ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ढोंगी बाबाचा संतापजनक विकृत चेहरा उघड; पुण्यात सेवेच्या नावाखाली महिलेवर लैंगिक अत्याचार, संत इंद्रदेव महाराजाविरोधात गुन्हा दाखल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ढोंगी बाबाचा संतापजनक विकृत चेहरा उघड; पुण्यात सेवेच्या नावाखाली महिलेवर लैंगिक अत्याचार, संत इंद्रदेव महाराजाविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र

ढोंगी बाबाचा संतापजनक विकृत चेहरा उघड; पुण्यात सेवेच्या नावाखाली महिलेवर लैंगिक अत्याचार, संत इंद्रदेव महाराजाविरोधात गुन्हा दाखल

Gramin Varta
Last updated: November 4, 2026 7:44 am
Gramin Varta
181 Views
Share

पुणे: धार्मिक प्रवचने आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाचा बुरखा पांघरून एका महिलेचा विश्वास संपादन करत तिचे भीषण शारीरिक तसेच मानसिक शोषण केल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील वृंदावन येथील तथाकथित संत इंद्रदेव महाराज याच्यावर मीरा रोड येथील एका ४२ वर्षीय महिलेने बलात्कारासह गंभीर स्वरूपाचे आरोप केले असून, याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

पीडित महिलेने पत्रकार परिषद घेऊन या ढोंगी प्रकाराची वाच्यता केली. दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२३ मध्ये समाजमाध्यमांवरील प्रवचनांच्या माध्यमातून ती महाराजाच्या संपर्कात आली होती. त्यानंतर एप्रिल २०२३ मध्ये सांताक्रूझ येथे झालेल्या सत्संगात सहभागी होऊन तिने महाराजाकडून दीक्षा घेतली. वैयक्तिक अडचणी दूर करण्याचे खोटे आश्वासन देऊन महाराजानी तिचा विश्वास संपादन केला आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप सुरू केला.

पुढे या श्रद्धेचा गैरफायदा घेत सेवाधाम आश्रमात मुक्कामी असताना रात्री साडेदहाच्या सुमारास महाराजांनी महिलेला स्वतःच्या कक्षात बोलावून घेतले. कोणाला शंका आल्यास औषध आणायला जात असल्याचे सांग, अशी सूचनाही त्याने केली होती. खोलीत प्रवेश करताच दरवाजा आतून बंद करून बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा गंभीर जबाब पीडितेने नोंदवला आहे. एवढ्यावरच न थांबता २९ नोव्हेंबर २०२५ आणि २१ जानेवारी २०२६ रोजी महाराजाने व्हिडिओ कॉल करून स्वतःचे कपडे उतरवून अश्लील चाळे केले व महिलेवरही तशीच सक्ती केली, असा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय, महाराजाची नजर तिच्या कौटुंबिक संपत्तीवरही होती आणि वारसाच्या नावाखाली तिच्या मुलीचा सांभाळ करण्याचे आमिष दाखवून दबाव आणला जात होता. हा संपूर्ण गैरप्रकार पीडितेने अन्य एका महिलेला सांगितल्यानंतर महाराजाने बदनामी झाल्यास आत्महत्या करण्याची व ‘तुम्हे छोडूंगा नहीं’ अशी थेट जीवे मारण्याची धमकी १७ जून २०२६ रोजी दिल्याचेही तिने नमूद केले. सुरुवातीला बदनामीच्या भीतीमुळे शांत राहिलेल्या या महिलेने अखेर हिंमत दाखवून पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. धार्मिकतेच्या नावाखाली वासनेचा बाजार मांडणाऱ्या या प्रकरणाची पोलीस आता सखोल चौकशी करत आहेत.

Total Visitors :

5469276
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

कन्यारक्षणाचा निर्धार: ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत रत्नागिरीत आरोग्य यंत्रणेसाठी कायदेविषयक कार्यशाळा संपन्न

Gramin Varta
2 Min Read

मुंबई-गोवा महामार्गावर एर्टिगा कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Gramin Varta
1 Min Read

वनक्षेत्रातून जाणाऱ्या रस्ते व रेल्वे प्रकल्पांत वन्यजीवांसाठी अंडरपास आणि ओव्हरपास अनिवार्य; राज्य वन विभागाचे कडक निर्देश

Gramin Varta
2 Min Read

काजळी नदीवर बंधारे बांधून पाणी अडवले; दाभोळेत संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी माजी सरपंच राजेश रेवाळे यांचा स्तुत्य पुढाकार

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

डावखरे मानहानी खटल्यात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंसह चौघांची निर्दोष मुक्तता

2 Min Read
महाराष्ट्र

सीएसएमटी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ – १५ वर पुनर्विकास कामासाठी ७५ दिवसांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

2 Min Read
महाराष्ट्र

खामगाव-पंढरपूर महामार्गावर बस आणि कारचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार

1 Min Read
महाराष्ट्र

स्वामींच्या दर्शनाला निघालेले कुटुंब नियतीच्या घावाने उद्ध्वस्त; ८ वर्षांच्या चिमुरड्यासह आजी-आजोबांचा दुर्दैवी अंत!

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?