ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दागिन्यांसाठी केला मावशीचा खून; ४० दिवसांनी भाच्याच्या कृत्याचा पर्दाफाश
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दागिन्यांसाठी केला मावशीचा खून; ४० दिवसांनी भाच्याच्या कृत्याचा पर्दाफाश
महाराष्ट्र

दागिन्यांसाठी केला मावशीचा खून; ४० दिवसांनी भाच्याच्या कृत्याचा पर्दाफाश

Gramin Varta
Last updated: September 15, 2026 11:10 am
Gramin Varta
23 Views
Share

जळगाव : पारोळा तालुक्यातील करंजी बु. येथून ३ ऑगस्ट रोजी बेपत्ता झालेल्या ८५ वर्षीय वैजंताबाई गणपत माळी यांच्या मृत्यूचे गूढ अखेर ४० दिवसांनंतर उकलले आहे. दागिन्यांच्या हव्यासापोटी सख्ख्या भाच्यानेच त्यांचा खून केल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासातून समोर आले असून, प्रशांत उत्तम माळी (४०, रा. मुकटी, ता. जि. धुळे) याला पोलिसांनी अटक केली आहे.

वैजंताबाई माळी ३ ऑगस्ट रोजी सकाळी घरातून अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यांच्या कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर ९ ऑगस्ट रोजी पारोळा पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली. वैजंताबाई यांच्या अंगावर सोन्या-चांदीचे दागिने असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांच्या बेपत्ता होण्यामागे घातपाताची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला.

एलसीबीने तपासासाठी दोन स्वतंत्र पथके कार्यरत केली. पारोळ्यासह धुळे, अमळनेर, धरणगाव, मुक्ताईनगर, यावल आणि जळगाव परिसरात पोलिसांनी शोधमोहीम राबवली. सुमारे २५० किलोमीटरच्या परिसरात तपास करताना १५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी तपासले. या फुटेजमध्ये ३ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास प्रशांत माळी हा वैजंताबाई यांच्यासोबत असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्या कारमधून जात असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे तपासाची दिशा प्रशांत माळी याच्याकडे वळली.

तब्बल ४० दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी प्रशांतला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली. पोलिसांच्या माहितीनुसार, कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या प्रशांतने वैजंताबाई यांच्या अंगावरील दागिने मिळवण्यासाठी त्यांचा खून करण्याचा कट रचला. शिरसोली येथे नातेवाईकाचा मृत्यू झाल्याचे खोटे सांगून त्याने वैजंताबाईंना कारमध्ये बसवले. त्यानंतर धरणगाव, अमळनेर आणि धुळे परिसरात त्यांना फिरवून दागिने देण्याची मागणी केली.

त्यानंतर धुळे येथील नंदाळे फाट्याजवळ महामार्गावर प्रशांतने रुमालाच्या साहाय्याने वैजंताबाईंचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. खून केल्यानंतर मृतदेह कारच्या डिक्कीत ठेवण्यात आला. दुसऱ्या दिवशी कानळदा फाट्याजवळील सिमेंटच्या चारीत मृतदेह टाकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.

आरोपीच्या जबाबानंतर पोलिसांनी कानळदा फाट्याजवळील परिसरात शोध घेऊन वैजंताबाई यांचा मृतदेह हस्तगत केला. आरोपीने वैजंताबाईंच्या काही दागिन्यांची धरणगाव, अमळनेर आणि धुळे येथील सोनारांकडे विक्री केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. उर्वरित दागिने फागणे परिसरात लपवून ठेवल्याची माहितीही त्याने दिल्याने पोलिसांकडून मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई सुरू आहे.

या प्रकरणी सुरुवातीला BNS कलम १३७ (२) आणि १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासातून खुनाचा प्रकार स्पष्ट झाल्यानंतर खून तसेच पुरावा नष्ट केल्यासंदर्भातील कलमांची वाढ करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पारोळा पोलीस करीत आहेत.

Total Visitors :

5427550
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दापोली चॅम्पियन लीगच्या पहिल्या हंगामावर ‘आय के स्पोर्ट्स’चा कब्जा; ‘बीटीएफ स्टुडिओ’चा ३-० ने पराभव

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीत ७ ग्रॅम ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ जप्त; दोघांवर एनडीपीएसअंतर्गत गुन्हा

Gramin Varta
2 Min Read

Stories of Progress and Potential in Startup Realities

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

गणेशोत्सवाच्या बंदोबस्तातही चिपळूण पोलिसांची कर्तव्यतत्परता; रिक्षाचालकाचा हरवलेला मोबाईल शोधून केला सुपूर्द

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांना मिळणार मोफत सर्वसमावेशक उपचार

3 Min Read
महाराष्ट्र

डावखरे मानहानी खटल्यात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंसह चौघांची निर्दोष मुक्तता

2 Min Read
महाराष्ट्र

एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार १२ हजार रुपये

2 Min Read
महाराष्ट्र

सरकारी रुग्णालयांतील औषधांची होणार गुणवत्ता तपासणी; बनावट औषध रोखण्यासाठी आठ परिमंडळांना अत्याधुनिक तपासणी उपकरणे

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?