ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरीत ऊन-पावसाच्या लपंडावात आरोग्य धोक्यात; रुग्णालयांत रांगा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरीत ऊन-पावसाच्या लपंडावात आरोग्य धोक्यात; रुग्णालयांत रांगा
रत्नागिरी

रत्नागिरीत ऊन-पावसाच्या लपंडावात आरोग्य धोक्यात; रुग्णालयांत रांगा

Gramin Varta
Last updated: September 17, 2026 8:18 am
Gramin Varta
27 Views
Share

रत्नागिरी: जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांसह बळीराजाला बसत असून, एकाच वेळी ऊन आणि पावसाच्या विचित्र खेळामुळे संपूर्ण जिल्हा दुहेरी संकटात सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने अचानक दांडी मारल्याने पावसाळ्यातच उन्हाळ्यासारखी दाहकता निर्माण झाली होती. दिवसभर वाढलेला उकाडा आणि कडक ऊन यामुळे हैराण नागरिकांना घराबाहेर पडताना छत्री, रुमाल आणि गॉगलचा आधार घ्यावा लागत होता. रविवारी केवळ हलक्या सरींवर हुलकावणी देणाऱ्या पावसाने बुधवारी मात्र दमदार हजेरी लावत अचानक वातावरण बदलले. कडक ऊन, ढगाळ आकाश आणि अनपेक्षित सरी अशा सतत बदलणाऱ्या हवामानामुळे सध्या जिल्ह्यात साथीच्या आजारांची नांदी झाली आहे.

वातावरणातील या टोकाच्या बदलांचा थेट आणि विपरित परिणाम लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्याच आरोग्यावर जाणवू लागला आहे. सध्या सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी आणि डोकेदुखी यांसारख्या तक्रारी घेऊन उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. परिणामी जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि खासगी रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभागांमध्ये (ओपीडी) सकाळपासूनच तपासणीसाठी नागरिकांच्या लांबलचक रांगा पाहायला मिळत आहेत. रुग्णालयांसोबतच औषध दुकानांमध्येही औषधोपचारासाठी नागरिकांची सततची ये-जा सुरू असल्याचे चित्र आहे. कोणतीही लक्षणे अंगावर न काढता नागरिकांनी स्वतःहून काळजी घ्यावी आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन आता आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

दुसऱ्या बाजूला शेती क्षेत्रातही हवामानाच्या या खेळामुळे अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. दरवर्षी सरासरी सुमारे ३५०० मिलिमीटर पाऊस पडणाऱ्या या जिल्ह्यात यंदा जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी भात आणि नाचणीच्या लावणी-पेरणीची कामे वेळेत आटोपली होती. मात्र पिके जोमात असतानाच पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने शेतातील भातासह इतर पिकांना तातडीने पाण्याची तीव्र गरज भासू लागली होती. बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांना जीवनदान मिळून शेतकरी काहीसा सुखावला असला, तरी वाढता उकाडा, पावसाची अनिश्चितता आणि बदलत्या हवामानाने निर्माण झालेले आरोग्याचे प्रश्न यामुळे जिल्ह्यासमोरचे संकट अद्याप कायम आहे.

Total Visitors :

5427550
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

गोव्यातील आलिशान व्हिलामधून चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; ४०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात सात जणांना अटक

Gramin Varta
2 Min Read

कोरेगाव-संगलट रस्त्यावर दुतर्फा झाडी; ‘रस्ता दाखवा, बक्षीस मिळवा’ म्हणण्याची वेळ

Gramin Varta
2 Min Read

बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली तीव्र; आजपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Gramin Varta
3 Min Read

खेड: चाकाळे येथे जुन्या वैमनस्यातून भरदिवसा रक्तरंजित राडा; बांबूच्या काठीने बेदम मारहाण करत एकाला केले गंभीर जखमी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

पोलिओने पाऊल थांबवले, जिद्दीने आयुष्याची वाटचाल सुरू ठेवली; शाकीरा कुरेशींच्या जीवनात विवाहाने उमलली नव्या पर्वाची पहाट

4 Min Read
रत्नागिरी

ग्राहक चळवळीत सहभागी होण्यासाठी ग्राहक पंचायत कार्यात सहभाग घ्यावा : सत्यवान कोत्रे

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत पावसाळा संपण्यापूर्वीच उन्हाचा कडाका; ऐन सप्टेंबरमध्ये ‘ऑक्टोबर हीट’चे चटके

2 Min Read
रत्नागिरी

‘Bappa.org’वरून रत्नागिरीच्या गणेशोत्सव परंपरा जगासमोर मांडा

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?