ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: चिपळूण-गुहागर मार्गावरील कोंढे जुनी शाळा थांब्यावर अपघातांची टांगती तलवार; गतीरोधक बसवण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » चिपळूण-गुहागर मार्गावरील कोंढे जुनी शाळा थांब्यावर अपघातांची टांगती तलवार; गतीरोधक बसवण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष
चिपळूण

चिपळूण-गुहागर मार्गावरील कोंढे जुनी शाळा थांब्यावर अपघातांची टांगती तलवार; गतीरोधक बसवण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष

Gramin Varta
Last updated: October 13, 2026 10:56 am
Gramin Varta
29 Views
Share

चिपळूण: चिपळूण शहरालगत असलेल्या चिपळूण-गुहागर राज्यमार्गावरील कोंढे जुनी शाळा बसथांब्या नजीक दिवसेंदिवस वाढणाऱ्या अनियंत्रित व भरधाव वाहतुकीमुळे प्रवाशांसह स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोंढे आणि शिरळ परिसरातील ग्रामस्थांसाठी अत्यंत वर्दळीच्या मानल्या जाणाऱ्या या ठिकाणी संभाव्य अपघातांचा धोका टाळण्यासाठी तातडीने दोन्ही बाजूंना गतीरोधक बसवावेत, या प्रदीर्घ मागणीकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त नागरिकांनी आता थेट तीव्र रास्ता रोको आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर वसलेल्या या थांब्यावरून चिपळूण मुख्य बाजारपेठ तसेच इतर भागांत जाण्यासाठी नागरिकांची दिवसभर मोठी रेलचेल असते. लगतच दाट नागरी वस्ती, व्यापारी दुकाने तसेच बनमोहल्ला भागातून येणारा उपमार्ग याच ठिकाणी मुख्य रस्त्याला जोडला गेल्याने या भागाला धोकादायक चौकाचे स्वरूप आले आहे. चिपळूण तसेच गुहागरच्या दोन्ही दिशांनी येणाऱ्या वेगवान वाहनांचा अंदाज घेणे पादचारी व वाहनचालकांसाठी अत्यंत अवघड बनले असून, वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांमुळे येथे सतत अपघातसदृश परिस्थिती ओढवत आहे. काही किरकोळ अपघातांच्या घटना घडूनही प्रशासन ढिम्म राहिल्याने परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

रस्त्यावरील सततचे खड्डे आणि वाहनांचा अनिर्बंध वेग यामुळे शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांच्या जिवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. वारंवार निवेदने व विनंत्या करूनही प्रशासकीय यंत्रणा ढिम्म असल्याने एखाद्या मोठ्या जीवितहानीनंतरच यंत्रणेला जाग येणार का, असा रोखठोक सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने जनभावनेची गंभीर दखल घेऊन या थांब्यावर तात्काळ गतिरोधकांची उभारणी करावी, अन्यथा प्रशासकीय दिरंगाईविरोधात रस्त्यावर उतरून वाहतूक रोखून धरण्याचा सक्त इशारा कोंढे व परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

Total Visitors :

5469300
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

लांजा शहरासह तालुक्यात गणरायाचे वाजतगाजत आगमन; भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाला सुरुवात

Gramin Varta
1 Min Read

तौसीफ पांजरी यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती; जयगड-वाटद परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव

Gramin Varta
3 Min Read

पाचल येथे श्रमदानातून वनराई बंधारा; संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार

Gramin Varta
1 Min Read

मालगुंडच्या केशवसुत स्मारकात कोमसापच्या १८ व्या मध्यवर्ती साहित्य संमेलनाची उद्या विशेष नियोजन सभा; लोगो व ध्वजाचे होणार अनावरण

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

चिपळूण

चिपळूण: कापसाळ येथे दुचाकी घसरून महिला जखमी

1 Min Read
चिपळूण

दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमध्ये महिला व मुलींचे छुप्या पद्धतीने फोटो काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकावर रेल्वे पोलिसांची कारवाई

2 Min Read
चिपळूण

Apple’s iPhone Revolution Takes a Green Turn with Sustainable Materials

7 Min Read
चिपळूण

चिपळूण : खेर्डी येथून ४० वर्षीय महिला बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?