ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: हर्णे समुद्रात बेपत्ता खलाशाचा मृतदेह सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ आढळला; दापोली पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » हर्णे समुद्रात बेपत्ता खलाशाचा मृतदेह सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ आढळला; दापोली पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
दापोली

हर्णे समुद्रात बेपत्ता खलाशाचा मृतदेह सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ आढळला; दापोली पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

Gramin Varta
Last updated: October 6, 2026 9:24 am
Gramin Varta
35 Views
Share
One pair of Feet alone in Bed on White Sheets sleeping under a blanket, relaxion cute

दापोली: हर्णे येथील अडखळ खाडी परिसरात नांगरून ठेवलेल्या मच्छीमार नौकेवरून बेपत्ता झालेल्या एका खलाशाचा मृतदेह ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळील समुद्रात तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रोहीदास यशवंत धरणकर (वय ४० वर्षे, मूळ रा. कोळीवाडा, ता. श्रीवर्धन, जि. रायगड) असे या दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या खलाशाचे नाव आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास रोहीदास धरणकर हे सहकारी महेश पोशा चोलकर यांच्यासमवेत रात्रीचे जेवण करून बोटीवर झोपले होते. दुसऱ्या दिवशी, २ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजता महेश चोलकर यांनी खबर देणारे परशुराम बाळ्या चोगले यांना फोन करून रोहीदास बोटीवर दिसत नसल्याची माहिती दिली. त्यानंतर चोगले यांनी तातडीने अडखळ खाडीतील नौकेवर धाव घेऊन संपूर्ण बोटीवर व खाडीकिनारी शोध घेतला; मात्र रोहीदास मिळून आले नाहीत. त्यांनी तातडीने श्रीवर्धन येथील रोहीदास यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून चौकशी केली असता, ते गावीही पोहोचले नसल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर परशुराम चोगले, बोटीवरील इतर खलाशी आणि स्थानिक ग्रामस्थांनी मिळून अडखळ, आंजर्ले खाडी परिसर तसेच सुवर्णदुर्ग किल्ल्याभोवतीच्या समुद्रात शोधमोहीम हाती घेतली होती. दरम्यान, ४ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या बाजूला सुमारे सात वाव अंतरावर समुद्राच्या पाण्यात रोहीदास धरणकर यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, परशुराम चोगले यांनी दिलेल्या खबरीवरून दापोली पोलीस ठाण्यात बीएनएसएस कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्र. ७४/२०२६ नुसार नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Total Visitors :

5468436
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राजापूर : ओणी येथे आईसोबत शेतात गेलेल्या १२ वर्षीय चिमुरडीचा चक्कर येऊन उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Varta
2 Min Read

कर्नाटक : भीषण अपघातात चौघांचा मृत्यू, २० हून अधिक जखमी

Gramin Varta
1 Min Read

शालेय पोषण आहारात आता भरडधान्यांची चव; ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांनाही योजनेचा लाभ देण्याचे निर्देश

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी : खल्वायनची दिवाळी पाडवा मैफल भाग्यश्री देशपांडे यांच्या गायनाने रंगणार

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

दापोली

दापोली : गिम्हवणे येथे लोखंडी अँगलला धडकून मध्यरात्री दुचाकीचा भीषण अपघात; दोन तरुण गंभीर

2 Min Read
दापोली

हर्णे समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळले खवले मांजर

1 Min Read
दापोली

दापोली : मुगीज कलमपेठ येथे बंद घर फोडून आठ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

2 Min Read
दापोली

दापोलीत बोट चालविण्याच्या प्रशिक्षणाची बनावट प्रमाणपत्रे तयार करून शासनाची फसवणूक

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?