ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: सावर्डेच्या स्वराज जोशीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्णभरारी; मंगळूर येथील १० किमी क्रॉस कंट्री स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » सावर्डेच्या स्वराज जोशीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्णभरारी; मंगळूर येथील १० किमी क्रॉस कंट्री स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक
चिपळूण

सावर्डेच्या स्वराज जोशीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्णभरारी; मंगळूर येथील १० किमी क्रॉस कंट्री स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक

Gramin Varta
Last updated: November 7, 2026 11:31 am
Gramin Varta
100 Views
Share

डेरवणच्या SVJCT स्पोर्ट्स अकॅडमीतील प्रशिक्षक अविनाश पवार यांच्या मार्गदर्शनाला यश; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

सावर्डे ( विनायक सावंत) : चिपळूण तालुक्यातील सावर्डे, जोशीवाडी येथील गुणवंत युवा धावपटू स्वराज संदीप जोशी याने आपल्या अथक परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर राष्ट्रीय क्रीडा पटलावर सुवर्ण अक्षरांनी नाव कोरले आहे. मंगळूर येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रतिष्ठित ‘ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप २०२६-२७’ या राष्ट्रीय स्पर्धेत स्वराजने उत्कृष्ट कामगिरीची नोंद करत १० किलोमीटर अंतराची अत्यंत चुरशीची क्रॉस कंट्री शर्यत विक्रमी वेळेत पूर्ण केली आणि थेट सुवर्णपदकाला गवसणी घातली. राष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या या नेत्रदीपक यशामुळे सावर्डे पंचक्रोशीसह संपूर्ण चिपळूण तालुका आणि कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

ग्रामीण भागातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत राष्ट्रीय पातळीवर स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या स्वराजच्या या यशामागे त्याचे नियमित कष्ट आणि उच्च दर्जाची शिस्त कारणीभूत ठरली आहे. धावण्याच्या स्पर्धेसाठी लागणारी शारीरिक क्षमता, वेग, प्रचंड सहनशक्ती आणि मानसिक एकाग्रता यांचा सुरेख मेळ त्याने ट्रॅकवर दाखवून दिला. मंगळूर येथील खडतर मार्गावर १० किलोमीटरचे अंतर लीलया पार करत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून त्याने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. स्वराज हा डेरवण येथील नामांकित ‘एसव्हीजेसीटी’ (SVJCT) स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये क्रीडा प्रशिक्षक अविनाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज कठोर सराव करत आहे. खेळाडूची अचूक क्षमता ओळखून त्याला योग्य दिशा देणे, धावण्याच्या तंत्रात परिपूर्णता आणणे आणि आत्मविश्वास वाढवणे यात प्रशिक्षक अविनाश पवार यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले असून, या सुवर्ण यशाबद्दल पवार सरांचेही क्रीडा वर्तुळातून विशेष कौतुक होत आहे. एका खेळाडूच्या प्रतिभेला दर्जेदार प्रशिक्षणाची जोड मिळाल्यास ग्रामीण भागातील मुलेही राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक मजल मारू शकतात, हेच स्वराजने या यशातून सिद्ध केले असून त्याच्या कामगिरीमुळे परिसरातील नवोदित खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळाली आहे.

दरम्यान, सावर्डेच्या मातीतील सुपुत्राने राष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्याचे सर्व स्तरातून जोरदार स्वागत व कौतुक होत आहे. आमदार शेखर निकम, जिल्हा परिषद सदस्या पूजाताई निकम, पंचायत समिती सदस्य शौकत माखजनकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत चव्हाण, संजय चव्हाण, देवराज गरगटे, अशोक काजोरोलकर, प्रितेश मोहिते, मंदार शेंबेकर आणि शांताराम बागवे यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी स्वराज जोशी आणि त्याचे प्रशिक्षक अविनाश पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. स्वराजने भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरही अशीच उज्ज्वल कामगिरी करून देशाचे आणि कोकणाचे नाव जगभरात झळकवावे, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

Total Visitors :

5468551
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राज्यात परतीचा पाऊस पुन्हा सक्रिय होणार; पंजाबराव डख यांच्यासह हवामान विभागाचा अंदाज

Gramin Varta
2 Min Read

दिवाळीच्या बाजारात ‘फर्जी’ स्टाईल बनावट नोटा खपवण्याचा डाव पोलिसांनी उधळला;हायटेक सॉफ्टवेअरने पाचशेच्या नोटा छापणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड

Gramin Varta
3 Min Read

अभिजात भाषा आंतरराष्ट्रीय परिषद व केंद्रीय साहित्य संमेलनाच्या तयारीसाठी मालगुंडमध्ये ‘कोमसाप’ची विशेष सभा संपन्न

Gramin Varta
2 Min Read

चिपळूण : कादवड येथे कौटुंबिक वादातून भावावर लाकडी दांडक्याने हल्ला; डोके फोडून जीवे मारण्याची धमकी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

चिपळूण

चिपळूण पोलिसांची ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत मोठी कारवाई; खेर्डीतून सव्वासात लाखांच्या मेफेड्रोनसह संशयित गजाआड

1 Min Read
चिपळूण

कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षेत वाढ करण्याची गरज; दिवेआगार दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे आवाहन

1 Min Read
चिपळूण

Keyboard Startup Introduces Innovative Layout for Enhanced Productivity

7 Min Read
चिपळूण

शेतकऱ्यांसाठी दुष्काळ, मग व्यापाऱ्यांसाठी काय?; चिपळूण व्यापारी महासंघटनेचा शासनाला रोखठोक सवाल, स्थानिक खरेदीसाठी बाजारपेठेत उभारल्या आकर्षक कमानी

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?