ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: कुवारबांव येथे गणेश विसर्जन बंदोबस्तावरील होमगार्डचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न; आरोपीवर गुन्हा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Saturday, Sep 26, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » कुवारबांव येथे गणेश विसर्जन बंदोबस्तावरील होमगार्डचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न; आरोपीवर गुन्हा
रत्नागिरी

कुवारबांव येथे गणेश विसर्जन बंदोबस्तावरील होमगार्डचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न; आरोपीवर गुन्हा

Gramin Varta
Last updated: September 26, 2026 10:07 am
Gramin Varta
469 Views
Share

रत्नागिरी : गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तावर तैनात असलेल्या होमगार्डने नागरिकांमध्ये सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी केल्याचा राग आल्याने एका तरुणाने होमगार्डची गणवेशाची कॉलर पकडून त्याला मारहाण करत दोन्ही हातांनी गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कुवारबांव येथे घडली. या घटनेत होमगार्डच्या गणवेशाचे बटन तुटून नुकसान झाले असून, याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न तसेच शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याप्रकरणी गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना २४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजता कुवारबांव ग्रामपंचायतीजवळ, ता. जि. रत्नागिरी येथे घडली. याप्रकरणी २५ सप्टेंबर रोजी पहाटे ४.५७ वाजता रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी व जखमी होमगार्डचे नाव मयुर मोहन पाटील (वय २६ वर्षे, व्यवसाय नोकरी/होमगार्ड, रा. पानवल आपकरेवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे आहे. तर आरोपीचे नाव लखन रामचंद्र चिकोडीकर (वय २९ वर्षे, रा. उत्कर्ष नगर, सहजीवन सोसायटी, कुवारबांव, ता. जि. रत्नागिरी) असे आहे.

पोलिस नोंदीनुसार, मयुर पाटील हे कुवारबांव येथील ‘श्री ओम साई तरुण मित्र मंडळा’च्या सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी पोलिसांसोबत बंदोबस्तावर तैनात होते. गणपती विसर्जनाचा बंदोबस्त आटोपल्यानंतर ते साक्षीदारांसोबत परत जात असताना कुवारबांव ग्रामपंचायतीजवळ आरोपी लखन चिकोडीकर हा विसर्जन करून घरी परतणाऱ्या नागरिकांशी वाद घालत मारामारी करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मयुर पाटील हे गणवेशात असतानाच भांडण सोडविण्यासाठी पुढे गेले. आपण पोलिसांच्या बंदोबस्तासोबत कर्तव्यावर असल्याची माहिती आरोपीला असतानाही त्याने पाटील यांच्या अंगावरील होमगार्डच्या गणवेशाची कॉलर पकडून त्यांना खेचले. त्यानंतर आरोपीने त्यांच्या मानेवर आणि तोंडावर हाताच्या थापट्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

एवढ्यावर न थांबता आरोपीने दोन्ही हातांनी मयुर पाटील यांचा गळा जोराने दाबला आणि “तुला आत्ताच ठारच मारून टाकतो,” अशी धमकी देत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या झटापटीदरम्यान मयुर पाटील यांच्या होमगार्ड गणवेशाचे एक बटन तुटून नुकसान झाले.

या घटनेनंतर मयुर पाटील यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून गु.र.नं. ३७१/२०२६ नुसार आरोपी लखन रामचंद्र चिकोडीकर याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) अधिनियम २०२३ मधील कलम १०९(१), १२१(१), १३२ आणि ३२४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून सुरू आहे.

Total Visitors :

5428463
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

डावखरे मानहानी खटल्यात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंसह चौघांची निर्दोष मुक्तता

Gramin Varta
2 Min Read

Investigating the Extraordinary Nature of the Physical World

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

‘ग्रामीण वार्ता’च्या बातमीची प्रशासनाकडून दखल; पालशेत-जोईलवाडीत अखेर पाणीपुरवठा पूर्ववत

Gramin Varta
1 Min Read

पाणीपट्टीवरून मुरादपूरच्या सरपंचांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी; मंडणगड पोलिसांत गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन २४ तास सज्ज; ‘सेवा संकल्प अभियाना’तून थेट जनतेपर्यंत शासकीय सेवा

3 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत चोरीचे चांदीचे ताट विकण्याचा डाव फसला; सोनाराच्या सतर्कतेने महिला जेरबंद

1 Min Read
रत्नागिरी

जाकादेवी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिली नर्सरी व गणपती कारखान्याला क्षेत्रभेट

2 Min Read
रत्नागिरी

मोकाट जनावरे, अंधारे रस्ते आणि पुसलेल्या साईड पट्ट्या; शहराच्या सुरक्षिततेसाठी वंचित बहुजन आघाडीचे नगर परिषदेला निवेदन

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?