ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’चे अर्ज ‘महाडीबीटी २.०’ प्रणालीवर सुरू; २४ योजनांचा लाभ घेण्याचे मत्स्यव्यवसाय मंत्र्यांचे आवाहन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’चे अर्ज ‘महाडीबीटी २.०’ प्रणालीवर सुरू; २४ योजनांचा लाभ घेण्याचे मत्स्यव्यवसाय मंत्र्यांचे आवाहन
रत्नागिरी

‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’चे अर्ज ‘महाडीबीटी २.०’ प्रणालीवर सुरू; २४ योजनांचा लाभ घेण्याचे मत्स्यव्यवसाय मंत्र्यांचे आवाहन

Gramin Varta
Last updated: November 4, 2026 2:44 pm
Gramin Varta
54 Views
Share

रत्नागिरी : राज्यातील मत्स्यव्यवसायिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि मत्स्यशेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक आधार मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ संपूर्ण राज्यात लागू केली आहे. या योजनेअंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाच्या लाभार्थीभिमुख २४ योजनांसाठी ‘महाडीबीटी २.०’ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेती उत्पन्नातील अनिश्चिततेच्या काळात शेतकऱ्यांना, विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांना उत्पन्नाचा पूरक स्रोत उपलब्ध व्हावा, यासाठी जास्तीत जास्त मत्स्यशेतकरी व मच्छीमारांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री यांनी केले आहे.

शासनाने भूजलाशयीन, निमखारे पाणी आणि सागरी मत्स्यव्यवसायाशी संबंधित विविध योजनांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी राज्य व जिल्हास्तरीय अशा एकूण २८ योजनांचा सर्वसमावेशक आढावा घेतला. यापैकी ४ राज्यस्तरीय, १८ जिल्हास्तरीय आणि सुधारित २ जिल्हास्तरीय अशा एकूण २४ योजनांसाठी ‘महाडीबीटी २.०’ प्रणालीवरून पारदर्शक व सुलभ पद्धतीने ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. प्रशासकीय प्रक्रियेचे सुलभीकरण करणे, अनावश्यक कागदपत्रांची पूर्तता कमी करून कामाला गती देणे आणि डिजिटल सेवा पुरवणे या उद्देशाने या योजनांचे पुनर्गठन करण्यात आले आहे.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी सर्वप्रथम महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन प्राथमिक नोंदणी करत स्वतःचा ‘महा आयडी’ (Maha ID) प्राप्त करायचा आहे. त्यानंतर पोर्टलवर लॉग-इन करून वैयक्तिक माहिती भरून आपले प्रोफाइल अद्ययावत करावे लागेल. प्रोफाइल पूर्ण झाल्यानंतर संबंधितांनी ‘Apply for Scheme’ या पर्यायावर जाऊन ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ निवडावी आणि आवश्यक कागदपत्रांसह आपला अर्ज सादर करावा, अशी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.

दरम्यान, योजनेबाबत सविस्तर माहिती मिळावी तसेच अर्ज भरताना शेतकऱ्यांना व मच्छीमारांना तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यासाठी मत्स्यव्यवसाय जिल्हा कार्यालयात ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. तांत्रिक मदतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी कार्यालयातील संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र मत्स्यव्यवसायिक, मत्स्यशेतकरी आणि मच्छीमारांनी विहित नियमांनुसार आवश्यक कागदपत्रांसह वेळेत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

Total Visitors :

5469270
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

लांजा : नौशाद नेवरेकर यांची मस्जिद ए अब्बास ट्रस्टच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

Gramin Varta
1 Min Read

हर्णे सागरी किनाऱ्यावर दोन फिनलेस पॉर्पोईज मृतावस्थेत आढळले; मृत्यूचे कारण अस्पष्ट

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी: लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करणाऱ्या संशयिताला ३ दिवसांची पोलीस कोठडी

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरी: कोळंबेतील डोहात बुडून कल्याणच्या दोन क्रिकेटपटूंचा मृत्यू; क्रिकेट सामना संपल्यानंतर पोहण्याचा मोह ठरला जीवघेणा

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरीत १ किलो २९१ ग्रॅम गांजा जप्त; ८० हजारांच्या मुद्देमालासह तरुण ताब्यात

2 Min Read
रत्नागिरी

मोकाट जनावरे, अंधारे रस्ते आणि पुसलेल्या साईड पट्ट्या; शहराच्या सुरक्षिततेसाठी वंचित बहुजन आघाडीचे नगर परिषदेला निवेदन

3 Min Read
रत्नागिरी

सरदार पटेल जयंतीनिमित्त रत्नागिरी पोलिसांतर्फे ‘सायबर सुरक्षा एकता दौड’ संपन्न; नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : कोकण नगरमधून मतिमंद तरुणाचे अपहरण; शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?