ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: केळंंबे-लांजामध्ये अवैध दारूविक्रीविरोधात आमदार किरण सामंत आक्रमक; कठोर कारवाईचे दिले निर्देश
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » केळंंबे-लांजामध्ये अवैध दारूविक्रीविरोधात आमदार किरण सामंत आक्रमक; कठोर कारवाईचे दिले निर्देश
लांजा

केळंंबे-लांजामध्ये अवैध दारूविक्रीविरोधात आमदार किरण सामंत आक्रमक; कठोर कारवाईचे दिले निर्देश

Gramin Varta
Last updated: October 31, 2026 1:53 pm
Gramin Varta
441 Views
Share

लांजा: केळंंबे-लांजामध्ये सुरू असलेल्या अवैध गावठी दारू आणि गोव्याहून येणाऱ्या बनावट मद्याच्या विक्रीला आळा घालण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, जिल्ह्यातील अवैध मद्यविक्रीवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात अवैध गावठी दारू आणि विषारी गोव्या बनावटीच्या मद्याची खुलेआम विक्री सुरू असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

या अवैध मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी संबंधित यंत्रणेला कठोर कारवाईचे आदेश द्यावेत, या संदर्भात रत्नागिरी जिल्हा देशी मद्य विक्रेता संघाच्या वतीने आमदार किरण सामंत यांना शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे गुरुवारी निवेदन देण्यात आले. आमदार सामंत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कमी पैशांत मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या गावठी दारूमुळे अनेक तरुणांचे प्राण धोक्यात येत आहेत. मुख्यतः अवैध मद्यविक्रीमुळे महाराष्ट्र शासनाच्या महसुलाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, शासकीय मद्यविक्री कमी झाल्याने आणि सतत वाढणाऱ्या शुल्कामुळे परवानाधारक मद्यविक्रेत्यांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या सर्व बाबींचा विचार करून रत्नागिरी जिल्ह्यातील अवैध दारूविक्री तातडीने बंद करण्यासाठी जिल्हा प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाला आवश्यक निर्देश द्यावेत. त्याचप्रमाणे अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करून शासन सुरक्षित ठेवण्यात यावा, असे विविध विषय निवेदनाद्वारे मांडण्यात आले होते. त्याअनुषंगाने आमदार किरण सामंत यांनी पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागांना कारवाईचे तसेच त्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, यावेळी जिल्ह्यातील देशी मद्य विक्रेता संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

Total Visitors :

5468448
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

लंडनहून गुपचूप भारतात परतली, पिंपरीतील आलिशान फ्लॅटमध्ये मुग्धाचा कुजलेला मृतदेह! झोमॅटो-ब्लिंकिटने उघडलं गूढ

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीत ऊन-पावसाच्या लपंडावात आरोग्य धोक्यात; रुग्णालयांत रांगा

Gramin Varta
2 Min Read

कोकणातील कातळशिल्पांच्या संशोधन व संवर्धनासाठी राज्य शासनाची उच्चस्तरीय समिती; सतीश लळीत, रणजित हिर्लेकर, सुधीर रिसबूड यांची सदस्यपदी निवड

Gramin Varta
1 Min Read

लांजा एसटी वर्कशॉपमध्ये पोलिसांचा ‘सेवा संकल्प’; कर्मचाऱ्यांनी घेतली सायबर सुरक्षेची शपथ

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

लांजा

केळवली, धावडेवाडी व माचाळ परिसरातील रस्त्यांची डागडुजीने ग्रामस्थांना मिळाला मोठा दिलासा

1 Min Read
लांजा

खेरवसे जाधववाडीत बिबट्याच्या वावराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; तातडीने कॅमेरा ट्रॅप लावून उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची वनविभागाकडे मागणी

1 Min Read
लांजा

वयोमानामुळे जमीन खोदणे झाले कठीण; पाईपलाईन दुरुस्तीसाठी ज्येष्ठ नागरिकाच्या मदतीला पोलीस अंमलदार

2 Min Read
लांजा

पाककलेचा समृद्ध वारसा! लांजातील ज्ञानेश्वरी वाघधरेने अवघ्या काही तासांत साकारला बाप्पासाठी ४२ नैवेद्यांचा थाट

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?