ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: लांजा: गवाणे येथील अपंगत्वाच्या नैराश्यातून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » लांजा: गवाणे येथील अपंगत्वाच्या नैराश्यातून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू
लांजा

लांजा: गवाणे येथील अपंगत्वाच्या नैराश्यातून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Varta
Last updated: October 31, 2026 10:17 am
Gramin Varta
111 Views
Share

लांजा: अपंगत्वाच्या नैराश्यातून राहत्या घराच्या अंगणात अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतलेल्या एका ५८ वर्षीय प्रौढाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. प्रभाकर शंकर रेवाळे (वय ५८, रा. गवाणे रेवाळेवाडी, ता. लांजा) असे मयत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत प्रभाकर रेवाळे हे जन्मापासूनच दोन्ही पायांनी दिव्यांग होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आपल्या या शारीरिक अपंगत्वामुळे तीव्र मानसिक तणावाखाली आणि सतत स्वतःच्याच विचारात अस्वस्थ असायचे. याच मानसिक विवंचनेतून त्यांनी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातील रॉकेलचा डबा बाहेर आणला आणि घरासमोरील अंगणात स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून काडीपेटीने स्वतःला पेटवून घेतले.

अचानक घडलेल्या या प्रकाराने अंगणात आगीच्या ज्वाळा दिसताच शेजारील ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी तातडीने धाव घेऊन आग विझवली. गंभीररीत्या भाजलेल्या अवस्थेत त्यांना उपचारासाठी प्रथम लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना त्याच दिवशी दुपारी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.

अतिदक्षता विभागात डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच २४ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजून सात मिनिटांच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मयत घोषित केले. या घटनेची प्राथमिक माहिती रत्नागिरी शहर पोलिसांकडून लांजा पोलीस ठाण्याला टपालाद्वारे प्राप्त झाल्यानंतर, मयताचे बंधू अनंत सखाराम रेवाळे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे लांजा पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ५८/२०२६ नुसार नोंद केली असून पोलीस पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडत आहेत.

Total Visitors :

5468457
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

८६ हजार कोटींच्या प्रलंबित देयकांसाठी शासकीय कंत्राटदारांचे फोन आंदोलन; एकाच दिवशी करणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना लाखो फोन

Gramin Varta
3 Min Read

लेखिका सविता कोकजे यांच्या ‘गुलदस्ता’ पुस्तकाचे प्रकाशन

Gramin Varta
2 Min Read

हंगामापूर्वीच कोकणात सागरी कासवांच्या विणीला सुरुवात; गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळले पहिले घरटे

Gramin Varta
2 Min Read

संगमेश्वरमध्ये भंगार गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी; रात्रभर अग्निशमन दलाची झुंज, लाखोंच्या नुकसानीचा अंदाज

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

लांजा

लांजा : वेरवली खुर्द येथे कौले काढून ७.८७ लाखांचे सोन्या-हिऱ्याचे दागिने लंपास; चार वर्षांनी गुन्हा दाखल

2 Min Read
लांजा

लांजा : नौशाद नेवरेकर यांची मस्जिद ए अब्बास ट्रस्टच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

1 Min Read
लांजा

लांजा एसटी वर्कशॉपमध्ये पोलिसांचा ‘सेवा संकल्प’; कर्मचाऱ्यांनी घेतली सायबर सुरक्षेची शपथ

2 Min Read
लांजा

मजुराला धडक देऊन पसार झालेला चालक पाचलमधून जेरबंद; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लांजा पोलीस पथकाचा सन्मान

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?