ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: डावखरे मानहानी खटल्यात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंसह चौघांची निर्दोष मुक्तता
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » डावखरे मानहानी खटल्यात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंसह चौघांची निर्दोष मुक्तता
महाराष्ट्र

डावखरे मानहानी खटल्यात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंसह चौघांची निर्दोष मुक्तता

Gramin Varta
Last updated: September 24, 2026 7:56 am
Gramin Varta
42 Views
Share

कल्याण: राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या दिवंगत नेते वसंत डावखरे मानहानी खटल्याचा अखेर निकाल लागला आहे. तब्बल १७ वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात कल्याण न्यायालयाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर या चौघांचीही निर्दोष मुक्तता केली आहे.कल्याण न्यायालयाचे न्यायाधीश संतोष आगे यांनी बुधवारी या प्रकरणाचा निकाल दिला.

२००९च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान या प्रकरणाला सुरुवात झाली होती. त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे आणि तत्कालीन शिवसेना उमेदवार आनंद परांजपे यांच्यात लढत झाली होती. २२ एप्रिल २००९ रोजी उद्धव ठाकरे यांनी परांजपे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत वसंत डावखरे यांचा एक कथित व्हिडिओ दाखवण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये डावखरे कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भीती न बाळगता प्रयत्न करण्याचे आवाहन करत असल्याचे दाखवण्यात आले होते.

मात्र, वसंत डावखरे यांनी व्हिडिओतील वक्तव्य आपले नसल्याचे सांगत त्यावर आक्षेप घेतला होता. व्हिडिओतील मजकूर निवडकपणे संपादित करून आपली बदनामी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी कल्याणमधील कोळसेवाडी पोलिस ठाण्यात मानहानीची तक्रार दाखल केली. या प्रकरणात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांना आरोपी करण्यात आले होते.

या खटल्याची सुनावणी तब्बल १७ वर्षे सुरू होती. दरम्यान, प्रकरणात २०हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली असून एकूण २0 साक्षी झाल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे जबाब दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून नोंदवण्यात आले होते. न्यायालयाने आरोपींचे कलम ३१३ अंतर्गत जबाब नोंदवून खटल्यातील प्रक्रिया पूर्ण केली होती. सर्व आरोप खोटे असल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला होता.

अखेर बुधवारी कल्याण न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देत चौघांचीही निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य दोन आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे. निकालानंतर आनंद परांजपे यांनी प्रतिक्रिया देताना, “वसंत डावखरे साहेब आम्हाला तेव्हा पण आदरणीय होते आणि आजही आदरणीय आहेत. गेल्या १७ वर्षांपासून ही केस सुरू होती. आता आम्हाला न्याय मिळाला,” असे सांगितले.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

Scaling Peaks the Awe-Inspiring Beauty of High Altitude Travel

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनसह सात नामांकित आस्थापनांचे परवाने निलंबित; अन्न व औषध प्रशासनाचा दणका

Gramin Varta
2 Min Read

सावर्डे : माहेरून पैसे आणण्यास नकार देताच पत्नीला दांडक्याने मारहाण करून पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी

Gramin Varta
1 Min Read

गुहागर : बुलेटला धडक दिल्याने तरुण गंभीर जखमी,एसटी बस चालकावर गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या तोंडावर ‘रेंट अ गरबा पार्टनर’च्या फसव्या जाहिराती; मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

2 Min Read
महाराष्ट्र

लावाने बोल्ड एन४ प्रो ५जी स्मार्टफोन केला लॉन्च

2 Min Read
महाराष्ट्र

बीआयएसने सोन्याच्या हॉलमार्किंग शुल्कात ७५ रुपयांपर्यंत केली वाढ, नवीन दर लागू

2 Min Read
महाराष्ट्र

महाराष्ट्रात दुष्काळी संकटावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत; केंद्राची वाट न पाहता राज्य शासन मदत देणार

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?