ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: लांजा एसटी वर्कशॉपमध्ये पोलिसांचा ‘सेवा संकल्प’; कर्मचाऱ्यांनी घेतली सायबर सुरक्षेची शपथ
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Sunday, Oct 4, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » लांजा एसटी वर्कशॉपमध्ये पोलिसांचा ‘सेवा संकल्प’; कर्मचाऱ्यांनी घेतली सायबर सुरक्षेची शपथ
लांजा

लांजा एसटी वर्कशॉपमध्ये पोलिसांचा ‘सेवा संकल्प’; कर्मचाऱ्यांनी घेतली सायबर सुरक्षेची शपथ

Gramin Varta
Last updated: October 3, 2026 8:11 am
Gramin Varta
61 Views
Share

पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे यांचे ‘डायल ११२’ सह विविध सुरक्षा अभियानांवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन

लांजा (अरबाज नेवरेकर): बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये कायदेविषयक सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी लांजा पोलिसांच्या वतीने एसटी वर्कशॉप येथे विशेष जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित या शिबिरात लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना सायबर सुरक्षा आणि विविध पोलीस उपक्रमांविषयी सविस्तर मार्गदर्शन करत सजगतेचा कानमंत्र दिला.

या वेळी बोलताना पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे यांनी महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने जनहितार्थ राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन प्रबोधन’, ‘मिशन रायझिंग फ्लॉवर’, ‘मिशन जीवन’ आणि ‘मिशन टेप फॉर सेल’ यांसारख्या सामाजिक व सुरक्षा अभियानांची सविस्तर माहिती दिली. कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगी अथवा संकटाच्या काळात नागरिकांना तात्काळ पोलीस साहाय्य उपलब्ध व्हावे यासाठी ‘डायल ११२’ ही हेल्पलाईन सेवा अत्यंत प्रभावी असून, तिचा योग्य वापर कसा करावा याविषयी त्यांनी कर्मचाऱ्यांना अवगत केले.

दैनंदिन जीवनात इंटरनेट, सोशल मीडिया आणि डिजिटल व्यवहार हाताळताना सायबर भामट्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, फसवणूक टाळण्यासाठी कोणती खबरदारी बाळगावी, यावर शिबिरात विशेष भर देण्यात आला. यासोबतच महिला व बालकांची सुरक्षितता, सामाजिक शांततेसाठी कायदा व सुव्यवस्थेचे पालन, नागरिकांची वैयक्तिक सुरक्षा आणि रस्त्यावरील वाहतूक सुरक्षेचे नियम याबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराच्या शेवटी उपस्थितांनी डिजिटल सुरक्षिततेचा अवलंब करण्याचा निर्धार व्यक्त करत सायबर सुरक्षेची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. या प्रबोधनात्मक उपक्रमाला लांजा पोलीस ठाण्याचे एक अधिकारी, दोन अंमलदार तसेच एसटी वर्कशॉपमधील सुमारे ३० कर्मचाऱ्यांची सक्रिय उपस्थिती लाभली होती.

Total Visitors :

5435554
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

खेड : संगलट येथून २४ वर्षीय तरुणाचे अपहरण

Gramin Varta
1 Min Read

मिरकरवाडा बंदरात मत्स्य विभागाची धडक कारवाई; विनावापर पडून असलेल्या ३० नौका हटवण्यास सुरुवात

Gramin Varta
2 Min Read

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर औषधांच्या कंटेनरला दुचाकीची मागून धडक

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीत हेरॉईनसदृश अंमली पदार्थासह दोघे ताब्यात; १ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

लांजा

पाककलेचा समृद्ध वारसा! लांजातील ज्ञानेश्वरी वाघधरेने अवघ्या काही तासांत साकारला बाप्पासाठी ४२ नैवेद्यांचा थाट

2 Min Read
लांजा

वयोमानामुळे जमीन खोदणे झाले कठीण; पाईपलाईन दुरुस्तीसाठी ज्येष्ठ नागरिकाच्या मदतीला पोलीस अंमलदार

2 Min Read
लांजा

NMMS परीक्षेत १०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या यशाचे उद्दिष्ट; लांज्यात उद्या शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा

2 Min Read
लांजा

दुष्काळाच्या यादीतून लांजा तालुका वगळल्याने शेतकरी आक्रमक; निर्णयाच्या फेरविचाराची मागणी

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?