ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: अभियांत्रिकी ज्ञानाला उद्योजकतेची जोड देत यशाची शिखरे गाठणारे युवा उद्योजक: असीम मुलाणी!
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » अभियांत्रिकी ज्ञानाला उद्योजकतेची जोड देत यशाची शिखरे गाठणारे युवा उद्योजक: असीम मुलाणी!
लांजा

अभियांत्रिकी ज्ञानाला उद्योजकतेची जोड देत यशाची शिखरे गाठणारे युवा उद्योजक: असीम मुलाणी!

Gramin Varta
Last updated: November 4, 2026 2:22 pm
Gramin Varta
263 Views
Share

अरबाज नेवरेकर : समाजात काही व्यक्ती त्यांच्या पदाने मोठ्या होतात, तर काही केवळ संपत्तीच्या जोरावर ओळखल्या जातात. मात्र, आपल्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, कामाप्रती असलेली प्रामाणिक निष्ठा आणि माणसे जोडण्याची अथांग वृत्ती यामुळे इतरांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारी माणसे फार विरळा असतात. वडिलांच्या कष्टांचा वारसा, आई-वडिलांचे उत्तम संस्कार, स्वतःचे उच्च तांत्रिक ज्ञान आणि माणुसकीची श्रीमंती यांच्या बळावर उद्योग जगतात स्वतःची स्वतंत्र नाममुद्रा उमटवणारे युवा अभियंता आणि यशस्वी उद्योजक असीम मुलाणी हे अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत.

वडील आणि ज्येष्ठ उद्योजक श्री. गणी मुलाणी यांच्या पावलावर पाऊल ठेवत असीम मुलाणी यांनी व्यावसायिक क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र वाट निर्माण केली आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर केवळ पदवी घेऊन थांबण्याऐवजी, त्या तांत्रिक ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष व्यवसाय उभारणीसाठी करण्याची त्यांची तळमळ उल्लेखनीय ठरली. एक अभियंता म्हणून तांत्रिक बाबींचे अचूक आकलन, सूक्ष्म नियोजन आणि उद्योजक म्हणून जबाबदारीचे भान यांचा सुरेख मेळ त्यांच्या प्रत्येक प्रकल्पात दिसून येतो.

बांधकाम क्षेत्रातील ‘टेक्नो बिल्ड इन्फ्रा’, पर्यटन व आदरातिथ्य क्षेत्रातील ‘सानिया स्विमिंग पूल अँड ग्रीन नेस्ट रिसॉर्ट’ (लांजा) आणि भव्य गृहप्रकल्प ‘लांजा सिटी प्राइड’ अशा वैविध्यपूर्ण प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार केला आहे. व्यवसाय उभा करणे आणि वाढवणे ही केवळ भांडवलाची बाब नसते; त्यासाठी दूरदृष्टी, सातत्य, अचूक निर्णयक्षमता आणि गुणवत्तेशी कधीही तडजोड न करण्याची वृत्ती लागते. हे सारे पैलू आत्मसात करून असीम मुलाणी यांनी नव्या पिढीतील नवउद्योजकांसमोर एक आदर्श वस्तुपाठ ठेवला आहे. वडिलांनी उभारलेला कष्टांचा डोलारा पुढे नेताना स्वतःच्या कर्तृत्वाने त्याची उंची वाढवणे ही त्यांची खरी ताकद आहे.

असीम मुलाणी यांची खरी ओळख केवळ त्यांच्या उद्योजकीय यशापुरती मर्यादित नाही, तर ती त्यांच्या समृद्ध स्वभावात दडलेली आहे. चेहऱ्यावर कायम असणारे प्रसन्न स्मितहास्य, संवादातील सहजपणा, प्रत्येकाशी साधलेली आपुलकी आणि समोरच्याला मिळणारा आपलेपणा हे त्यांचे वेगळेपण ठरते. आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात पद, प्रतिष्ठा आणि पैशाची हवा डोक्यात जाऊन अनेकदा वागण्यात बदल होतो. मात्र असीम मुलाणी यांच्यात कोणताही दिखाऊपणा किंवा मोठेपणाचा बडेजाव लवलेशही जाणवत नाही. आर्थिक सुबत्ता आणि समाजात मोठा मान असूनही मुलाणी कुटुंबाने जपलेली नम्रता आणि साधेपणा हाच त्यांच्या संस्कारांचा पाया आहे.

माझ्यासाठी असीम मुलाणी हे केवळ एका व्यावसायिक संस्थेचे संचालक नाहीत, तर मोठ्या भावाचे छत्र असलेले मार्गदर्शक आहेत. गेली सहा महिने ‘टेक्नो बिल्ड इन्फ्रा’मध्ये त्यांच्यासोबत काम करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू मला अगदी जवळून अनुभवता आले. कामाच्या ठिकाणी स्पष्टवक्तेपणा आणि शिस्त याला ते सर्वोच्च प्राधान्य देतात. कामात चूक झाल्यास ते अत्यंत स्पष्ट शब्दांत समज देतात, कारण कामात अचूकता व प्रामाणिकपणा याविषयी ते तडजोड करत नाहीत. मात्र, ही कठोरता केवळ कामापुरतीच मर्यादित असते. समज दिल्यानंतर क्षणात पुन्हा त्याच आपुलकीने मार्गदर्शन करणे, हसतमुखाने बोलणे आणि कर्मचाऱ्याचे मनोबल वाढवणे ही त्यांची खासियत आहे. कर्मचाऱ्याकडून केवळ काम करून घेणे सोपे असते; परंतु त्याला काम शिकवून, त्याच्या चुका सुधारून त्याचा आत्मविश्वास वाढवणे हे केवळ मोठ्या मनाचे नेतृत्वच करू शकते. हा प्रत्यक्ष अनुभव मला त्यांच्या सहवासात मिळाला.

मोठेपण खुर्चीत किंवा अधिकारात नसते, तर ते जबाबदारी स्वीकारण्यात आणि माणसांना सन्मानाने सोबत घेऊन चालण्यात असते. शिक्षणाचा उपयोग केवळ वैयक्तिक प्रगतीपुरता न करता, त्यातून अनेकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे समाजोपयोगी कार्य असीम मुलाणी अविरत करत आहेत. तांत्रिक ज्ञान आणि व्यावसायिक चातुर्याला माणुसकीची जोड देत सुरू असलेली त्यांची ही वाटचाल सर्वांसाठीच दिशादर्शक आहे.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त भावना व्यक्त करताना वाटते की, त्यांनी यशाची आणखी उत्तुंग शिखरे पादाक्रांत करावीत. ‘टेक्नो बिल्ड इन्फ्रा’, ‘सानिया स्विमिंग पूल अँड ग्रीन नेस्ट रिसॉर्ट’ आणि ‘लांजा सिटी प्राइड’ या प्रकल्पांच्या माध्यमातून बांधकाम, पर्यटन आणि उद्योग जगतात त्यांच्या कार्याचा ठसा अधिक गडद उमटावा. अनेक हातांना रोजगार देत प्रगतीची नवी दालने त्यांनी खुली करावीत.

अशा या कर्तृत्ववान युवा अभियंत्याला, ध्येयवेड्या उद्योजकाला आणि मोठ्या भावाप्रमाणे मार्गदर्शन करणाऱ्या असीम मुलाणी सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि उद्योगविश्वात अथांग यश लाभो, हीच प्रार्थना!

Total Visitors :

5469300
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

कडवई रेल्वे स्थानक मार्गाची दुरवस्था; कोकण रेल्वेच्या दुर्लक्षामुळे रिक्षा संघटना आक्रमक, आंदोलनाचा इशारा

Gramin Varta
1 Min Read

स्थानिक पातळीवर रखडलेल्या कामांमुळे सर्वसामान्यांची जिल्हा मुख्यालयात पायपीट; न्यायाच्या प्रतीक्षेत जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी जनतेची गर्दी

Gramin Varta
2 Min Read

लोटे एमआयडीसीतील एम.आर. स्पेशालिटी केमिकल्स कंपनीत भीषण आग; लाखो रुपयांची वित्तहानी, वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमुळे नागरिकांत संताप

Gramin Varta
1 Min Read

मिरकरवाडा जेटी येथे पानटपरीवर दोघांना मारहाण; दुकानातील साहित्याची तोडफोड करून जीवे मारण्याची धमकी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

लांजा

ब्रेकिंग: लांजा परिसरात शिकारीच्या उद्देशाने दबा धरून बसलेले दोघे ताब्यात; १२ बोअरची बंदूक आणि ४ जिवंत काडतुसे जप्त

2 Min Read
लांजा

लांजा: कर्जाच्या विळख्यातून वृद्धेचा खून करणाऱ्या दूध विक्रेत्याला सात दिवसांची पोलीस कोठडी

2 Min Read
लांजा

लांजा तालुक्यात २०४३ गणरायांना भक्तिमय वातावरणात निरोप; भाविकांचे पाणावले डोळे, पोलिसांचा चोख बंदोबस्त

1 Min Read
लांजा

लांजा : असोडे येथे शेतजमिनीच्या वादातून प्रौढावर प्राणघातक हल्ला; सहा जणांवर गुन्हा दाखल

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?