ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: लांजा तालुक्यातील ४,४५४ शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामे पूर्ण
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » लांजा तालुक्यातील ४,४५४ शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामे पूर्ण
लांजा

लांजा तालुक्यातील ४,४५४ शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामे पूर्ण

Gramin Varta
Last updated: October 18, 2026 5:00 pm
Gramin Varta
259 Views
Share

१,०५९.८६ हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे नुकसान; दुष्काळी तालुका जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा

लांजा (अरबाज नेवरेकर) : लांजा तालुक्यात पावसाच्या अनियमिततेमुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, आतापर्यंत १,०५९.८६ हेक्टर क्षेत्रावरील ४,४५४ शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती तालुका कृषी अधिकारी अभिजीत शेलार यांनी दिली. दरम्यान, शासनाने लांजा तालुका दुष्काळी जाहीर केल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

यंदा पावसाचे आगमन उशिरा झाले असले तरी सुरुवातीच्या काळात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने भातलावणी केली होती. मात्र, ऐन पीक वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली. काही भागांत भातपीक पसवण्याच्या अवस्थेत होते, तर काही ठिकाणी लोंब्यांमध्ये दाणे भरण्याची प्रक्रिया सुरू होती. अशा परिस्थितीत पावसाचा खंड पडल्याने भातपिकाला मोठा फटका बसला.

भातपीक गर्भावस्थेत असताना त्याला मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. मात्र, कडक उन्हामुळे शेतातील ओलावा कमी झाला. परिणामी अनेक ठिकाणी भातपीक करपले असून, विशेषतः कातळावरील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. वर्षभराच्या उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसमोर यामुळे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

दरम्यान, लांजा तालुका दुष्काळी जाहीर होण्यापूर्वीच तालुका कृषी अधिकारी अभिजीत शेलार यांनी आपल्या पथकासह नुकसानग्रस्त भागांची पाहणी सुरू केली होती. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची माहिती घेत पंचनाम्यांची प्रक्रिया राबवली.

लांजा तालुक्यात आतापर्यंत १,०५९.८६ हेक्टर क्षेत्रावरील ४,४५४ शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी अभिजीत शेलार यांनी दिली.

शासनाने लांजा तालुका दुष्काळी जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार, याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पंचनाम्यांच्या आधारे शासनाने लवकरात लवकर नुकसानभरपाई उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

Total Visitors :

5468536
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

Savoring Culinary Delights and Foodie Adventures in Travel

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

चिपळूणमध्ये वालोपे येथील नदीकिनारी अवैध हातभट्टीवर पोलिसांचा छापा; दीड लाखांचे दारू व रसायन जागेवरच केले नष्ट

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले यांची आरोग्य सेवेत उपसंचालक पदावर पदोन्नती

Gramin Varta
1 Min Read

राहुल गांधींसह १० विरोधी नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

Gramin Varta
4 Min Read

You Might Also Like

लांजा

केळंंबे-लांजामध्ये अवैध दारूविक्रीविरोधात आमदार किरण सामंत आक्रमक; कठोर कारवाईचे दिले निर्देश

2 Min Read
लांजा

प्राथमिक शिक्षक संघाची शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर गटशिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा

2 Min Read
लांजा

अभियांत्रिकी ज्ञानाला उद्योजकतेची जोड देत यशाची शिखरे गाठणारे युवा उद्योजक: असीम मुलाणी!

4 Min Read
लांजा

लांजा तालुक्यात २०४३ गणरायांना भक्तिमय वातावरणात निरोप; भाविकांचे पाणावले डोळे, पोलिसांचा चोख बंदोबस्त

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?