ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: एनसीएमसी कार्ड वाटपाचा रत्नागिरीत पुरता बोजवारा; तांत्रिक गोंधळ अन् संथ कारभारामुळे ज्येष्ठ नागरिकांचे अतोनात हाल, प्रवाशांमध्ये संताप
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » एनसीएमसी कार्ड वाटपाचा रत्नागिरीत पुरता बोजवारा; तांत्रिक गोंधळ अन् संथ कारभारामुळे ज्येष्ठ नागरिकांचे अतोनात हाल, प्रवाशांमध्ये संताप
रत्नागिरी

एनसीएमसी कार्ड वाटपाचा रत्नागिरीत पुरता बोजवारा; तांत्रिक गोंधळ अन् संथ कारभारामुळे ज्येष्ठ नागरिकांचे अतोनात हाल, प्रवाशांमध्ये संताप

Gramin Varta
Last updated: September 30, 2026 10:37 am
Gramin Varta
52 Views
Share

रत्नागिरी: रत्नागिरी मध्यवर्ती बस स्थानकातील केंद्रावर एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी आणि प्रत्यक्ष कार्ड वितरण प्रक्रियेला लागलेली तांत्रिक अडचणींची कीड प्रवाशांच्या मुळावर आली आहे. प्रशासनाचा कमालीचा संथ कारभार, वारंवार डाऊन होणारा सर्व्हर आणि तासनतास ताटकळत उभे राहणाऱ्या नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारी व्यवस्था यामुळे सामान्य नागरिकांसह विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. नोंदणी करून महिना उलटला तरी कार्ड हातात न पडल्याने लोकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे.

स्थानिक रहिवासी उज्ज्वला विपुल गुप्ते यांनी व्यवस्थेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, कार्डसाठी नोंदणी करून महिना लोटला आहे. शनिवारी कार्ड घेण्यासाठी बोलावल्यानंतर त्या केंद्रावर गेल्या; मात्र त्यानंतर शुक्रवारी व १४ तारखेला अशा लागोपाठ चकरा मारूनही कार्ड ॲक्टिव्हेट होत नसल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून त्या पुन्हा केंद्रावर ताटकळत थांबल्या, तरी दुपारी दीड वाजेपर्यंत त्यांचा नंबर आलाच नाही. त्यातच संबंधित कर्मचारी जेवणाच्या सुट्टीसाठी निघून गेल्यामुळे रांगेतील सामान्य नागरिकांना केवळ हताशपणे वाट पाहत उभे राहावे लागले.

मानसी वैद्य या दुसऱ्या एका महिलेनेही आपली कैफियत मांडताना सांगितले की, त्या कार्ड काढण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून सतत चकरा मारत आहेत. पंधरा-वीस दिवसांपूर्वी आल्या असताना सर्व्हर डाऊन असल्याचे कारण सांगून त्यांना माघारी धाडण्यात आले. सध्या अनेक नागरिक पहाटे ६ वाजल्यापासून रांगेत उभे राहत असून, काही जण सकाळी ११ वाजेपासून रांगेत ताटकळत आहेत. गर्दीच्या वेळेत अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून काम जलद गतीने मार्गी लावावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

वयस्कर आणि ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक त्रास सहन करत तासनतास रांगेत उभे राहावे लागत असल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. रत्नागिरी मध्यवर्ती बस स्थानकातील या केंद्रावरील अनागोंदीमुळे जनतेचा अत्यंत मौल्यवान वेळ वाया जात असून, वरिष्ठ प्रशासनाने तातडीने या तांत्रिक त्रुटी दूर करून योग्य सोयी-सुविधा पुरवाव्यात आणि ही संपूर्ण प्रक्रिया जलद व सुलभ करावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

सीएसएमटी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ – १५ वर पुनर्विकास कामासाठी ७५ दिवसांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

Gramin Varta
2 Min Read

मालगुंड ग्रामपंचायतीत जयगड पोलिसांचा सायबर जनजागृती उपक्रम; ‘मिशन प्रबोधन’ अंतर्गत नागरिकांशी थेट संवाद

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी : लॉजच्या आवारातील क्रूझर पेटवल्याप्रकरणी एकावर गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरीत मारुती मंदिर परिसरामध्ये भीषण अपघात; रस्ता ओलांडताना वृद्धाला दुचाकीची धडक, प्रकृती गंभीर

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरीत हेरॉईनसदृश अंमली पदार्थासह दोघे ताब्यात; १ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

2 Min Read
रत्नागिरी

राजीवडा समुद्रात महाकाय लाटेच्या तडाख्याने नौका उलटली; आठ मच्छीमार बचावले

2 Min Read
रत्नागिरी

फसवणूक झाल्यास तत्काळ १९३० वर संपर्क साधण्याचे सायबर पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांचे आवाहन

3 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत ऊन-पावसाच्या लपंडावात आरोग्य धोक्यात; रुग्णालयांत रांगा

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?