ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: शालेय पोषण आहार स्वयंपाकी आणि मदतनिसांच्या वाढीव मानधनासाठी ७४ कोटींचा निधी वितरित
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » शालेय पोषण आहार स्वयंपाकी आणि मदतनिसांच्या वाढीव मानधनासाठी ७४ कोटींचा निधी वितरित
महाराष्ट्र

शालेय पोषण आहार स्वयंपाकी आणि मदतनिसांच्या वाढीव मानधनासाठी ७४ कोटींचा निधी वितरित

Gramin Varta
Last updated: October 12, 2026 5:46 am
Gramin Varta
168 Views
Share

मुंबई: राज्यातील शाळांमध्ये ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने’अंतर्गत राबणाऱ्या हजारो स्वयंपाकी आणि मदतनिसांच्या मानधनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या कर्मचाऱ्यांच्या दरमहा मानधनातील अतिरिक्त राज्य हिस्सा देण्यासाठी राज्य शासनाने ७४ कोटी १० लाख ८१ हजार रुपयांच्या भरघोस निधीच्या वितरणास प्रशासकीय मंजुरी दिली असून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.

सध्या या योजनेतील सर्वसाधारण घटकातील स्वयंपाकी व मदतनिसांना दरमहा २५०० रुपये मानधन दिले जाते. यामध्ये केंद्र सरकारचा ६० टक्क्यांनुसार ६०० रुपयांचा हिस्सा आणि राज्याचा ४० टक्क्यांनुसार ४०० रुपयांचा हिस्सा, अशा मूळ १००० रुपयांच्या निधीचे वाटप यापूर्वीच करण्यात आले होते. मात्र, राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त १५०० रुपयांच्या उर्वरित हिश्यासाठी निधीची प्रतीक्षा होती. वित्त विभागाच्या मान्यतेनंतर, चालू आर्थिक वर्षात अर्थसंकल्पित असलेल्या निधीमधून पुनर्विनियोजनाद्वारे (Re-appropriation) ही ७४.१० कोटी रुपयांची रक्कम पीएम पोषण योजनेच्या राज्य हिश्याच्या लेखाशीर्षात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सन २०२६-२७ या आर्थिक वर्षापासून ही योजना ‘SNA SPARSH’ या डिजिटल प्रणालीवर ऑनबोर्ड करण्यात आली असून, केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात (1st Mother Sanction) मंजूर केलेल्या वाटपानंतर आता राज्यानेही आपला अतिरिक्त भार उचलला आहे. या निधीचे सायबर कोषागाराद्वारे (कोषागार सांकेतांक ८१०१) आहरण व संवितरण करण्याची जबाबदारी प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या राज्य समन्वय अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. हा संपूर्ण निधी विहित मुदतीत नियमांनुसार खर्च करून त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र तातडीने सादर करण्याचे स्पष्ट निर्देश पुणे येथील प्राथमिक शिक्षण संचालकांना देण्यात आले असून, शासनाच्या या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांना थेट दिलासा मिळाला आहे.

Total Visitors :

5468536
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

जमिनीच्या वादातून राजापुरात वृद्ध महिलेवर प्राणघातक हल्ला; मारहाण करून फळझाडांची केली तोडफोड, ६ जणांवर गुन्हा

Gramin Varta
2 Min Read

उदय जाधव लिखित ‘गार्गी आणि इतर एकांकिका’ला राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार

Gramin Varta
1 Min Read

वयोमानामुळे जमीन खोदणे झाले कठीण; पाईपलाईन दुरुस्तीसाठी ज्येष्ठ नागरिकाच्या मदतीला पोलीस अंमलदार

Gramin Varta
2 Min Read

लांजा : पिकअपमधून बैलांची क्रूर वाहतूक;  पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

नवरात्रोत्सवासह आगामी सण साधेपणाने साजरे करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

2 Min Read
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त बळीराजाला दिवाळीची भेट; ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी ५ हजारांची मदत जमा

1 Min Read
महाराष्ट्र

कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत दुर्घटना: वाय. पी. पोवार नगरची २१ फुटी ‘बॅलेंसिंग’ गणेशमूर्ती कोसळली

2 Min Read
महाराष्ट्र

कोकणातील अतिरिक्त पाणी वळवणार मराठवाड्यात!

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?