ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: काळाचौकी महागणपती मंडपाजवळ विजेचा झटका लागून दोघांचा मृत्यू, चौघे जखमी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » काळाचौकी महागणपती मंडपाजवळ विजेचा झटका लागून दोघांचा मृत्यू, चौघे जखमी
महाराष्ट्र

काळाचौकी महागणपती मंडपाजवळ विजेचा झटका लागून दोघांचा मृत्यू, चौघे जखमी

Gramin Varta
Last updated: September 21, 2026 8:19 am
Gramin Varta
28 Views
Share

मुंबई: मुंबईतील यंदाच्या गणेशोत्सवाला लागलेले विघ्न काही केल्या थांबताना दिसत नाही. मुंबईतील परळ-काळाचौकी परिसरात शनिवारी मध्यरात्री महागणपतीच्या मंडपाजवळ विजेचा झटका लागून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून, चौघे जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये आठ वर्षीय रागिणी घनश्याम यादव आणि ३३ वर्षीय सुजाता यांचा समावेश आहे. या घटनेमुळे लालबाग-परळ परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास काळाचौकीच्या दत्ताराम लाड मार्गावरील महागणपती उत्सव मंडळाच्या मंडपाजवळ ही दुर्घटना घडली. गणेशदर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक परिसरात आले होते. मंडपाच्या समोर तात्पुरता शीतपेयांचा स्टॉल उभारण्यात आला होता. या स्टॉलसाठी वीजजोडणी घेण्यासाठी लाल रंगाची विद्युत तार सोडण्यात आली होती. या तारेवर पाय पडल्याने काही जणांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत एकूण सहा जण जखमी झाले.

प्राथमिक माहितीनुसार, जखमींमध्ये अकबर नाईक (19), तन्वी नर्श हांडे (19), साहिल संदीप तरे (19) आणि रुही सिंग (12) यांचा समावेश असून, जखमींना तातडीने जवळच्या मसीना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी काही जणांवर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. तर १२ वर्षीय रुही सिंह हिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला परळ येथील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान आठ वर्षीय रागिणीचा मृत्यू झाला. तसेच ३३ वर्षीय सुजाताचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मृत चिमुकलीची मावशी किस्मती यादव म्हणाल्या, “आम्ही दोन वाजता रांगेत उभे राहिलो होतो. २.४० मिनिटांनी ही दुर्घटना घडली. तिथे गर्दी होती म्हणून आम्ही माघारी फिरलो. तिथून घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही बाजूने निघून जात होतो. मंडपाच्या शेजारीच एक दुकान आहे. मग आम्ही विचार केला की दुकानाजवळ उभं राहूयात. गर्दी कमी झाली की दर्शन घ्यायला जाऊया. त्यांनी लाईट लावली, बाजूलाच मंडप आहे. मंडळाने सुरक्षेची काळजी घ्यायला हवी होती. तुम्ही एवढी मोठी गणपतीची मूर्ती बसवता मग सुरक्षा का ठेवत नाहीत. ज्यांचं बाळ गेलंय, त्यांना तर ते परत मिळणार नाहीय.” असा संताप व्यक्त करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. रविवारी सकाळी बेस्टच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित मीटरचा वीजपुरवठा खंडित केला. विद्युत तार नेमकी कशी उघडी राहिली आणि त्यातून भाविकांना विजेचा धक्का कसा बसला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या दुर्घटनेमुळे लालबाग-परळ परिसरावर शोककळा पसरली आहे.

Total Visitors :

5427461
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

A Comprehensive Look at the Current State of Technological Evolution

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

रत्नागिरीत ७० वर्षीय महिला घरातून बेपत्ता; पोलिसांत तक्रार दाखल

Gramin Varta
1 Min Read

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत व सरसकट कर्जमाफी द्यावी : हर्षवर्धन सकपाळ

Gramin Varta
3 Min Read

पडिक पाण्याच्या टाकीत अडकलेल्या मगरीच्या पिल्लाची सुटका

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनसह सात नामांकित आस्थापनांचे परवाने निलंबित; अन्न व औषध प्रशासनाचा दणका

2 Min Read
महाराष्ट्र

बीआयएसने सोन्याच्या हॉलमार्किंग शुल्कात ७५ रुपयांपर्यंत केली वाढ, नवीन दर लागू

2 Min Read
महाराष्ट्र

१९ जिल्ह्यांत पाऊस लांबल्याने राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर; पंचनाम्यांपूर्वीच बळीराजा हवालदिल

2 Min Read
महाराष्ट्र

राज्यातील एसटी बसस्थानकांवर स्तनदा माता व बाळांच्या सुरक्षिततेसाठी उभारणार १२५ ‘हिरकणी कक्ष’

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?