ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी : खल्वायनची दिवाळी पाडवा मैफल भाग्यश्री देशपांडे यांच्या गायनाने रंगणार
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी : खल्वायनची दिवाळी पाडवा मैफल भाग्यश्री देशपांडे यांच्या गायनाने रंगणार
रत्नागिरी

रत्नागिरी : खल्वायनची दिवाळी पाडवा मैफल भाग्यश्री देशपांडे यांच्या गायनाने रंगणार

Gramin Varta
Last updated: November 9, 2026 9:02 am
Gramin Varta
11 Views
Share

रत्नागिरी :सुप्रसिद्ध गायिका भाग्यश्री देशपांडे यांच्या गायनाने खल्वायनची दिवाळी पाडवा मैफल यंदा रंगणार आहे. भाग्यश्री देशपांडे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील अत्यंत सुरेल आणि भावपूर्ण गायनासाठी ओळखल्या जाणार्या आणि भक्तिसंगीत व नाट्य संगीत तितक्याच ताकदीने गाणार्या आणि गणितबद्ध व लयीशी खेळणाऱ्या सरगम शैलीसाठी प्रसिद्ध आहेत.

मूळच्या आंबेजोगाई (बीड) येथील सांगीतिक वारसा लाभलेल्या आणि सध्या मुंबईत वास्तव्यास असलेल्या भाग्यश्री देशपांडे यांच्या गायनावर मेवाती व किराणा घराण्याचा प्रभाव आहे.

आग्रा आणि ग्वाल्हेर घराणे गायकीही त्यांनी आत्मसात केली आहे. त्यांचे शास्त्रीय संगीतातील सुरवातीचे शिक्षण त्यांच्या आई- वडिलांकडे झाले. त्यानंतर पंडित अजय पोहनकर, पंडित सुरेश वाडकर व नंतर पंडित सुहासजी व्यास यांच्याकडून त्यांना शास्त्रीय संगीताचे विशेष मार्गदर्शन मिळाले. त्यांनी ज्येष्ठ गायिका श्रीमती जयमाला शिलेदार यांच्याकडून नाट्यसंगीताचे मार्गदर्शन घेतले. शास्त्रीय संगीतासोबतच उप-शास्त्रीय, भक्तिसंगीत आणि नाट्यसंगीत या सर्वच प्रकारांवर त्यांची मजबूत पकड आहे. त्यांच्या आवाजात एक उपजत गोडवा आणि आर्तता आहे. जेव्हा त्या अभंग किंवा भजन गातात, तेव्हा त्यांच्या सादरीकरणातून श्रोत्यांना उच्च प्रतीच्या भक्तिरसाची अनुभूती मिळते.

‘भावरंग’ आणि ‘अभंग रंग’ हे त्यांचे सांगीतिक कार्यक्रम याच भावपूर्ण गायकीमुळे देश-विदेशात अत्यंत लोकप्रिय आहेत. शास्त्रीय गायनासाठी आवश्यक असणारे उत्तम श्वास नियंत्रण आणि आवाजाच्या पट्ट्यांचा अचूक वापर ही त्यांच्या गायकीची तांत्रिक वैशिष्ट्ये आहेत. गानहिरा, सूरमणी, संगीतरत्न, बालसरस्वती व वीरांगना सावित्रीबाई फुले या राष्ट्रीय पुरस्काराने त्या सन्मानित आहेत. नवी दिल्ली, सिकंदराबाद, अंबेजोगाई, गोवा, पुणे, मुंबई, कोल्हापूर, बीड, जबलपूर, नागपूर इत्यादी ठिकाणी तसेच अमेरिकेत त्यांचे गायनाचे कार्यक्रम झालेले आहेत.

त्यांच्या रत्नागिरीतील कार्यक्रमाला तबलासाथ हेरंब जोगळेकर, हार्मोनियमसाथ श्रीरंग जोगळेकर, पखवाजसाथ कैलास दामले, व्हायोलिनसाथ उदय गोखले, तालवाद्यसाथ वर्धन ओळकर हे रत्नागिरीचे कसलेले कलावंत करणार आहेत. फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे प्रायोजकत्व लाभलेली ही मैफल मंगळवार, दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत गुरुकृपा मंगल कार्यालयात होणार आहे. मैफल सर्व संगीत रसिकांना विनाशुल्क असून, त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन खल्वायन संस्थेने केले आहे.

Total Visitors :

5468387
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

सहदेव बेटकर यांच्या तत्पर पाठपुराव्यामुळे वादळात खंडित झालेला शेणवडेतील वीजपुरवठा पूर्ववत; तीन वाड्या प्रकाशमान

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरीसह राजापूर न्यायालयालाही ईमेलद्वारे बॉम्बची धमकी; दोन्ही न्यायालयांचे परिसर केले रिकामे, पोलिसांकडून कसून तपास सुरू

Gramin Varta
2 Min Read

दिल्लीतील आंदोलनांमुळे १० दिवसांत व्यापाऱ्यांना ४ हजार कोटींच्या नुकसानाचा अंदाज

Gramin Varta
3 Min Read

रत्नागिरी आरपीएफची कौतुकास्पद कामगिरी : राजधानी एक्सप्रेसमध्ये विसरलेला ७० हजारांचा आयफोन प्रवाशाला परत

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी: शासकीय आदेशाची अवज्ञा करून जप्त केलेली नौका हलविल्याप्रकरणी नौका मालकिणीविरुद्ध गुन्हा दाखल

1 Min Read
रत्नागिरी

अंधारात बुडालेल्या मजगाव, केळ्ये आणि मिरजोळे परिसरातील स्ट्रीट लाईटचा वीज पुरवठा अखेर पूर्ववत

2 Min Read
रत्नागिरी

करबुडे येथील २७ वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा संशय, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

1 Min Read
रत्नागिरी

उक्षी येथे रेल्वेच्या धडकेत झारखंडचा तरुण कामगार गंभीर जखमी; रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे मिळाले तातडीचे उपचार

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?