेणे, २०२७ मध्ये होणाऱ्या गट ‘क’ परीक्षेच्या जागांमध्ये थेट दुप्पट वाढ करणे आणि आगामी तीन वर्षांत तब्बल ७० हजार पदांची मेगाभरती राबवून सर्व रिक्त पदे भरण्याचा निर्णयही शासनाने जाहीर केला आहे. दरम्यान, न्यायालयीन चौकशी जाहीर झाल्यानंतर एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी स्वतःहून भूमिका स्पष्ट करत नैतिकतेला प्राधान्य देत चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर जात असल्याचे नमूद केले. आयोगाची विश्वासार्हता आणि विद्यार्थीहित आपल्यासाठी सर्वोच्च असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या तीव्र संघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला असून परीक्षार्थींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Total Visitors :

5468457
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दिवाळी तोंडावर येताच चिपळूण पालिकेचा धडक ॲक्शन मोड; बहादूरशेख नाका ते शिवाजी चौक रस्ता मोकळा करत जप्त केले साहित्य

Gramin Varta
1 Min Read

दापोली : दाभिळ येथे वृद्धाच्या आजारपणाचा गैरफायदा घेत घरातून १२ बोअरची बंदूक लंपास

Gramin Varta
1 Min Read

राजापूर : वाटूळ ब्रिजवर चार चाकीची ट्रकला धडक; चालकावर गुन्हा दाखल

Gramin Varta
1 Min Read

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; २६ नोव्हेंबरला संविधान दिनी कोकण रेल्वे रोखण्याचा इशारा

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

नवऱ्याने कॅप्सूलमधून खाऊ घातले ब्लेडचे तुकडे; न्यायालयात साक्ष फिरवली तरी नवरा ठरला दोषी

3 Min Read
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलिसांकडून सुरक्षा यंत्रणा सतर्क

2 Min Read
महाराष्ट्र

केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय; धान्याऐवजी मिळणारे थेट अनुदान आता महाडीबीटीद्वारे थेट बँक खात्यात होणार जमा

2 Min Read
महाराष्ट्र

युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये भांडारकर संस्थेच्या महाभारत हस्तलिखिताचा समावेश

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?