ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: नवरात्रोत्सवासह आगामी सण साधेपणाने साजरे करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » नवरात्रोत्सवासह आगामी सण साधेपणाने साजरे करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवासह आगामी सण साधेपणाने साजरे करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Gramin Varta
Last updated: October 2, 2026 8:21 am
Gramin Varta
59 Views
Share

बचत झालेला निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्याचे आवाहन

मुंबई: राज्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आपल्या अन्नदात्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आगामी नवरात्रोत्सव आणि इतर धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरे करावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

या उत्सवांमधून बचत झालेला निधी थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यावा, असेही आवाहन त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना, सार्वजनिक मंडळांना आणि नागरिकांना केले आहे.

यंदा विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांत पावसाने ओढ दिल्यामुळे बहुतांश ठिकाणी दुष्काळाचे सावट पसरले आहे. निसर्गाच्या कोपामुळे उभी पिके करपून गेल्याने हजारो शेतकरी हवालदिल झाले आहेत.

या बिकट परिस्थितीवर बोलताना राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क आमच्या बळीराजाचा आहे, या भूमिकेचा पुनरुच्चार शिंदे यांनी केला. अशा संकटकाळात महायुती सरकार आणि शिवसेना पक्ष पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. शासकीय पातळीवर सर्वतोपरी मदतीच्या उपाययोजना सुरू आहेतच; परंतु एक समाज म्हणूनही प्रत्येकाने पुढे येऊन या परिस्थितीत योगदान देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

शेतकरी बांधव संकटात आणि चिंतेत असताना आगामी सण-उत्सव मोठ्या थाटामाटात व धुमधडाक्यात साजरे करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे सार्वजनिक मंडळे, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी उत्सव अगदी साधेपणाने साजरे करावेत. उत्सवांवर होणाऱ्या अवाढव्य खर्चाला फाटा देऊन वाचलेला निधी दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या थेट मदतीसाठी आणि पुनर्वसनासाठी वर्ग करावा, असे ते म्हणाले.

आपला अन्नदाता संकटात असताना आपण सर्वजण त्याच्या मदतीला धावून गेलो, तर या नैसर्गिक आपत्तीवर मात करणे सहज शक्य होईल. उत्सवाच्या खर्चात बचत करून जर आपण एका जरी शेतकऱ्याच्या डोळ्यांतील अश्रू पुसू शकलो आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकलो, तर तीच आदिशक्ती जगदंबेची खरीखुरी सेवा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

२५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या श्रीशा-श्रीजाच्या प्रथम वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची किनार

Gramin Varta
3 Min Read

ताम्हिणी घाटातील मिल्कीबार वॉटरफॉलच्या खोल कुंडात बुडून पुण्याच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

आशिया रोबोटिक्स स्पर्धेत वडदहसोळच्या अफ्फान मुकादमची सुवर्ण कामगिरी; राजापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Gramin Varta
2 Min Read

राजापूर: अल्पवयीन अत्याचारप्रकरणी मुख्य संशयिताची बालसुधारगृहात रवानगी; २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन आदेश

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या विराट मोर्चाची दिशा आणि रूपरेषा स्पष्ट

2 Min Read
महाराष्ट्र

काळाचौकी महागणपती मंडपाजवळ विजेचा झटका लागून दोघांचा मृत्यू, चौघे जखमी

2 Min Read
महाराष्ट्र

देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा तीन दिवसांचा संप अखेर स्थगित

1 Min Read
महाराष्ट्र

एमपीएससीबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; विक्रमी पदभरतीसह परीक्षा ऑफलाइनच घेण्याचे आश्वासन, विद्यार्थ्यांचे उद्याचे आंदोलन स्थगित

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?