ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: स्वातंत्र्यानंतर प्रथमच माचाळच्या रस्त्यावर धावणार एसटी बस! ८० वर्षांची प्रतीक्षा संपली; १ नोव्हेंबरपासून बससेवा सुरू
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » स्वातंत्र्यानंतर प्रथमच माचाळच्या रस्त्यावर धावणार एसटी बस! ८० वर्षांची प्रतीक्षा संपली; १ नोव्हेंबरपासून बससेवा सुरू
लांजा

स्वातंत्र्यानंतर प्रथमच माचाळच्या रस्त्यावर धावणार एसटी बस! ८० वर्षांची प्रतीक्षा संपली; १ नोव्हेंबरपासून बससेवा सुरू

Gramin Varta
Last updated: October 31, 2026 7:43 pm
Gramin Varta
1k Views
Share

आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला यश; पंचायत समिती सदस्य उमेश दादा पत्की यांच्या प्रयत्नांना यशस्वी फलित

माचाळ /सिकंदर फरास : लांजा तालुक्यातील माचाळ गावाच्या एसटी बससेवेची प्रतीक्षा अखेर संपली असून, स्वातंत्र्यानंतर प्रथमच गावापर्यंत एसटी बस धावणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तब्बल ८० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर माचाळच्या रस्त्यावर एसटी बस धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार किरण सामंत यांच्याकडे करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, येत्या १ नोव्हेंबरपासून या मार्गावर एसटी बससेवा सुरू होणार आहे.

लांजा आणि साखरपा-चिंचुर्टी या एसटी बसफेऱ्यांचा माचाळपर्यंत विस्तार करण्यात यावा, अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. मात्र, माचाळपर्यंत थेट एसटी बससेवा उपलब्ध नसल्याने गावातील शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि अन्य प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. बस पकडण्यासाठी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना तब्बल सात ते आठ किलोमीटर अंतर पायी चालत चिंचुर्टी येथे जावे लागत होते. त्यामुळे वेळ आणि श्रम खर्ची पडत होते.

ग्रामस्थांची ही अडचण लक्षात घेऊन राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्याकडे बससेवा सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. प्रभानवल्ली पंचायत समितीचे सदस्य उमेश दादा पत्की यांनीही या प्रश्नासाठी विशेष प्रयत्न केले. अखेर या प्रयत्नांना यश मिळाले असून, माचाळपर्यंत एसटी बसफेऱ्यांचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन वेळापत्रकानुसार, आता सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी एसटी बस माचाळ येथे पोहोचणार आहे. या बससेवेमुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तसेच ग्रामस्थ आणि इतर प्रवाशांना दैनंदिन प्रवासासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक वर्षांपासून भेडसावणारी वाहतुकीची समस्या दूर होण्यास या सुविधेमुळे मदत होणार आहे.

माचाळपर्यंत एसटी बस सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल ग्रामस्थांकडून आमदार किरण सामंत आणि पंचायत समिती सदस्य उमेश दादा पत्की यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. स्वातंत्र्यानंतर प्रथमच गावापर्यंत एसटी बस पोहोचणार असल्याने माचाळच्या दळणवळणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Total Visitors :

5469300
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

10 Tech Innovations Set to Reshape the World As We Know It

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

मंगळुरू एक्सप्रेसमधून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी उघड; ठाणे रेल्वे स्थानकात अटेंडंटकडून ७१ हजारांचा अवैध मद्यसाठा जप्त

Gramin Varta
2 Min Read

मंडणगड : तुळशी येथे बंद घर फोडले; पावणेदोन लाखांचे दागिने, रोख रकमेसह तांब्या-पितळेची भांडी लंपास

Gramin Varta
2 Min Read

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत मनिषा भानवालाची ऐतिहासिक सुवर्णभरारी; अशी अद्वितीय कामगिरी करणारी ठरली देशाची पहिलीच महिला मल्ल

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

लांजा

दुष्काळावर मात करण्यासाठी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत कुरचुंब येथे वनराई बंधारा साकारला!

1 Min Read
लांजा

‘मिशन पोलीस पाटील’ व ‘मिशन प्रबोधन’ अंतर्गत लांजात पोलीस अधीक्षकांकडून मार्गदर्शन; कायदा-सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेवर भर

2 Min Read
लांजा

लांजा: गोळवशीत खांबडवाडी मित्र मंडळाचा नवरात्रोत्सव यंदा २९ व्या वर्षात; ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

2 Min Read
लांजा

अंजणारी घाट मृत्यूचा सापळा; अपघातांची उच्चस्तरीय चौकशी करून तातडीने सुरक्षा परीक्षण करा; दत्ताजी कदम यांची प्रशासनाकडे मागणी

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?