ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: विलवडे रेल्वे स्थानकावरील उपोषणाच्या पार्श्वभूमीवर लांजा पोलिसांची संघर्ष समितीसोबत बैठक
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » विलवडे रेल्वे स्थानकावरील उपोषणाच्या पार्श्वभूमीवर लांजा पोलिसांची संघर्ष समितीसोबत बैठक
लांजा

विलवडे रेल्वे स्थानकावरील उपोषणाच्या पार्श्वभूमीवर लांजा पोलिसांची संघर्ष समितीसोबत बैठक

Gramin Varta
Last updated: September 16, 2026 1:21 pm
Gramin Varta
39 Views
Share

उपोषण शांततेत पार पाडण्याचे आवाहन; रेल्वे वाहतुकीला अडथळा न आणण्याच्या सूचना

लांजा/ अरबाज नेवरेकर : विलवडे रेल्वे स्थानकातील विविध मागण्यांसाठी विलवडे रेल्वे प्रवासी संघटना व मुंबई ग्रामीण संघर्ष समितीतर्फे २० सप्टेंबर रोजी रेल्वे स्थानक परिसरात लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लांजा पोलीस ठाण्यात बुधवारी संघर्ष समितीच्या पदाधिकारी व सदस्यांची बैठक घेण्यात आली. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत उपोषणादरम्यान घ्यावयाच्या खबरदारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

उपोषण शांततामय आणि कायदेशीर मार्गाने पार पाडावे, तसेच रेल्वे प्रवासी, रेल्वे वाहतूक अथवा रेल्वे प्रशासनाच्या कामकाजाला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पोलिसांकडून संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. उपोषणाच्या काळात वाद-विवाद, घोषणाबाजीमुळे निर्माण होणारे तणावपूर्ण प्रसंग अथवा अनुचित प्रकार टाळून पोलीस व रेल्वे प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले.

बैठकीदरम्यान संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या मागण्या आणि संबंधित तक्रारींची माहिती पोलिसांनी जाणून घेतली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, अशा सूचनाही देण्यात आल्या.

या बैठकीला विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अमोल रेडीज, उपाध्यक्ष भास्कर खामकर, संतोष चव्हाण, दीपक जानकर, सल्लागार सुभाष लाड, जगदीश राजापकर, प्रकाश तोरस्कर तसेच सदस्य तुषार पालकर, युवराज हांडे, विश्वनाथ गुरव, रवींद्र जानकर आणि दीपक तोरस्कर उपस्थित होते.

दरम्यान, संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण शांततेच्या वातावरणात आणि कायदेशीर मार्गाने पार पाडण्याची ग्वाही देत पोलीस प्रशासनाला आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली.

Total Visitors :

5427562
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

कळझोंडी उपकेंद्रात सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ६२ ग्रामस्थांनी घेतला लाभ

Gramin Varta
2 Min Read

खेड : नदीकाठी फेरफटका मारताना मधमाशांच्या हल्ल्यात की वृद्धाचा मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

किल्ले रायगड रोपवे सेवा तात्पुरती ठप्प; प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त

Gramin Varta
2 Min Read

लांजा तालुक्यात १३ हजार ५८८ बाप्पांना भावपूर्ण निरोप

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

लांजा

लांजातील उद्योजक शिवाजी कोत्रे यांच्याकडून घरातच पर्यावरणपुरक पध्दतीने श्रींचे भावपूर्ण विसर्जन

1 Min Read
लांजा

एकल महिलांच्या सर्वेक्षणाला १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

1 Min Read
लांजा

वयोमानामुळे जमीन खोदणे झाले कठीण; पाईपलाईन दुरुस्तीसाठी ज्येष्ठ नागरिकाच्या मदतीला पोलीस अंमलदार

2 Min Read
लांजा

लांजा: उड्डाणपुलावर भरधाव कारच्या धडकेत मजुराचा जागीच मृत्यू; चालक घटनास्थळावरून पसार

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?