ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: हर्दखळे ग्रामपंचायतीतील कथित गैरप्रकारांवरून लांजा BDO संशयाच्या भोवऱ्यात; किरण चव्हाण यांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना थेट जाब
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Sunday, Oct 4, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » हर्दखळे ग्रामपंचायतीतील कथित गैरप्रकारांवरून लांजा BDO संशयाच्या भोवऱ्यात; किरण चव्हाण यांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना थेट जाब
लांजा

हर्दखळे ग्रामपंचायतीतील कथित गैरप्रकारांवरून लांजा BDO संशयाच्या भोवऱ्यात; किरण चव्हाण यांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना थेट जाब

Gramin Varta
Last updated: October 3, 2026 8:21 am
Gramin Varta
412 Views
Share

१० महिने मिनिट्स बुक कोरे ठेवणाऱ्यांवर कारवाई कधी?; पाणीपुरवठा विभागासह लांजा पंचायत समितीच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह

लांजा: तालुक्यातील हर्दखळे ग्रामपंचायतीच्या संशयास्पद कारभारावरून निर्माण झालेला वाद आता अधिकच पेटला असून, या संपूर्ण प्रकरणात लांजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO) संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत का, असा थेट आणि खळबळजनक सवाल उपस्थित करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीतील विविध गैरप्रकारांची तपासणी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली असली, तरी समिती गठीत होण्यापूर्वी घडलेल्या गंभीर अनियमिततांवर प्रशासन काय पाऊल उचलणार, अशी विचारणा करत किरण दत्ताराम चव्हाण यांनी थेट जिल्हा परिषद रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्याकडे धाव घेतली आहे.

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा आणि मासिक बैठकींच्या इतिवृत्ताची (मिनिट्स बुक) तब्बल दहा महिने कोणतीही नोंदच ठेवली गेली नसल्याचा गंभीर आरोप चव्हाण यांनी केला आहे. हा धक्कादायक प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही संबंधित दोषींवर स्वतंत्रपणे जबाबदारी निश्चित करण्याची कोणतीही ठोस प्रशासकीय कार्यवाही अद्याप का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. केवळ चौकशी समिती नेमून यापूर्वी झालेल्या अक्षम्य बाबींची आणि गैरप्रकारांची जबाबदारी संपणार आहे का, असा संतप्त सवाल विचारत, संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमकी भूमिका तपासून त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई होणार की नाही, याचे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या प्रकरणात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर चौकशी समिती स्थापन करणे ही केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया असली, तरी त्यापूर्वी झालेल्या गंभीर चुकांवर BDO कार्यालय नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच ग्रामपंचायतीशी संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या कामांमधील कथित त्रुटींवरही स्वतंत्र चौकशी व कारवाई होणार का, हा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. चौकशीच्या नावाखाली हे प्रकरण केवळ पुढे ढकलून वेळकाढूपणा केला जाणार की जबाबदार व्यक्तींवर नियमाप्रमाणे कारवाई होणार, असा जाब चव्हाण यांनी CEO यांच्याकडे विचारला आहे. दहा महिन्यांच्या मिनिट्स बुकच्या नोंदी न करणाऱ्या ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना लांजा BDO पाठीशी घालत असल्याचा संशय व्यक्त होत असून, आता यावर रत्नागिरी जिल्हा परिषद आणि लांजा प्रशासन काय निर्णय घेते याकडे समस्त हर्दखळे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :

5435592
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

कोंडगाव ग्रामपंचायतीत ‘हर घर जल’ योजनेत ४० लाखांचा कथित घोटाळा; कागदपत्रे गायब झाल्याने खळबळ

Gramin Varta
3 Min Read

राजिवडा खाडीतील गाळ उपशाला गती द्या; कोअर कमिटीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Gramin Varta
2 Min Read

खेडमध्ये बांधकाम साइटवरून पडून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

Revolutionizing Entertainment Key Insights into the Digital Transformation Shift

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

लांजा

गणेशोत्सवात साकारली ‘श्री समर्थ बैठक’; वनगुळे-सुतारवाडीतील पंकज पांचाळ यांच्या कलाकृतीने वेधले लक्ष

2 Min Read
लांजा

दुष्काळाच्या यादीतून लांजा तालुका वगळल्याने शेतकरी आक्रमक; निर्णयाच्या फेरविचाराची मागणी

2 Min Read
लांजा

पाककलेचा समृद्ध वारसा! लांजातील ज्ञानेश्वरी वाघधरेने अवघ्या काही तासांत साकारला बाप्पासाठी ४२ नैवेद्यांचा थाट

2 Min Read
लांजा

लांजा: धुंदरेत खुराड्यात शिरला ९ फुटी अजगर; सर्पमित्रांनी केली सुखरूप सुटका

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?