ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: नवऱ्याने कॅप्सूलमधून खाऊ घातले ब्लेडचे तुकडे; न्यायालयात साक्ष फिरवली तरी नवरा ठरला दोषी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » नवऱ्याने कॅप्सूलमधून खाऊ घातले ब्लेडचे तुकडे; न्यायालयात साक्ष फिरवली तरी नवरा ठरला दोषी
महाराष्ट्र

नवऱ्याने कॅप्सूलमधून खाऊ घातले ब्लेडचे तुकडे; न्यायालयात साक्ष फिरवली तरी नवरा ठरला दोषी

Gramin Varta
Last updated: October 26, 2026 8:05 am
Gramin Varta
220 Views
Share

पुणे : चारित्र्यावर संशय घेऊन ज्या पतीने पत्नीच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न केला, त्याच पतीविरोधात न्यायालयात पत्नीनेच आरोप फेटाळले. मात्र, तिची साक्ष बदलली म्हणून सत्य झाकले गेले नाही. वैद्यकीय पुराव्यांनी या धक्कादायक प्रकारावरचा पडदा दूर केला आणि पत्नीच्या जीवाशी खेळणाऱ्या पतीला अखेर कायद्याचा हिसका बसला. पुण्यातील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला सात वर्षे सक्तमजुरी आणि ७० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी हा निकाल दिला.

सोमनाथ साधू सपकाळ (वय ४५) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत त्याने तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने कॅप्सूलमधून ब्लेडचे तुकडे खायला दिल्याचा प्रकार ऑक्टोबर २०२३ मध्ये उघडकीस आला होता. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पत्नीच्या पोटात अचानक तीव्र वेदना सुरू झाल्यानंतर या अमानुष प्रकाराची भीषणता समोर आली. शौचावाटे ब्लेडचे तुकडे बाहेर पडू लागल्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत तिच्या पोटात ब्लेडचा तुकडा असल्याचे स्पष्ट झाले. तपासादरम्यान पतीने कॅल्शियमच्या गोळ्या असल्याचे भासवून कॅप्सूलमध्ये ब्लेडचे तुकडे भरले आणि ते पत्नीला खायला दिल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

न्यायालयातील सुनावणीदरम्यान या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. पीडित पत्नीने पतीविरोधातील आरोप नाकारत आपसातील वाद मिटल्याचे सांगितले. त्यामुळे ती फितूर झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, पत्नीने आरोप नाकारले म्हणून तिच्या जीवाला निर्माण झालेला धोका आणि वैद्यकीय पुरावे दुर्लक्षित करता येणार नव्हते. सरकारी वकील ॲड. पाठक यांनी न्यायालयात बाजू मांडताना डॉक्टरांच्या साक्षीकडे लक्ष वेधले. पोटात आढळलेला ब्लेडचा तुकडा प्राणघातक ठरू शकत होता आणि त्यामुळे महिलेचा जीव जाण्याची शक्यता होती, असा युक्तिवाद त्यांनी केला. आरोपीच्या दबावामुळे पत्नीने न्यायालयात साक्ष बदलली असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

साक्षीदार फितूर झाला म्हणून त्याची संपूर्ण साक्ष सरसकट फेटाळता येत नाही, ही बाब न्यायालयाने अधोरेखित केली. उपलब्ध वैद्यकीय पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब यांचा विचार करून न्यायालयाने आरोपीविरोधातील गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेतली. पत्नी सध्या आरोपीवर अवलंबून असून त्याच्यासोबत राहत असल्याची परिस्थितीही न्यायालयाने शिक्षेचा निर्णय घेताना विचारात घेतली. त्यामुळे आरोपीला जन्मठेपेऐवजी सात वर्षे सक्तमजुरी आणि ७० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला अखेर वैद्यकीय पुराव्यांमुळे शिक्षा झाली. न्यायालयातील साक्ष बदलली, तरी पुराव्यांपुढे सत्य लपवता येत नाही, हे या निकालातून स्पष्ट झाले.

Total Visitors :

5468407
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राजस्थान रॉयल्सचे रोमी भिंडर आणि आलोक चित्रे उद्या रत्नागिरीत

Gramin Varta
2 Min Read

महामार्ग प्राधिकरणाचा अनागोंदी कारभार! कागदावर ‘प्रोजेक्ट प्लॅन’, प्रत्यक्षात मात्र भलताच प्रकार

Gramin Varta
3 Min Read

लांजा तालुक्यात २०४३ गणरायांना भक्तिमय वातावरणात निरोप; भाविकांचे पाणावले डोळे, पोलिसांचा चोख बंदोबस्त

Gramin Varta
1 Min Read

रेल्वेत रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत चार्जिंग बंद राहणार; आगीच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाचे सर्व विभागांना कडक निर्देश

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

मुंबई ते मेलबर्न: माधुरी दीक्षित यांच्या ‘कोण होणार करोडपती’ची उत्सुकता जगभरात

1 Min Read
महाराष्ट्र

दागिन्यांसाठी केला मावशीचा खून; ४० दिवसांनी भाच्याच्या कृत्याचा पर्दाफाश

3 Min Read
महाराष्ट्र

हायकोर्टाच्या आवाहनानंतरही रोहित पवार आंदोलनावर ठाम; ‘भीमनवारांना हटवल्याशिवाय माघार नाही’

3 Min Read
महाराष्ट्र

राज्यातील पहिले ग्रीन डेटा सेंटर उजनी जलाशयावर

5 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?