ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: चिपळूण: शिरगाव ग्रामपंचायतीत १ लाख ४३ हजारांचा अपहार; करवसुलीची रक्कम स्वतःसाठी वापरणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » चिपळूण: शिरगाव ग्रामपंचायतीत १ लाख ४३ हजारांचा अपहार; करवसुलीची रक्कम स्वतःसाठी वापरणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल
चिपळूण

चिपळूण: शिरगाव ग्रामपंचायतीत १ लाख ४३ हजारांचा अपहार; करवसुलीची रक्कम स्वतःसाठी वापरणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

Gramin Varta
Last updated: October 14, 2026 12:10 pm
Gramin Varta
244 Views
Share

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील करवसुलीच्या शासकीय रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून तब्बल १ लाख ४३ हजार ६९ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत शिरगाव ग्रामपंचायत कार्यालयात हा गैरव्यवहार घडला असून, याप्रकरणी नीता निलेश शिंदे (वय ३३, रा. पाटीलवाडी, शिरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक १२६/२०२६ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ४०८ आणि ३४ नुसार गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणात धनंजय दत्ताराम सोलकर (वय ३३), दिनेश दत्ताराम धागडे (वय ४२) आणि श्रीकृष्ण गंगाराम कदम (वय ५०, सर्व रा. शिरगाव, ता. चिपळूण) या तिघांवर फौजदारीपात्र न्यासभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने या तिघांवर गावातील ग्रामस्थांकडून घरपट्टी, पाणीपट्टी आणि वीज कर वसूल करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. नियमानुसार वसूल केलेली सर्व रक्कम ग्रामपंचायतीच्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा शिरगाव येथील बचत खाते क्रमांक १४०२००६०२०७०४ वर तातडीने जमा करणे बंधनकारक होते. मात्र, संशयित आरोपींनी ग्रामस्थांकडून गोळा केलेली १ लाख ४३ हजार ६९ रुपयांची रक्कम शासकीय खात्यात जमा न करता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सुमारे सात महिने स्वतःजवळ बाळगून तिचा वापर करत निधीचा अपहार केला.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडील विविध परिपत्रके आणि शुद्धिपत्रकांनुसार ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांत झालेली ही गंभीर अनियमितता आणि निधीचा झालेला अपहार तपासात समोर आला आहे. शासकीय कामाचा गैरफायदा घेऊन करदात्यांच्या पैशांवर डल्ला मारल्याचे निष्पन्न झाल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, अलोरे शिरगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

Total Visitors :

5469304
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Gramin Varta
4 Min Read

चिपळूण नगरपरिषदेसमोर वाहतुकीला अडथळा; पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

अंडर-१९ आशिया चषक : भारताचा नेपाळवर १० गडी राखून दणदणीत विजय

Gramin Varta
2 Min Read

कोकणातल्या ‘या’ गावात माणसांसाठी नव्हे तर चक्क गिधाडांसाठी गेल्या २४ वर्षांपासून डीजेला बंदी

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

चिपळूण

दहिवली बुद्रुकमधील घाग बंधूंचा जलक्रांतीचा आदर्श; १६ वर्षांत शेकडो वनराई बंधारे बांधून वन्यजीवांचीही भागवली तहान

2 Min Read
चिपळूण

चिपळूणमध्ये २७ वर्षीय विवाहित परिचारिकेची राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या; शहरात खळबळ

1 Min Read
चिपळूण

सावर्डे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते भूमिपूजन

2 Min Read
चिपळूण

सावर्डेच्या स्वराज जोशीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्णभरारी; मंगळूर येथील १० किमी क्रॉस कंट्री स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?