ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: पडिक पाण्याच्या टाकीत अडकलेल्या मगरीच्या पिल्लाची सुटका
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » पडिक पाण्याच्या टाकीत अडकलेल्या मगरीच्या पिल्लाची सुटका
चिपळूण

पडिक पाण्याच्या टाकीत अडकलेल्या मगरीच्या पिल्लाची सुटका

Gramin Varta
Last updated: September 18, 2026 6:57 pm
Gramin Varta
24 Views
Share

अलोरे-नागावे येथे वन विभागाच्या पथकाची तत्पर कारवाई; नैसर्गिक अधिवासात केले मुक्त

चिपळूण : तालुक्यातील अलोरे-नागावे येथील पालांडेवाडी येथे पाणी नसलेल्या पडिक पाण्याच्या टाकीत अडकलेल्या मगरीच्या पिल्लाची वन विभागाच्या बचाव पथकाने सुरक्षित सुटका केली. अंदाजे तीन फूट लांबीचे हे मगरीचे पिल्लू सुस्थितीत असून, प्राथमिक पाहणीनंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

१७ सप्टेंबर रोजी श्री. सुविनंद पालांडे यांच्या घरासमोरील पाणी नसलेल्या पडिक टाकीत मगरीचे पिल्लू पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही टाकी सुमारे पाच ते सहा फूट खोल असल्याने मगरीच्या पिल्लाला बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता. पालांडे यांनी तातडीने वन विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर चिपळूण वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांच्याशी संपर्क करण्यात आला.

माहिती मिळताच वन्यप्राणी बचाव पथकातील वनरक्षक राहुल गुंठे आणि पथकाचे सदस्य अजय बदाडे घटनास्थळी दाखल झाले. टाकीची पाहणी केल्यानंतर बचाव पथकाने मगरीच्या पिल्लाला सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर त्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करून प्राथमिक तपासणी करण्यात आली. मगरीचे पिल्लू सुस्थितीत असल्याची खात्री झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

हे बचावकार्य विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. वनरक्षक राहुल गुंठे आणि बचाव पथकाचे सदस्य अजय बदाडे यांनी या बचावकार्यात सहभाग घेतला.

Total Visitors :

5427562
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

अभिषेक शर्मा टी-२० सामन्यात सर्वात जलद शतक झळकावणारा भारतीय फलंदाज

Gramin Varta
2 Min Read

देवरुख : सायबर फसवणुकीतील रक्कम स्वीकारून दुसऱ्याला ट्रान्स्फर करणाऱ्यावर गुन्हा

Gramin Varta
2 Min Read

पडिक पाण्याच्या टाकीत अडकलेल्या मगरीच्या पिल्लाची सुटका

Gramin Varta
1 Min Read

वंदे मातरम याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

चिपळूण

चिपळूण तालुक्यात अवैध दारूधंद्यांवरील कारवाई कागदावरच; प्रशासनाला दिलेल्या मुदतीनंतर २ ऑक्टोबरला आत्मदहनाचा इशारा

2 Min Read
चिपळूण

गरजू महिलांना स्वयंरोजगाराचे बळ; भाजप चिपळूण शहर मंडलातर्फे घरघंटी व शिलाई मशीनचे वाटप

3 Min Read
चिपळूण

गणेशोत्सवापूर्वी चिपळूणच्या रस्त्यांची डागडुजी करा

2 Min Read
चिपळूण

A Close-Up on Trailblazing Startups and Their Journeys

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?