ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: उक्षी येथे रेल्वेच्या धडकेत झारखंडचा तरुण कामगार गंभीर जखमी; रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे मिळाले तातडीचे उपचार
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » उक्षी येथे रेल्वेच्या धडकेत झारखंडचा तरुण कामगार गंभीर जखमी; रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे मिळाले तातडीचे उपचार
रत्नागिरी

उक्षी येथे रेल्वेच्या धडकेत झारखंडचा तरुण कामगार गंभीर जखमी; रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे मिळाले तातडीचे उपचार

Gramin Varta
Last updated: October 11, 2026 9:05 pm
Gramin Varta
608 Views
Share

संगमेश्वर / एजाज पटेल : रत्नागिरी तालुक्यातील उक्षी येथे रेल्वे मार्ग ओलांडताना रेल्वेची धडक बसून झारखंड राज्यातील ३३ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना १० ऑक्टोबर २०२६ रोजी घडली. अपघातानंतर जखमी तरुण रेल्वे मार्गाजवळ गंभीर अवस्थेत पडून असताना रेल्वेच्या मोटरमनने दाखवलेली सतर्कता आणि संगमेश्वर रेल्वे स्थानकावरील पोलिसांसह होमगार्ड यांनी केलेल्या तातडीच्या मदतीमुळे त्याला वेळेत रुग्णालयात दाखल करणे शक्य झाले.

सुरंजन सानिका डुंगडुंग (वय ३३) असे जखमी तरुणाचे नाव असून तो झारखंड राज्यातील सिमडेगा जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो के. प्रसाद यांच्या कंपनीत काम करत करत असल्याचे समजते. १० ऑक्टोबर रोजी तो निवळी येथील आठवडा बाजारात गेला होता. बाजारातील काम आटोपून परतत असताना उक्षी येथे रेल्वे मार्ग ओलांडण्याच्या वेळी त्याला रेल्वेची धडक बसली. या धडकेत तो गंभीर जखमी झाला आणि रेल्वे मार्गाजवळच पडून राहिला.

दरम्यान, रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मंगला एक्सप्रेसच्या मोटरमनच्या नजरेस जखमी तरुण पडला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याने तत्काळ संगमेश्वर रेल्वे स्थानकावर याबाबत माहिती दिली. या माहितीमुळे जखमी तरुणाला मदत करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. त्यानंतर जखमी सुरंजनला रेल्वेच्या डब्यातून संगमेश्वर रेल्वे स्थानकावर आणण्यात आले.

मंगला एक्सप्रेस संगमेश्वर स्थानकात पोहोचताच तेथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी आणि होमगार्ड जवानांनी तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला. पोलिस कॉन्स्टेबल मोरे, होमगार्ड जवान मुजीब डोंगरकर, सागर कांगणे, वाने, महिला होमगार्ड मांगले, यांनी जखमी तरुणाला मदत करण्यासाठी तत्परता दाखवली. छावा सामाजिक संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष वहाळ दळवी यांनीही मदतकार्यात सहभाग घेतला.

रेल्वे स्थानकावर दाखवण्यात आलेली ही तत्परता जखमी तरुणासाठी महत्त्वाची ठरली. स्थानिकांच्या मदतीने त्याला १०८ रुग्णवाहिकेतून संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील उपचारांसाठी त्याला रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.

रेल्वे मार्गाजवळ गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या तरुणाला वेळेत मदत मिळाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होऊ शकले. अपघातानंतर मोटरमनने दाखवलेली सतर्कता, रेल्वे स्थानकावरील पोलिस व होमगार्ड जवानांनी केलेली धावपळ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेली मदत यामुळे जखमी तरुणाला रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया वेगाने पार पडली. या घटनेतून आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर मिळणारी मदत किती महत्त्वाची असते, हे पुन्हा अधोरेखित झाले.

Total Visitors :

5468407
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

कोकण रेल्वेची सातासमुद्रापार भरारी; काँगोमध्ये मेट्रो तर श्रीलंकेत उभारणार पूल, जागतिक पातळीवर रचणार नवा इतिहास

Gramin Varta
1 Min Read

राजापुर: कोदवली धरण सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक क्षेत्र;आठवडा बाजारावर सायंकाळी ७ चे बंधन

Gramin Varta
2 Min Read

कुवारबांव येथे गणेश विसर्जन बंदोबस्तावरील होमगार्डचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न; आरोपीवर गुन्हा

Gramin Varta
2 Min Read

सागरी सुरक्षा अधिक बळकट; रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील शीघ्र कृती दलाच्या १८ जवानांना बोट सेलिंगचे विशेष प्रशिक्षण

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी : सैतवडे पेठ मोहल्ला येथे आईच्या आजारपणाच्या चिंतेत तरुणाने जीवन संपविले

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : राहत्या घरातून विवाहित महिला बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीच्या मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनला उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट; कोकणात नवे मत्स्य उद्योजक घडवण्याचे आवाहन

2 Min Read
रत्नागिरी

नवरात्रोत्सवात नऊ दिवस मद्यपान-मांसाहाराला पूर्णविराम! भंडारपुळे-विरापुळेत २९ वर्षांची परंपरा कायम 

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?