ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: सावर्डे येथील सह्याद्री पॉलिटेक्निकमध्ये ‘युवा उद्योजकता व शासकीय कर्ज योजना’ मार्गदर्शन मेळावा संपन्न
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » सावर्डे येथील सह्याद्री पॉलिटेक्निकमध्ये ‘युवा उद्योजकता व शासकीय कर्ज योजना’ मार्गदर्शन मेळावा संपन्न
चिपळूण

सावर्डे येथील सह्याद्री पॉलिटेक्निकमध्ये ‘युवा उद्योजकता व शासकीय कर्ज योजना’ मार्गदर्शन मेळावा संपन्न

Gramin Varta
Last updated: October 17, 2026 9:39 am
Gramin Varta
23 Views
Share

सावर्डे : आजच्या बदलत्या आर्थिक परिस्थितीत शासकीय व खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांच्या संधी मर्यादित होत असताना तरुणांनी केवळ नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचे स्टार्टअप व उद्योगधंदे उभारून स्वावलंबी व्हावे, या उद्देशाने सह्याद्री पॉलिटेक्निकच्या प्रांगणात विशेष मार्गदर्शन मेळावा पार पडला. मराठा सेवा संघ (रत्नागिरी जिल्हा) आणि सावर्डे येथील सह्याद्री पॉलिटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवा उद्योजकता आणि शासकीय कर्ज योजना मार्गदर्शन मेळावा’ अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य समृद्ध करण्यासाठी आरमार, जहाजबांधणी, व्यापार आणि शेतीला मोठी चालना दिली होती, तोच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कोकणातील सुशिक्षित तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे, असे प्रतिपादन प्राचार्य भोसले यांनी उद्घाटनप्रसंगी केले.

या मेळाव्यात जिल्हा उद्योग केंद्र आणि विविध शासकीय महामंडळांच्या वतीने विद्यार्थ्यांना उपलब्ध कर्ज योजनांचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सहाय्यक उद्योग अधिकारी अर्चना सकपाळ यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत (सीएमईजीपी) ग्रामीण भागात ३५ टक्के आणि शहरी भागात २५ टक्के अनुदान उपलब्ध असल्याचे नमूद करत सेवा क्षेत्रासाठी ५० लाखांपर्यंत तर उत्पादन क्षेत्रासाठी एक कोटी रुपयांपर्यंत कर्जमर्यादा दिली जात असल्याची माहिती दिली. यासोबतच पीएमईजीपी, २५ लाखांपर्यंतची बीज भांडवल योजना आणि दहापेक्षा अधिक उद्योजकांनी एकत्र येऊन सुरू करावयाच्या क्लस्टर विकास योजनेचे फायदे समजावून सांगण्यात आले.

कार्यक्रमात मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. नवनाथ घाडगे पाटील यांनी मार्गदर्शन करताना, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसारख्या (डीएमआयसी) मोठ्या प्रकल्पांमुळे माणगावसह लगतच्या कोकण पट्ट्यात प्रचंड औद्योगिक संधी निर्माण होत असून मुबलक साधनसंपत्तीच्या बळावर तरुणांनी उद्योजक बनून परिवर्तनाचे शिलेदार व्हावे, असा सल्ला दिला. तर प्रदेश उपाध्यक्ष इंजिनिअर संजय देसाई यांनी स्थानिक फणस, आंबा यांसारख्या शेतीमालावर प्रक्रिया उद्योग उभारून आणि नाविन्यपूर्ण ब्रँडिंगच्या जोरावर स्थानिक उत्पादने थेट जागतिक बाजारपेठेत पोहोचवण्याचे आवाहन केले. या मार्गदर्शन शिबिरास संस्थेतील विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, जिल्ह्यातील नवउद्योजक व्यावसायिक आणि शेकडो विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर शेवटी प्राचार्य भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Total Visitors :

5469303
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरीत हेरॉईनसदृश अंमली पदार्थासह दोघे ताब्यात; १ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

Gramin Varta
2 Min Read

एसआयआर प्रक्रिया रद्द करून नव्याने करा; बॅलेट पेपरसाठी सर्व पक्षांनी आंदोलन उभारावे – राज ठाकरे

Gramin Varta
2 Min Read

ऐन दिवाळीत महागाईचा भडका; टीव्ही, गिझरसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मिठाई महागल्याने सामान्यांच्या खिशाला झळ

Gramin Varta
2 Min Read

वनप्लसचा बजेट स्मार्टफोन ‘एन६ लाइट ४जी’ लाँच

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

चिपळूण

पडिक पाण्याच्या टाकीत अडकलेल्या मगरीच्या पिल्लाची सुटका

1 Min Read
चिपळूण

चिपळूण: शिरगाव ग्रामपंचायतीत १ लाख ४३ हजारांचा अपहार; करवसुलीची रक्कम स्वतःसाठी वापरणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

2 Min Read
चिपळूण

चिपळूण रेल्वे स्थानकावर होमगार्डच्या प्रसंगावधानाने प्रवाशाचा जीव वाचला; युवासेनेकडून रोहित चिले यांचा सन्मान

2 Min Read
चिपळूण

लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील भीषण पाणीटंचाई रोखण्यासाठी एमआयडीसी वाशिष्ठी नदीत कच्चा बंधारा उभारणार

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?