ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ‘मिशन पोलीस पाटील’ व ‘मिशन प्रबोधन’ अंतर्गत लांजात पोलीस अधीक्षकांकडून मार्गदर्शन; कायदा-सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेवर भर
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ‘मिशन पोलीस पाटील’ व ‘मिशन प्रबोधन’ अंतर्गत लांजात पोलीस अधीक्षकांकडून मार्गदर्शन; कायदा-सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेवर भर
लांजा

‘मिशन पोलीस पाटील’ व ‘मिशन प्रबोधन’ अंतर्गत लांजात पोलीस अधीक्षकांकडून मार्गदर्शन; कायदा-सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेवर भर

Gramin Varta
Last updated: October 14, 2026 1:37 pm
Gramin Varta
181 Views
Share

लांजा/ अरबाज नेवरेकर: रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गावपातळीवरील शांतता, सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये कायदेविषयक साक्षरता रुजवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या ‘मिशन पोलीस पाटील’ व ‘मिशन प्रबोधन’ उपक्रमांतर्गत लांजा तालुक्यात विशेष जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे (भा.पो.से.) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात पोलीस पाटील आणि महिला बचत गटांच्या सदस्यांना कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षा तसेच वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम आणि लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे उपस्थित होते.

‘मिशन पोलीस पाटील’ अंतर्गत लांजा पोलीस ठाण्यात आयोजित बैठकीत आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गावागावांत सामाजिक सलोखा आणि शांतता अबाधित राखण्याबाबत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तालुक्यातील पोलीस पाटलांना सूचना दिल्या. गावात घडणाऱ्या संशयास्पद हालचालींची व महत्त्वाच्या घडामोडींची माहिती विनाविलंब पोलिसांना देऊन संभाव्य अनुचित प्रकार रोखण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले. पोलीस पाटील हा गावपातळीवर पोलीस प्रशासनाचा अत्यंत महत्त्वाचा दुवा असल्याचे नमूद करत, जिल्हा पोलिसांच्या उपक्रमांना सक्रिय सहकार्य करणाऱ्या पोलीस पाटलांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

तसेच ‘मिशन प्रबोधन’ व ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत लांजा येथील त्रिमूर्ती हॉलमध्ये महिला बचत गटांच्या सदस्यांसाठी विशेष मार्गदर्शन मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपस्थित अधिकाऱ्यांनी महिलांचे कायदेशीर अधिकार, महिला सुरक्षा, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदे, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, वाहतूक नियम आणि डिजिटल युगातील सायबर गुन्ह्यांचे धोके यावर सविस्तर माहिती दिली. कोणत्याही प्रकारचा अन्याय अथवा छळ झाल्यास महिलांनी निर्भयपणे पुढे येऊन पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन करतानाच आपत्कालीन मदतीसाठी ‘डायल ११२’ आणि सायबर फसवणुकीच्या तक्रारीसाठी ‘१९३०’ या हेल्पलाइन क्रमांकांचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आले.

Total Visitors :

5468453
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राज्यातील आणखी १८ तालुक्यांत दुष्काळाच्या तीव्रतेची प्रत्यक्ष पडताळणी होणार

Gramin Varta
2 Min Read

राजवीर पोवारची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड; हरचिरीच्या मल्लाची लाल मातीत चमकदार कामगिरी

Gramin Varta
1 Min Read

राज्यातील दुष्काळग्रस्त बळीराजाला मोठा दिलासा; पीएम किसान योजनेचे १८३५ कोटी रुपये महाराष्ट्रातील ९१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

Gramin Varta
3 Min Read

केळंंबे-लांजामध्ये अवैध दारूविक्रीविरोधात आमदार किरण सामंत आक्रमक; कठोर कारवाईचे दिले निर्देश

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

लांजा

खेरवसे जाधववाडीत बिबट्याच्या वावराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; तातडीने कॅमेरा ट्रॅप लावून उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची वनविभागाकडे मागणी

1 Min Read
लांजा

अंजनारी घाटातील अपघात रोखण्यासाठी अखेर गतिरोधक उभारणीचे काम सुरू; ग्रामस्थांच्या अखंड पाठपुराव्याला यश

2 Min Read
लांजा

लांजा येथील ७८ वर्षीय महिलेची ६० लाखांची सायबर फसवणूक; पोलीस अधिकारी असल्याचे भासवून अटकेची धमकी

2 Min Read
लांजा

लांजा: गवाणे येथील अपंगत्वाच्या नैराश्यातून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?