ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: अभिजात भाषा आंतरराष्ट्रीय परिषद व केंद्रीय साहित्य संमेलनाच्या तयारीसाठी मालगुंडमध्ये ‘कोमसाप’ची विशेष सभा संपन्न
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » अभिजात भाषा आंतरराष्ट्रीय परिषद व केंद्रीय साहित्य संमेलनाच्या तयारीसाठी मालगुंडमध्ये ‘कोमसाप’ची विशेष सभा संपन्न
रत्नागिरी

अभिजात भाषा आंतरराष्ट्रीय परिषद व केंद्रीय साहित्य संमेलनाच्या तयारीसाठी मालगुंडमध्ये ‘कोमसाप’ची विशेष सभा संपन्न

Gramin Varta
Last updated: October 6, 2026 5:23 pm
Gramin Varta
84 Views
Share

गणपतीपुळे (वैभव पवार): रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) शाखेची विशेष सभा नुकतीच कविवर्य केशवसुत स्मारक सभागृहात उत्साहात पार पडली. कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत रत्नागिरीत होणारी अभिजात भाषा आंतरराष्ट्रीय परिषद आणि मालगुंड येथे नियोजित केंद्रीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

रत्नागिरी येथे दिनांक २३, २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी अभिजात भाषा आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेनिमित्त २५ ऑक्टोबर रोजी देशभरातील विविध राज्यांतील अकरा भाषांचे प्रतिनिधी तसेच सुमारे अडीचशे ते तीनशे मान्यवरांचे पथक कविवर्य केशवसुत स्मारकाला भेट देणार आहे. या संपूर्ण प्रतिनिधीमंडळाचे मालगुंडमध्ये जल्लोषी आणि खास कोकणी संस्कृतीनुसार पारंपरिक आदरातिथ्य करत भव्य स्वागत करण्याचा निर्णय या सभेत एकमुखाने घेण्यात आला. तसेच या आंतरराष्ट्रीय परिषदेला मालगुंड शाखेच्या सर्व सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले.

याशिवाय दिनांक २७, २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी मालगुंड येथे होणाऱ्या केंद्रीय मराठी साहित्य संमेलनाचे बिगुल वाजले असून, त्यादृष्टीने स्थानिक पातळीवर नियोजनबद्ध आखणी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी सन २०११ मध्ये केंद्रीय मराठी साहित्य संमेलन मालगुंड नगरीत यशस्वीरीत्या पार पडले होते. त्यानंतर तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा हा बहुमान कविवर्य केशवसुत स्मारकाला मिळाला असल्याची माहिती अध्यक्ष गजानन पाटील यांनी दिली.

दरम्यान, मालगुंड येथील ‘पुस्तकांचे गाव’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत गावात लवकरच नवीन दालने सुरू करण्याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. ही नवीन दालने तातडीने कार्यान्वित करण्यासाठी संबंधित दालनधारकांना मार्गदर्शक सूचना देऊन प्रत्यक्ष तयारी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. या सभेला कोमसापचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, मालगुंड शाखेचे सचिव विलास राणे, कोमसाप दक्षिण युवा शक्तीचे प्रमुख अरुण मोर्ये, रामानंद लिमये, डॉ. संतोष केळकर, हनुमंत कदम, वैभव पवार, मोरेश्वर मुळ्ये, शुभदा मुळ्ये, उज्वला बापट, गणपतीपुळे भक्तनिवासचे व्यवस्थापक अजिंक्य जाधव तसेच नवीन दालनधारक व विविध मान्यवर उपस्थित होते.

Total Visitors :

5468453
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दिवेआगार समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Gramin Varta
2 Min Read

चाफेरी सहानवाडीत १५ वर्षांपासून कोजागिरी पौर्णिमा व दीपोत्सवाची परंपरा कायम

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी शहरात अंधारात दबा धरून बसलेल्यावर संशयितावर गुन्हा

Gramin Varta
2 Min Read

रायगडमध्ये बांबू उद्योगाचे नवे मॉडेल; अडीच एकर लागवडीसाठी सात लाखांचे अनुदान

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची यशस्वी मोहोर

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी: खेडशी येथील २० वर्षीय तरुणाचे अपहरण; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

1 Min Read
रत्नागिरी

‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’चे अर्ज ‘महाडीबीटी २.०’ प्रणालीवर सुरू; २४ योजनांचा लाभ घेण्याचे मत्स्यव्यवसाय मंत्र्यांचे आवाहन

2 Min Read
रत्नागिरी

कुवारबाव येथे भरधाव डंपरची दुचाकीला धडक; १९ वर्षीय तरुण जखमी, चालक फरार

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?