ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: हर्णे सागरी किनाऱ्यावर दोन फिनलेस पॉर्पोईज मृतावस्थेत आढळले; मृत्यूचे कारण अस्पष्ट
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » हर्णे सागरी किनाऱ्यावर दोन फिनलेस पॉर्पोईज मृतावस्थेत आढळले; मृत्यूचे कारण अस्पष्ट
दापोली

हर्णे सागरी किनाऱ्यावर दोन फिनलेस पॉर्पोईज मृतावस्थेत आढळले; मृत्यूचे कारण अस्पष्ट

Gramin Varta
Last updated: September 18, 2026 7:14 pm
Gramin Varta
33 Views
Share

दापोली : समुद्राच्या अथांग पाण्यातील दुर्मीळ समुद्री सस्तन प्राण्यांचे अस्तित्व अधोरेखित करणाऱ्या हर्णे किनाऱ्यावर एकाच दिवशी दोन ‘इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉर्पोईज’ मृतावस्थेत वाहून आल्याने पर्यावरण व सागरी जीवप्रेमींमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. हर्णे बंदरातील एम. एम. फिशरीजसमोर एक नर जातीचा मृतदेह, तर हर्णे बायपाससमोरील समुद्रकिनाऱ्यावर दुसरे लहान पिल्लू अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी गुरुवारी सकाळी हे मृत प्राणी आढळून आले. हर्णे कांदळवन विभागाचे प्रमुख फहद जमादार यांच्या निदर्शनास हा प्रकार सर्वप्रथम आल्यानंतर त्यांनी तत्काळ वनविभागाला याबाबत पाचारण केले.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुकुंद लोंढे यांनी घटनास्थळी दाखल होत बंदरात आढळलेल्या प्राण्याचे शवविच्छेदन केले. मात्र, या दोन्ही प्राण्यांचा मृत्यू सुमारे आठ ते दहा दिवसांपूर्वीच झाला असल्याचा संशय असून, मृतदेहांची झालेली दुरवस्था आणि मृत्यूस झालेला मोठा कालावधी यामुळे त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतरही स्पष्ट होऊ शकलेले नाही, असे डॉ. लोंढे यांनी सांगितले. मोठ्या जहाजाचा धक्का बसल्याने अथवा मासेमारीच्या जाळ्यात अडकल्यामुळे या दुर्मीळ जीवांचा दुर्दैवी अंत झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

शवविच्छेदनाची आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही मृत प्राण्यांना समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत खोल खड्डा करून सन्मानपूर्वक पुरण्यात आले. या मोहिमेदरम्यान खेडचे कांदळवन विभागाचे अधिकारी अक्षय ढाकणे, विश्वंभर झाडे, वनरक्षक सोनाली हसे, प्रभू साबणे, माजी ग्रामपंचायत सदस्या सना काझी, मुजम्मिल काझी तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेष म्हणजे, फिनलेस पॉर्पोईज हा सामान्य डॉल्फिन नसून समुद्री सस्तन प्राण्यांच्या स्वतंत्र पॉर्पोईज वर्गातील जीव आहे. डॉल्फिनप्रमाणे पाठीवर स्पष्ट पृष्ठीय पर नसणे हे याचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीसह महाराष्ट्राच्या सागरकिनारी या प्रजातीच्या नोंदी यापूर्वीही आढळल्या असून, अशा अत्यंत दुर्मीळ प्राण्यांचा अशा रीतीने संशयास्पद मृत्यू होणे ही सागरी जैवविविधतेच्या दृष्टीने गंभीर आणि चिंताजनक बाब मानली जात आहे.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

A Comprehensive Look at the Current State of Technological Evolution

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी २.० पोर्टल तातडीने सुरू करा

Gramin Varta
2 Min Read

तृणमूल काँग्रेसचे नाव व निवडणूक चिन्ह गोठवले; ममता -ऋतब्रत गटांकडून निवडणूक आयोगाकडे पर्यायी नावे सादर

Gramin Varta
4 Min Read

दिशा सालियन प्रकरणात सीबीआयच्या एफआयआरनंतर नवा कायदेशीर संघर्ष; सतीश सालियन थेट ‘मातोश्री’वर बजावणार मानहानीची नोटीस

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

दापोली

भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पावरून दापोलीत राजकीय वातावरण तापले; ठाकरे शिवसेनेचा कडाडून विरोध

2 Min Read
दापोली

दापोलीतील बीएसएनएल कार्यालय फोडून ७ हजारांची डीसी केबलची चोरी

1 Min Read

Hello world!

0 Min Read
दापोली

दापोली चॅम्पियन लीगच्या पहिल्या हंगामावर ‘आय के स्पोर्ट्स’चा कब्जा; ‘बीटीएफ स्टुडिओ’चा ३-० ने पराभव

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?