ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: लांजा : पिकअपमधून बैलांची क्रूर वाहतूक;  पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Sunday, Oct 4, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » लांजा : पिकअपमधून बैलांची क्रूर वाहतूक;  पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
लांजा

लांजा : पिकअपमधून बैलांची क्रूर वाहतूक;  पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Gramin Varta
Last updated: September 30, 2026 8:59 am
Gramin Varta
664 Views
Share

लांजा : लांजा ते दाभोळे मार्गावरील कुरचुंब फाटा येथे पिकअप वाहनातून दोन बैलांची दाटीवाटीने व नियमांचे उल्लंघन करून वाहतूक केली जात असल्याचा प्रकार लांजा पोलिसांनी उघडकीस आणला. या कारवाईत पोलिसांनी दोन बैलांची सुटका करून पिकअप वाहनासह एकूण २ लाख ७१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सत्यजित गंगाराम कोलापटे (वय २३, रा. आंबा मानोलीजवळ धनगरवाडी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) आणि सुरेश धोंडीबा बरागडे (वय ३३, रा. चांदोली, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. यातील सुरेश बरागडे याच्याविरुद्ध यापूर्वीही देवरूख पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ आणि बेकायदेशीर वाहतुकीसंदर्भात गुन्हा दाखल असल्याची नोंद पोलिसांकडे आहे.

लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी कळंत्रे हे पोलीस पथकासह गस्तीवर असताना लांजा-दाभोळे मार्गावरील कुरचुंब फाटा येथे बोलेरो पिकअप क्रमांक एमएच ०९ जीजे २८२५ संशयास्पदरीत्या जाताना दिसली. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता, वाहनाच्या हौद्यामध्ये दोन बैल अत्यंत दाटीवाटीने बांधून ठेवल्याचे आढळून आले. बैलांना हालचाल करता येऊ नये अशा पद्धतीने आखूड दोरीने बांधण्यात आले होते. तसेच वाहनाचा हौदा चारही बाजूंनी ताडपत्रीने बंद करण्यात आला होता. त्यामुळे जनावरांसाठी पुरेशी हवा खेळती राहण्याची व्यवस्था नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

वाहतुकीदरम्यान जनावरांना दुखापत होऊ नये यासाठी वाहनात आवश्यक पार्टीशन करण्यात आलेले नव्हते. तसेच बैलांसाठी चारा-पाणी आणि प्रथमोपचाराची कोणतीही व्यवस्था नसल्याचे आढळून आले. जनावरांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक प्रमाणपत्र घेण्यात आलेले नव्हते, तसेच वाहनावर गुरे वाहतूक करीत असल्याचा आवश्यक फलकही लावण्यात आलेला नव्हता. त्यामुळे संबंधित वाहतूक नियमबाह्य पद्धतीने केली जात असल्याचे पोलिसांच्या तपासणीत स्पष्ट झाले.

या कारवाईत प्रत्येकी १० हजार ५०० रुपये किमतीचे दोन बैल आणि २ लाख ५० हजार रुपये किमतीचा बोलेरो पिकअप टेम्पो असा एकूण २ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी कळंत्रे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र पोलीस कायदा, प्राण्यांची वाहतूक नियम, मोटार वाहन कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) नुसार दोन्ही संशयितांना नोटीस बजावण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल यू. यू. शेडे करीत आहेत.

Total Visitors :

5435553
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

एनसीएमसी कार्ड वाटपाचा रत्नागिरीत पुरता बोजवारा; तांत्रिक गोंधळ अन् संथ कारभारामुळे ज्येष्ठ नागरिकांचे अतोनात हाल, प्रवाशांमध्ये संताप

Gramin Varta
2 Min Read

नवरात्र, दिवाळी, छठपूजेसाठी विशेष रेल्वेगाड्या; पुणे विभागातून २१६ फेऱ्या

Gramin Varta
1 Min Read

राजापूर रेल्वे स्थानकाबाहेर संशयास्पद बॅगेसह एकजण ताब्यात

Gramin Varta
2 Min Read

आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालय आयोजित कोकण विभागीय सहसंवेदना कार्यशाळा संपन्न

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

लांजा

लांजा शहरासह तालुक्यात गणरायाचे वाजतगाजत आगमन; भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाला सुरुवात

1 Min Read
लांजा

खेरवसे जाधववाडीत बिबट्याच्या वावराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; तातडीने कॅमेरा ट्रॅप लावून उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची वनविभागाकडे मागणी

1 Min Read
लांजा

लांजा: लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ६० वर्षीय महिलेचे ९० हजारांचे मंगळसूत्र लुटले

2 Min Read
लांजा

मजुराला धडक देऊन पसार झालेला चालक पाचलमधून जेरबंद; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लांजा पोलीस पथकाचा सन्मान

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?