ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: लांजा : असोडे येथे शेतजमिनीच्या वादातून प्रौढावर प्राणघातक हल्ला; सहा जणांवर गुन्हा दाखल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Sunday, Oct 4, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » लांजा : असोडे येथे शेतजमिनीच्या वादातून प्रौढावर प्राणघातक हल्ला; सहा जणांवर गुन्हा दाखल
लांजा

लांजा : असोडे येथे शेतजमिनीच्या वादातून प्रौढावर प्राणघातक हल्ला; सहा जणांवर गुन्हा दाखल

Gramin Varta
Last updated: October 3, 2026 10:20 am
Gramin Varta
414 Views
Share

लांजा: शेतजमिनीच्या कारणावरून झालेल्या वादातून एका प्रौढाला कोयत्याच्या पाठीमागच्या भागाने, झाडावर डोके आपटून तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना लांजा तालुक्यातील असोडे येथे घडली आहे. या हल्ल्यात विजय सिताराम पवार (वय ५४, रा. असोडे, पोस्ट मठ, ता. लांजा) हे गंभीर जखमी झाले असून, या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात दोन ओळखीच्या आणि चार अनोळखी अशा एकूण सहा जणांविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय पवार हे २ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास जमीन गट क्रमांक ८४ मधील आपल्या शेतीची पाहणी करण्यासाठी गेले होते. ते शेजारी मंगेश डोंगरे यांच्या जमिनीतील आंब्याच्या कलमाखाली गप्पा मारत उभे असताना, अचानक त्या ठिकाणी सहा जण आले. त्यातील गोपीनाथ सावंत याने फिर्यादींना शेतात पाऊल न ठेवण्याची तंबी देत कोयत्याच्या पाठीमागच्या भागाने त्यांच्या पाठीवर जोरदार प्रहार केला. तसेच दावा संपायच्या आधी तुला संपवून टाकू, अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिली.

या वेळी आरोपी निखिल डोंगरे याने हाताच्या ठोशाने मारहाण करत घरात येऊन ठोकण्याची धमकी दिली. जमावातील अनोळखी इसमांनी विजय पवार यांचे केस आणि मान पकडून त्यांना थपडांनी मारहाण केली, तर एका इसमाने त्यांचे डोके थेट सागाच्या झाडावर जोराने आपटले. इतर साथीदारांनीही त्यांना लाथाबुक्क्यांनी तुडवून शिवीगाळ केली. या अचानक झालेल्या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर जखमी विजय पवार यांनी लांजा पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गोपीनाथ सावंत, निखिल डोंगरे यांच्यासह इतर चार अनोळखी संशयितांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Total Visitors :

5435559
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

नऊ वर्षांच्या सेवाकार्याची दखल; परेश मयेकर यांच्यावर सुरक्षा व्यवस्थेची मोठी जबाबदारी

Gramin Varta
3 Min Read

Inside Amazon’s Bold Vision for the Future of Shipping

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर; रत्नागिरीतील दुष्काळग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे होणार : राज्यमंत्री योगेश कदम

Gramin Varta
2 Min Read

घरासमोर खेळणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीवर ८५ वर्षीय वृद्धाचा लैंगिक अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

लांजा

लांजातील उद्योजक शिवाजी कोत्रे यांच्याकडून घरातच पर्यावरणपुरक पध्दतीने श्रींचे भावपूर्ण विसर्जन

1 Min Read
लांजा

लांजा एसटी वर्कशॉपमध्ये पोलिसांचा ‘सेवा संकल्प’; कर्मचाऱ्यांनी घेतली सायबर सुरक्षेची शपथ

2 Min Read
लांजा

सर्पमित्रांच्या समस्यांबाबत तहसीलदार प्रियांका ढोले यांच्याशी चर्चा; आवश्यक सुविधा पुरवण्याची निसर्ग संवर्धन संस्थेची मागणी

2 Min Read
लांजा

हर्दखळे ग्रामपंचायतीतील कथित गैरप्रकारांवरून लांजा BDO संशयाच्या भोवऱ्यात; किरण चव्हाण यांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना थेट जाब

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?