ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर; रत्नागिरीतील दुष्काळग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे होणार : राज्यमंत्री योगेश कदम
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर; रत्नागिरीतील दुष्काळग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे होणार : राज्यमंत्री योगेश कदम
रत्नागिरी

शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर; रत्नागिरीतील दुष्काळग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे होणार : राज्यमंत्री योगेश कदम

Gramin Varta
Last updated: September 29, 2026 8:02 am
Gramin Varta
18 Views
Share

रत्नागिरी : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासन बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे असून कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी निःसंदिग्ध ग्वाही राज्यमंत्री ना. योगेश कदम यांनी दिली आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत हताश होऊन टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन करत राज्य शासनाने दुष्काळ निवारणासाठी आगामी ८ ते ९ महिन्यांचे दीर्घकालीन व काटेकोर नियोजन आखल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वतः थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली असून, शेतकऱ्यांना केवळ तात्पुरती आर्थिक मदत न देता पुढील काळात जनावरांचा चारा, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी ठोस उपाययोजनांची पूर्वतयारी करण्यात आली आहे. जागतिक स्तरावरील अल निनोच्या प्रभावामुळे यंदा दुष्काळ उद्भवू शकतो याचा अंदाज शासनाला आधीपासूनच असल्याने त्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कोकणातील दुष्काळसदृश परिस्थितीचे विश्लेषण करताना ना. कदम म्हणाले की, केवळ पावसाच्या मिलिमीटरची आकडेवारी पाहून दुष्काळ निश्चित करता येणार नाही. एखाद्या भागात सरासरीइतका पाऊस मोजक्याच दिवसांत कोसळला आणि त्यानंतरचे सलग तीन महिने कोरडे गेले, तरीही तेथे दुष्काळ नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल; त्यामुळे प्रत्यक्ष जमिनीवरील वस्तुस्थिती तपासूनच दुष्काळग्रस्त भाग ठरवला जात आहे. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी, राजापूर आणि संगमेश्वर या तालुक्यांसह ज्या-ज्या भागात परिस्थिती गंभीर बनली आहे, त्या सर्व तालुक्यांचा समावेश दुष्काळी यादीत करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यावर गांभीर्याने विचारविनिमय झाला असून बाधित शेतीपिकांचे तातडीने प्रत्यक्ष पंचनामे सुरू करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत. आगामी ५ ते ६ दिवसांत परतीचा पाऊस न बरसल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी शासकीय मदत व भरपाई मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

बीआयएसने सोन्याच्या हॉलमार्किंग शुल्कात ७५ रुपयांपर्यंत केली वाढ, नवीन दर लागू

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी : कोकणनगर येथे रेशन धान्याचे सुरळीत वितरण; ९८ टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले धान्य

Gramin Varta
1 Min Read

हिऱ्यात साक्षात विघ्नहर्त्याचे रूप; सुरतमधील ६१८.२७ कॅरेटचा अद्भूत रफ डायमंड दर्शनासाठी खुला, मूल्य कोट्यवधींच्या घरात

Gramin Varta
2 Min Read

लांजातील उद्योजक शिवाजी कोत्रे यांच्याकडून घरातच पर्यावरणपुरक पध्दतीने श्रींचे भावपूर्ण विसर्जन

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी: मुरुगवाड्यात विक्रीच्या उद्देशाने हेरॉईन बाळगणारा २२ वर्षीय तरुण ताब्यात

1 Min Read
रत्नागिरी

चार वर्षांहून अधिक काळ कोठडीत असलेल्या साहिल काळसेकरला न्यायालयाचा दिलासा; ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : ‘फर्टिलिटी टेस्ट ट्यूब सेंटर’च्या बॅटरी सेटअपमध्ये शॉर्ट सर्किट

1 Min Read
रत्नागिरी

आधीच्या कर्जातून मुक्ती; नव्या कर्जासाठी मात्र अडसर

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?