ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: एमपीएससीबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; विक्रमी पदभरतीसह परीक्षा ऑफलाइनच घेण्याचे आश्वासन, विद्यार्थ्यांचे उद्याचे आंदोलन स्थगित
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » एमपीएससीबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; विक्रमी पदभरतीसह परीक्षा ऑफलाइनच घेण्याचे आश्वासन, विद्यार्थ्यांचे उद्याचे आंदोलन स्थगित
महाराष्ट्र

एमपीएससीबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; विक्रमी पदभरतीसह परीक्षा ऑफलाइनच घेण्याचे आश्वासन, विद्यार्थ्यांचे उद्याचे आंदोलन स्थगित

Gramin Varta
Last updated: October 1, 2026 8:06 am
Gramin Varta
21 Views
Share

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध प्रलंबित मागण्यांवरून राज्यभरात आक्रमक झालेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर अत्यंत सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या बहुतांश प्रमुख मागण्या तत्त्वतः मान्य करत एमपीएससी परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेण्याची आणि आजवरचे सर्व विक्रम मोडणारी महाभरती करण्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्र्यांच्या या ठोस आश्वासनानंतर स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आणि विद्यार्थ्यांनी २ ऑक्टोबर रोजी पुण्यात पुकारलेले राज्यव्यापी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे, अशी अधिकृत माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून (सीएमओ) देण्यात आली.

बैठकीदरम्यान एमपीएससीचे अध्यक्ष व सदस्यांवर कारवाई करण्याच्या विद्यार्थ्यांच्या मागणीवर कायदेशीर बाजू मांडताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, एमपीएससी अध्यक्ष हे संवैधानिक पद असल्याने त्यांना थेट हटवण्याचा अधिकार राज्य शासन अथवा राज्यपालांना नसून तो केवळ राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्याने आहे. तरीही विद्यार्थ्यांच्या मागणीचा मान राखून संविधानाच्या कलम ३१७ नुसार पूर्व व विद्यमान अध्यक्ष तसेच सदस्यांची तीन महिन्यांत न्यायालयीन चौकशी केली जाईल आणि त्या निष्कर्षांच्या आधारे पुढील योग्य पावले उचलली जातील. याशिवाय एमपीएससी सचिवांची तत्काळ बदली करण्याचे आदेशही देण्यात आले असून, विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा केल्याशिवाय परीक्षा पद्धतीत कोणताही परस्पर बदल केला जाणार नाही, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला.

राज्यातील शासकीय पदभरतीला अभूतपूर्व गती देण्याचा निर्धार व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले की, शासकीय सेवेतील ३० ते ४० हजार रखडलेल्या पदोन्नतींचा मार्ग मोकळा करण्यात येत असून, १९६० पासून न बदललेल्या सेवाप्रवेश नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. आतापर्यंत ६० टक्के विभागांचे सुधारित भरती नियम तयार झाले असून उर्वरित विभागांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे सर्व रिक्त पदे १०० टक्के भरण्याची तयारी सुरू झाली आहे. ३ जानेवारी रोजी होणाऱ्या गट ‘क’ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार विक्रमी जागावाढ केली जाणार आहे. तसेच आगामी तीन वर्षांतील संभाव्य रिक्त जागांची माहिती एकदम जाहीर केली जाईल आणि सेवानिवृत्त होणाऱ्या जागांवर तब्बल एक वर्ष आधीच भरती प्रक्रिया सुरू करण्याचे धोरण ठरवण्यात येत असून, एका महिन्याच्या आत याचा संपूर्ण कार्यक्रम आखला जाईल.

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना वारंवार कागदपत्रे पडताळणीचा आणि आर्थिक भुर्दंडाचा सामना करावा लागू नये, यासाठी माफक दरात ‘सिंगल कार्ड’ प्रणाली विकसित केली जाणार आहे. या एकाच कार्डच्या आधारे विद्यार्थ्यांना आयोगाच्या सर्व परीक्षा देणे सुलभ होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या सर्वंकष आणि ऐतिहासिक निर्णयांमुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो तरुणांना मोठा दिलासा मिळाला असून, सकारात्मक तोडगा निघाल्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या नियोजित आंदोलनाला तूर्त स्थगिती दिली आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

सावर्डे विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन, शोध व बचाव प्रशिक्षण

Gramin Varta
2 Min Read

दंतवैद्यकीय क्षेत्रात मिरजोळीच्या असीला दलवाईचे उज्ज्वल यश; गाझियाबाद येथून ‘एमडीएस’ पदव्युत्तर पदवी संपादन

Gramin Varta
2 Min Read

क्रिकेट विश्वचषकाचे वेळापत्रक उद्या जाहीर होणार

Gramin Varta
2 Min Read

संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात जागतिक हृदय दिन उत्साहात साजरा; ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार; राज्यात उभारणार २० हजार सुसज्ज कायमस्वरूपी परीक्षा केंद्रांचे सामायिक जाळे

2 Min Read
महाराष्ट्र

‘दिशा सालियनला कधीही भेटलो नाही, खोट्या प्रचाराने झुकणार नाही’; सीबीआयच्या एफआयरनंतर आदित्य ठाकरेंचे विरोधकांना सडेतोड उत्तर

3 Min Read
महाराष्ट्र

कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत दुर्घटना: वाय. पी. पोवार नगरची २१ फुटी ‘बॅलेंसिंग’ गणेशमूर्ती कोसळली

2 Min Read
महाराष्ट्र

भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल, २४ नेत्यांना नवीन जबाबदाऱ्या

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?