ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मातंग समाजाचा सीएसएमटी परिसरात ठिय्या; आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मातंग समाजाचा सीएसएमटी परिसरात ठिय्या; आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र
महाराष्ट्र

मातंग समाजाचा सीएसएमटी परिसरात ठिय्या; आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र

Gramin Varta
Last updated: September 30, 2026 7:56 am
Gramin Varta
17 Views
Share

मुंबई : अनुसूचित जातींच्या १३ टक्के आरक्षणाचे ‘अ, ब, क, ड’ अशा पद्धतीने उपवर्गीकरण करण्याची मागणी प्रलंबित राहिल्याच्या निषेधार्थ मातंग समाजाच्या वतीने मंगळवारी मुंबईत आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनासाठी आझाद मैदानाची परवानगी देण्यात आली होती. मात्र, पोलिसांना गाफील ठेवत आंदोलकांनी सीएसएमटी स्थानक, मुंबई महानगरपालिका मुख्यालय आणि परिसरातील रस्त्यांवर ठिय्या देत वाहतूक रोखली. त्यामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली आहे.

आंदोलकांनी सीएसएमटी परिसरासह मुंबई महानगरपालिका मुख्यालय आणि सेल्फी पॉईंट परिसरात मोठ्या संख्येने गर्दी केली. काही आंदोलक रस्त्यावरच झोपून राहिले, तर काही आंदोलक बेस्टच्या बसवर चढल्याचेही दिसून आले. त्यामुळे सीएसएमटी परिसरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. मंत्रालयाकडे जाणाऱ्या मार्गावरही वाहतूक ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून आंदोलकांना आझाद मैदानात जाण्याची विनंती करण्यात येत आहे. मात्र, आंदोलक आपल्या मागणीवर ठाम असून रस्त्यावरून हटण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.

अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत शासन निर्णय होईपर्यंत मुंबई सोडणार नसल्याची भूमिका मातंग समाजाच्या आंदोलकांनी घेतली आहे. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता असून पोलिसांसमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.

दरम्यान, मातंग समाजाच्या मोर्चात सहभागी होण्यापूर्वीच माजी आमदार रमेश कदम यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी सकाळी सात वाजता ही कारवाई केली. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना मोर्चात सहभागी होण्याची परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईमुळे मातंग समाजातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा शासन निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतल्याने आता प्रशासनाकडून परिस्थिती कशी हाताळली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरीत सागरी सीमा मंचातर्फे स्वच्छ सागर अभियान

Gramin Varta
3 Min Read

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी 6 वर्षांनी गुन्हा दाखल; सामूहिक अत्याचार, हत्येसह कटाचे कलम

Gramin Varta
3 Min Read

Embracing Change Key Milestones in the Current Evolution Era

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

‘जैतापूरचा राजा’ गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’; महिला शेतकरी सन्मान योजनेसह शासकीय योजनांचे मार्गदर्शन

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

नीट पेपरफुटी प्रकरण: लातूरच्या मोटेगावकर कुटुंबाला जबर धक्का; आदित्य मोटेगावकरवर दोन वर्षांची कडक बंदी

2 Min Read
महाराष्ट्र

रायगड – भीषण अपघातात दुचाकीचा अक्षरशः चुराडा; तरुण रक्तबंबाळ

1 Min Read
महाराष्ट्र

राज्यातील शाळांमध्ये २८ हजारांहून अधिक शिक्षकेतर पदे भरण्यास मंजुरी; नवीन नियम जाहीर

2 Min Read
महाराष्ट्र

तीन महिने ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून ११ कोटींहून अधिक रकमेची लूट; सीबीआयकडून दोघांना बेड्या

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?