ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: वाद मिटवण्यासाठी मांडवी किनाऱ्यावर बोलावून तरुणावर जीवघेणा हल्ला; लोखंडी फायटरने मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » वाद मिटवण्यासाठी मांडवी किनाऱ्यावर बोलावून तरुणावर जीवघेणा हल्ला; लोखंडी फायटरने मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी

वाद मिटवण्यासाठी मांडवी किनाऱ्यावर बोलावून तरुणावर जीवघेणा हल्ला; लोखंडी फायटरने मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

Gramin Varta
Last updated: October 2, 2026 9:57 am
Gramin Varta
295 Views
Share

रत्नागिरी : मित्राला दिलेल्या शिवीगाळीचा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या एका १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणावर मांडवी समुद्रकिनाऱ्यावर लोखंडी फायटरने बेदम मारहाण करत जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात स्वरूप रूपेश दोरखंडे (वय १९, रा. साईनगर, फणसोप हायस्कूल मागे, वरचा फणसोप, ता. जि. रत्नागिरी) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दोन संशयित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेन्वये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी रोहन ठिक (वय १९, रा. कोळंबे) याने फिर्यादी स्वरूप दोरखंडे याचा मित्र यश पवार याला फोनवरून शिवीगाळ केली होती. आपल्या मित्राला विनाकारण शिवीगाळ का केली, अशी विचारणा स्वरूपने फोनवरून केल्यावर रोहनने स्वरूपलाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. अखेर हा वाद समोरासमोर बसून मिटवण्याचे ठरवून त्यांनी मांडवी समुद्रकिनारी भेटण्याचे निश्चित केले. त्यानुसार १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास स्वरूप दोरखंडे हा आपला मित्र यश पवार याच्यासह मांडवी बीचवर पोहोचला. त्या ठिकाणी रोहन ठिक हा आधीच त्याच्या इतर मित्रांसह उपस्थित होता. दोन्ही बाजूंचे बोलणे सुरू असतानाच संशयित सोहम पड्यार (वय १९, रा. पावस) याने अचानक वादात उडी घेत स्वरूपला शिवीगाळ करत कानशिलात लगावली. त्यानंतर रोहन ठिक यानेही त्याला मारहाण सुरू केली. याच दरम्यान सोहम पड्यार याने हातातील लोखंडी फायटरने स्वरूपच्या तोंडावर, डोक्यावर व पाठीवर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले.

भरदिवसा पर्यटनाच्या ठिकाणी घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात जखमी झालेल्या स्वरूप दोरखंडे याने तात्काळ पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:०६ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७८/२०२६ नुसार आरोपी रोहन ठिक आणि सोहम पड्यार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Total Visitors :

5469270
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा विस्तार; नवीन इमारतीत तपासणी सुरू करण्याचा जन आरोग्य समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

Gramin Varta
2 Min Read

घरासमोर खेळणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीवर ८५ वर्षीय वृद्धाचा लैंगिक अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Gramin Varta
2 Min Read

दापोलीत कोट्यवधींच्या वक्फ जमीन घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई; सत्ताधारी राजकीय नेत्यासह ४४ जणांना वक्फ बोर्डाची नोटीस

Gramin Varta
3 Min Read

अपरांत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चिपळूण येथे १७ ऑक्टोबरला विशेष अस्थिविकार तपासणी शिबिर

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

मिरकरवाडा जेटीवर मच्छी खरेदीवरून वाद; व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला, दोघांवर गुन्हा दाखल

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत गोवा बनावटीच्या बेकायदेशीर मद्याचा साठा जप्त

1 Min Read
रत्नागिरी

महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कोमसापचा संवेदनशील निर्णय; मालगुंड येथील १८ वे साहित्य संमेलन लांबणीवर

2 Min Read
रत्नागिरी

नांदिवडे येथील गॅस टर्मिनल व कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?